जसराज यांच्या 'ख्याल'मध्ये हरवताना
मला जाणीवही झाली नाही की,
केव्हाच संध्याकाळ झाली होती
आणि बाहेर बऱ्यापैकी अंधार पडला होता;
खरं तर तो अंधार खोलीतही शिरला होता
आणि त्याने श्रोत्यांना
आपल्या विश्वात सामावून घेतले होते;
झाडांमधून वाहताना वेणूनाद करणारा वाराही
त्या महान गायकाचे गाणे ऐकण्यासाठी
जागीच थबकला होता.
बाहेर भूतकाळातील दृश्यांची एक दीर्घ मालिका सरकत होती:
कुटुंबासोबत बैलगाडीतून जत्रेला जाणारे एखादे मूल;
गावातील तलावात सूर मारून पोहताना
आपले कौशल्य दाखवणारा एखादा किशोर,
जो त्याच वेळी आंघोळ करणाऱ्या मुलींकडे
चोरून नजरही टाकत होता;
शाळेतून परतल्यावर
एखाद्या थकलेल्या मुलाचे मंदावलेले डोळे
पाठ्यपुस्तकाच्या पानांवरून रेंगाळत होते;
सांजवेळेच्या अंधुक प्रकाशात
घरी परतणारा एखादा नवविवाहित तरुण,
ज्याची घाईघाईने पडणारी पावले
त्याच्या जलद धडधडणाऱ्या हृदयाशी
ताल जुळवत होती.
मी उठलो आणि दिवा लावला.
भिंतीवर माझ्या आई-वडिलांची छायाचित्रे होती,
ज्यांना मी सकाळीच
नमन केले होते.
ती छायाचित्रे जणू पुन्हा एकदा
फ्रेममधून खाली उतरली
आणि आशीर्वाद देण्याच्या भावनेने
त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला.
त्यांचा तो क्षीण आवाज उमटणार तोच,
नातवंडांच्या आतुर हाकेत तो विरून गेला:
"लवकर करा आजोबा,
आम्ही सगळे फुगे लावून पूर्ण केले आहेत;
या, मेणबत्त्या विझवा
आणि केक कापा.
तुमच्या तोंडात केकचा घास घातल्याशिवाय
आम्ही तो खाणार नाही."
माझ्या प्रत्येक वाढदिवसाला
प्रेमाने बनवलेली खीर आणि केक खाण्यासाठी
माझी आईही अशीच आतुरतेने
मला हाक मारायची, होय ना?
"येतोय, येतोय," असे म्हणत मी उठलो;
खिडकीतून एक जिव्हाळ सावली आत आली
आणि माझ्या मागोमाग चालू लागली...
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी, सीताकांत महापात्र यांनी त्यांच्या वाढदिवशी लिहिलेल्या कवितेचा हा स्वैर मराठी अनुवाद आहे.
आज 27 सप्टेंबर. सीताकांत महापात्र यांचा वाढदिवस. हा माणूस लिहिता राहो!
- समीर गायकवाड
मला जाणीवही झाली नाही की,
केव्हाच संध्याकाळ झाली होती
आणि बाहेर बऱ्यापैकी अंधार पडला होता;
खरं तर तो अंधार खोलीतही शिरला होता
आणि त्याने श्रोत्यांना
आपल्या विश्वात सामावून घेतले होते;
झाडांमधून वाहताना वेणूनाद करणारा वाराही
त्या महान गायकाचे गाणे ऐकण्यासाठी
जागीच थबकला होता.
बाहेर भूतकाळातील दृश्यांची एक दीर्घ मालिका सरकत होती:
कुटुंबासोबत बैलगाडीतून जत्रेला जाणारे एखादे मूल;
गावातील तलावात सूर मारून पोहताना
आपले कौशल्य दाखवणारा एखादा किशोर,
जो त्याच वेळी आंघोळ करणाऱ्या मुलींकडे
चोरून नजरही टाकत होता;
शाळेतून परतल्यावर
एखाद्या थकलेल्या मुलाचे मंदावलेले डोळे
पाठ्यपुस्तकाच्या पानांवरून रेंगाळत होते;
सांजवेळेच्या अंधुक प्रकाशात
घरी परतणारा एखादा नवविवाहित तरुण,
ज्याची घाईघाईने पडणारी पावले
त्याच्या जलद धडधडणाऱ्या हृदयाशी
ताल जुळवत होती.
मी उठलो आणि दिवा लावला.
भिंतीवर माझ्या आई-वडिलांची छायाचित्रे होती,
ज्यांना मी सकाळीच
नमन केले होते.
ती छायाचित्रे जणू पुन्हा एकदा
फ्रेममधून खाली उतरली
आणि आशीर्वाद देण्याच्या भावनेने
त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला.
त्यांचा तो क्षीण आवाज उमटणार तोच,
नातवंडांच्या आतुर हाकेत तो विरून गेला:
"लवकर करा आजोबा,
आम्ही सगळे फुगे लावून पूर्ण केले आहेत;
या, मेणबत्त्या विझवा
आणि केक कापा.
तुमच्या तोंडात केकचा घास घातल्याशिवाय
आम्ही तो खाणार नाही."
माझ्या प्रत्येक वाढदिवसाला
प्रेमाने बनवलेली खीर आणि केक खाण्यासाठी
माझी आईही अशीच आतुरतेने
मला हाक मारायची, होय ना?
"येतोय, येतोय," असे म्हणत मी उठलो;
खिडकीतून एक जिव्हाळ सावली आत आली
आणि माझ्या मागोमाग चालू लागली...
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी, सीताकांत महापात्र यांनी त्यांच्या वाढदिवशी लिहिलेल्या कवितेचा हा स्वैर मराठी अनुवाद आहे.
आज 27 सप्टेंबर. सीताकांत महापात्र यांचा वाढदिवस. हा माणूस लिहिता राहो!
- समीर गायकवाड
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा