Thursday, December 29, 2016

ए लेटर टू राजेश खन्ना ...


'आनंद मरते नही' असं तू सांगून गेलास. पण तू मरावास असं तुझ्याच लोकांना वाटत होतं की काय अशी शंका कधी कधी मनात येते. तुझे स्वप्न होते की, तुझ्यापश्चात कार्टर रोड स्थित तुझ्या निवासस्थानाचे संग्रहालयात रूपांतर व्हावे. तुला अखेरच्या ध्यासपर्वाची चाहूल लागल्यागत तू बोलून गेला होतास.


Wednesday, December 28, 2016

'हिमालय की गोद में' - चांद सी मेहबूबा .....आपण जिच्यावर प्रेम करतो किंवा जिला आपण आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडतो ती देखणी वा सौंदर्यवती असावी असाच विचार केला पाहिजे का ?
की, त्या ऐवजी असा विचार असावा ज्यात आपल्या मनाच्या अपेक्षेनुरूप, आपल्या विचारांशी साधर्म्य राखणारया सखीला आपण जीवनसाथी म्हणून निवडलं पाहिजे ?
'चांद सी मेहबूबा हो मेरी, कब ऐसा मैने सोचा था ?' असाच प्रश्न आपण आपल्या मनाला करतो का ? जर तिच्याबद्दलचा आपला विचार केवळ तिच्या बाह्यसौंदर्यापुरताच सीमित असेल तर आपण कुठे तरी चुकतो आहोत याची मनाशी खूणगाठ बांधायला हरकत नाही...Tuesday, December 27, 2016

रेड लाईट डायरीज - कायाचक्र - निर्मला !वय झाल्यामुळे थोराड वाटणारी वेश्या लचके तोडलेल्या देहाची कातडी ढिली झाल्यावर कसे जगते याचं एक अलिखित शास्त्र आहे. मेकअपने चेहरा झाकण्याची मर्यादा संपल्यावर टवाळकीचा विषय होणाऱ्या अशाच एका वयस्क वेश्येची, अभागी निर्मलाची ही पोस्ट...Monday, December 26, 2016

महाकवी सावरकर ...


१३ जुलै १६६० च्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू, बाजींचे बंधू फुलाजीप्रभू आणि सहाशे मावळे जीवावर उदार होऊन, सिद्दी जोहरच्या वेढ्यातून निसटून जाण्यासाठी बाहेर पडले. वीर शिवा काशिद यांनी दिलेले बलिदान बाजींनी आपल्या प्राणाची बाजी लावून व्यर्थ जाऊ दिले नाही. बाजींनी आपल्या रक्ताने घोडखिंड पावन केली अन आपल्या राजाला या संकटातून बाहेर काढताना स्वतःचे प्राण त्यागीले. त्या अभूतपूर्व रणसंग्रामाला, बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्य रक्षणासाठी पावनखिंडीत देह ठेवला त्याला नुकतेच ३६६ वर्षे पूर्ण झालीत. या प्रसंगावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला पोवाडा १९१०च्या दशकात, स्वराज्याच्या चळवळीला खूप स्फुर्तीदायी ठरला होता. आजही हा पोवाडा नुसता वाचला तरी मनगटे आवळतात, मुठी वळतात, धमन्यातले रक्त सळसळून उठते, छाती फुलून येते. स्फुल्लिंग पेटून उठतात.Thursday, December 22, 2016

रेड लाईट डायरीज - किन्नरांच्या (हिजडयांच्या) दुनियेत ....हिजडा किन्नर

कामाठीपुरयाबद्दलचे लेखन वाचून एका वाचकाने तृतीयपंथीयांवर लिहिण्याची विनंती केली होती. तिथल्या अशा व्यक्तीरेखांवर सविस्तर नंतर कधी लिहीन, आज थोडीशी माहिती शेअर करतो. सुरुवात त्यांच्या अंतापासून ; एखाद्या किन्नराचा जेंव्हा मृत्यू होतो तेंव्हा त्याचा चेहरा पांढरया कपड्याने झाकला जातो. कोणालाही त्याचा चेहरा दाखवला जात नाही. त्याच्या अंत्यविधीस किन्नर वगळता कुणालाही सामील होऊ दिले जात नाही. याबाबत जमेल तेव्हढी गुप्तता राखली जाते. याविषयी बोलताना वयस्क किन्नर सांगतात की. "असे करण्यामागचा हेतू असा असावा की, त्या अभागी जीवाला पुन्हा असाच जन्म लाभू नये. या दैन्यातून त्याची मुक्ती व्हावी हे या मागचे कारण असावे." किन्नराची अंत्ययात्रा दिवसा न काढता रात्री काढली जाते.


Friday, December 16, 2016

शब्दसूर्य - नारायण सुर्वे ! एक सृजन विद्यापीठ !!‘ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती.’ फुटपाथवरच्या खुल्या आकाशाखाली असणारया अशा विद्यापीठात शिकलेल्या नारायण सुर्वेनी झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. अन त्या आयुष्यावर, 'एकटाच आलो नाही, युगाची ही साथ आहे' असं रसरशित भाष्य केले. नदी आणि ऋषी यांचे कुळ अन मूळ शोधू नये असे म्हटले जाते. कविश्रेष्ठ नारायण सुर्वे हे मराठी साहित्यातील लाक्षणिक अर्थाने अन आशयघन निर्मितीने कबीर आहेत असं म्हणणे संयुक्तिक ठरेल. कारण १९२६-२७मध्ये मुंबईतील चिंचपोकळीत एका कापडगिरणीसमोर रस्त्यावरील एक अनाथ जीवास गंगाराम गुरुजी सुर्वे या गिरणी कामगाराने उचलून घरात आणले, त्यांची पत्नी काशीबाई सुर्वे यांनी या अश्राप जीवाला पोटच्या मुलासारखे प्रेम दिले.


Thursday, December 15, 2016

'सूर्यवंशम' - थ्रू डिफरंट अँगल ....


'सूर्यवंशम' सेट मॅक्सवर किती वेळा लागला ह्यावर खूप कॉमेंटस आणि विनोद तुम्ही सर्वांनी वाचले असतील. त्याच 'सूर्यवंशम' मधील एका सीनची ही गोष्ट. हिरा हा ठाकूर भानूप्रताप यांचा मुलगा. त्याची गौरीशी लहानपणापासून मैत्री असते. तिच्या मैत्रीपायी त्याची शाळा सुटते, अभ्यासात ढ असणारा हिरा अधिकच बदनाम होतो. मैत्रीचे रुपांतर एकतर्फी प्रेमात होते.


Wednesday, December 14, 2016

स्मिता पाटील - एक डाव विस्कटलेला ....तीस वर्षापूर्वी कालच्या दिवशी स्मिता गेली..... पण ती अजूनही कोटयावधी रसिकांच्या ह्रदयात आपलं स्थान टिकवून आहे. स्मिताच्या आयुष्यातलं राज बब्बरचं येणं तिच्या पालकांना खटकलं होतं त्या मागचं कारण जातभेद, भाषाभेद वा प्रांतभेद नव्हतं. त्या मागचं कारण होती राज बब्बरची स्वार्थी वृत्ती. स्मिता गेल्यानंतर त्याने त्याच्या पहिल्या पत्नीला पुन्हा पहिलं स्थान दिलं. कालांतराने स्मिताच्या मुलाला प्रतिकला हलकेच बाजूला सारले. आता प्रतिक एकीकडे आणि नादिरा - राज एकीकडे राहतात. प्रतिकच्या बाळंतपणात स्मिता गेली. ते दिवस कसे होते यावर स्मिताच्या आई विद्या पाटील यांनी लिहिलंय. हे वाचून स्मिताच्या स्वभावाची आणि राज बब्बरच्या हेकट, स्वार्थी स्वभावाची कल्पना येईल......Saturday, December 10, 2016

'चित्र्या' - एका कुत्र्याची हृदयस्पर्शी कथा ..."आज्जे हे बगचित्र्या वस्तीवरनं हिथं घरात आलाय बग !"
नातवाच्या हाकाटीने कावरीबावरी झालेली मथुराबाई आपल्या जीर्ण झालेल्या इरकली नऊ वारीचा पदर नीटनेटकाच असूनही पुन्हा ठीकठाक करत उजव्या हाताने कपाळावर ओढत ओसरीत आली. जणू काही कुणी जीवाभावाचे माणूस घरी आलंयअन त्याच्या समोर आदबीने जावं तशी मथुराबाई लगबगीने बाहेर आली होती. मथुरा दारापाशी येताच चित्र्याने तिचे हात चाटायला सुरुवात केली तशी मथुराआजीच्या डोळ्याला धार लागली. पदराचे टोक डोळ्याला पुसत ती झपकन आता गेली. त्या बरोबर चित्र्याही आत आला. मथुराआजीने ढेलजेत बसकण मारली अन डोळयाला लागलेली धार पुसू लागली. ते बघून चित्र्या तिच्या पुढ्यात जाऊन बसलाहळूच तिच्या मांडीवर त्याने डोकं टेकवलं. चित्र्याचा श्वास वेगात होत होतात्याच्या छातीचा पिंजरा जोराने खाली वर होत होता. तोंडातून लाळ गळत होतीपाय धुळीने माखलेले होते. मथुराने स्वतःला सावरले आणि प्रल्हादलाआपल्या नातवाला चित्र्याला खायला प्यायला देण्यास फर्मावले.


Tuesday, December 6, 2016

जयललितांचे आयुष्य - सापशिडीचा पट !"जयांच्या आयुष्यात सातत्याने उतार चढाव येत गेले. पण त्या फिरून फिरून नशिबाची व कर्तुत्वाची साथ लाभून वर येत राहिल्या. त्यांचे आयुष्य म्हणजे जणू काही सापशिडीचा पट ! सापशिडीत देखील सुटकेच्या ९९ क्रमाकाच्या शेवटच्या घरापाशी साप असतो तसे त्या त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च स्थानी पोहोचल्या असताना मृत्यूकडून त्यांना कायमची मात खावी लागली. पण त्यातही त्यांनी ७३ दिवस झुंजार बाण्याने लढा दिला मग हार पत्करली. सावज आलं आणि सहजपणे सापाने गिळलं असं त्यांच्या आयुष्यात कुठंच घडलं नाही. खडतर बालपण, यशस्वी रुपेरी कारकीर्द, राजकारणातले शह काटशह, मुख्यमंत्री ते कैदी नंबर ७४०२ आणि पुन्हा मुख्यमंत्री असा रंजक राजकीय प्रवास अशा अनेक घटनांनी हा सापशिडीचा आयुष्यपट रंगलेला आहे......"