मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

दुनियादारी - मुजऱ्याच्या पाऊलखुणा ...

बहुतांश लोकांना वाटते की, नाचगाणे करणाऱ्या सर्व बायका देहविक्रय करत असाव्यात. हे म्हणजे कंट्री बारमध्ये कुणी पाणी जरी प्याला तरी त्याने दारूच ढोसली असं समजण्यासारखं आहे. असो. उत्तर भारतातील सर्व मुख्य शहरातील वेश्यावस्त्यांत देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांव्यतिरिक्त नाचगाणं करणाऱ्या कलावंतीणी आहेत. लखनौ, कानपूर, मेरठ, जालंधर, दिल्ली, आग्रा, पतियाळा, वाराणसी, झांशी, दरभंगा, बिलासपूर, भोपाळ अशी अनेक नावं आहेत. आपल्याकडे चक्क मुंबईच्या कामाठीपुऱ्यातल्या अकराव्या लेनमध्ये एका इमारतीत अगदी देखणं नाचगाणं सादर होतं. बॉलीवूडमधल्या हिरॉईन्स झक माराव्यात अशा लावण्यवतीही इथे आढळतात. असं सांगितलं जातं की 'मुकद्दर का सिकंदर'चा पूर्ण स्टोरीप्लॉट आणि रेखाने साकारलेली जोहराबाई ही इथलीच देण आहे. असो. इथलं नाचगाणं जरी अप्रतिम असलं तरी ते देहमिलनाच्या वाटेवरचे नाही हे नक्की.

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

रेड लाईट डायरीज - तस्नीम आणि चुकलेल्या वाटा

#लोकमत #दुनियादारी #डान्सबार #चुकलेल्या वाटा

एक दशक होतं जेंव्हा डान्स बारमुळे अख्ख्या महाराष्ट्राची तरुण पिढी भयंकराच्या वाटेवर उभी होती. प्रारंभीच्या काळात हे खूळ फक्त महानगरात होतं, त्या नंतर मोठया शहरात ते फ़ैलावलं. यातून मिळणारा अमाप पैसा अनेकांना खुणावू लागला आणि राज्यातील जवळपास सर्व मुख्य शहरात याने पाय रोवले. पाहता पाहता तालुक्यांची ठिकाणे देखील व्यापली गेली आणि शहरांच्या बाहेर असणारे हमरस्ते डान्सबारसाठी कुख्यात झाले. 
#लोकमत #दुनियादारी #डान्सबार #चुकलेल्या वाटा
खेड्यापाड्यातली तरुण मुले देखील याच्या नादी लागली. पुणे मुंबई सारख्या अक्राळ विक्राळ शहरातील काही गटांचे उत्पन्न ही तसे अफाट तगडे होते की ज्यांना कितीही दौलतजादा केली तरी फरक पडत नव्हता.

रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

सदीचे गुलाब - मार्सेलिनी डेसबोर्डेस : फ्रेंच कविता

सदीचे गुलाब.
आज तुझ्यासाठी मला गुलाब आणायचे होते.
खरं तर त्यांनी माझी पोतडी इतकी ठासून भरली होती की,
तिच्या गाठी आवळून बांधाव्या लागल्या होत्या.

गाठी सुटल्या, गुलाब वाऱ्यावर उधळले गेले.
बेभान झालेल्या वाऱ्याने त्यांना समुद्राकडं उडवलं.
पाण्याने त्यांना पुढे नेलं पुन्हा कधी न परतण्यासाठी.
लाटांना लालिमा चढला, जणू दग्ध लाव्हाच !
अजूनही आजच्या रात्रीस माझे कपडे सुगंधित वाटताहेत,
त्या गंधभारीत स्मृतींत जणू श्वासच जारी आहेत !