सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

'नारी आत्मसन्मान' खरेच हवाय का ?..


विख्यात मानसशास्त्रज्ज्ञ सिग्मंड फ्रॉईड यांनी एकदा मनोविश्लेषणाच्या अभ्यासासाठी समान वयाच्या, समान सामाजिक श्रेणीच्या पुरुषांचे दोन गट केले होते. त्यांच्या समोरील स्क्रिनवर काही वाक्ये दाखवली जातील आणि त्यांनी ती वेगाने वाचून दाखवायची असा तो प्रयोग होता. फ्रॉईडनी प्रयोगाचा हिस्सा म्हणून पुरुषांच्या एका गटात अग्रणी (मॉनिटर) म्हणून साजशृंगार केलेल्या एका देखण्या तरुण स्त्रीला अत्यंत उत्तान वेषभूषेत पाठवलं. वाचनाचा प्रयोग सुरु झाला. अगदी साधी वाक्ये त्यांनी दिली होती. जसे की एक गोड केक, आम्ही केस धुतो, वेगाने जाणारी कार इत्यादी. मात्र यांचं वाचन करताना बऱ्याच जणांनी चुका केल्या. काहींनी सांगितलं की एक गोड स्तन, एक गोड लिंग, आम्ही नग्न होतो, वेगाने जाणारी तरुणी इत्यादी. पुरुषांच्या ज्या गटात ललना शिरली नव्हती तिथेही काही चुका झाल्या होत्या मात्र त्या सेक्सशी वा स्त्रीजाणिवा विषयक नव्हत्या हे निरीक्षण त्यांनी नोंदवलं. ज्या पुरुषांनी उच्चारात चुका केल्या होत्या त्यांच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास करताना त्यांना आढळलं की काहींच्या स्त्रीविषयक जाणीव सन्मानजनक नाहीत तर काहींच्या स्त्रीविषयक जाणिवा सेक्सपुरत्या मर्यादित आहेत तर काही पुरुष केवळ स्त्रीलंपट होते, तर काही खरेच प्रेमळ होते. यात ज्यांनी हिंस्त्र शब्द वापरले त्यांचं वैयक्तिक मानसिक आरोग्य ठीक नव्हतं आणि सामाजिक परीघ विस्कटलेला होता. फ्रॉईडचा हा प्रयोग आजही बोलका आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे आजची एक घटना.

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

वाहिन्या आणि समाजमाध्यमांच्या ट्रेंडमागचे गणित...देशभरात जेंव्हा फक्त महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये करोनाच्या केसेसचे हॉटस्पॉट झाले होते, करोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला होता तोपर्यंत हिंदी, इंग्रजी आणि मराठी (होय मराठीही) वृत्तवाहिन्यांच्या स्क्रीनवर चोवीस तासाची स्पेस केवळ आणि केवळ करोनाच्या बातम्यांना होती. अन्य बातम्यांना अगदी नगण्य स्थान होते.
देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या आणि वाहिन्यांचं विशेष प्रेम असणाऱ्या उत्तरप्रदेशमध्ये 5 मार्च ते 11 जून या 99 दिवसात करोनाच्या केवळ 12088 केसेस होत्या. दिवसाला सव्वाशे अशी याची सरासरी होती. 12 जूनला यूपीमध्ये पहिल्यांदाच एका दिवसात पाचशेहून अधिक रुग्ण आढळले. त्यानंतर हा आलेख चढता राहिला.

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

दाढीपुराण...

दाढीपुराण समीर गायकवाड

गावाकडे एक म्हण आहे की 'दिसभर इन्जी आन रात्री दाढी पिंन्जी' ! टुकार मोकार माणसाचं इतकं सार्थ वर्णन कुणी केलं नसेल. दाढीवरची कथाधारित हिंदी म्हण तर फार प्रसिद्ध आहे. शालेय जीवनात आपण ती अभ्यासली आहे. अकबराची अंगठी चोरीला गेल्यानंतर त्याच्या स्नानगृहाबाहेरील पाच दाढीधारी सैनिकांवर बिरबलाचा संशय असतो. त्यातला चोर शोधण्यासाठी बिरबल क्लृप्ती लढवतो आणि सांगतो की आलमारीने साक्ष दिलीय की ज्याने अंगठी चोरलीय त्याच्या दाढीत गवताची काडी आहे. हे ऐकताच चोरी केलेला सैनिक नकळत आपल्या दाढीवरून हात फिरवतो आणि बिरबल त्याला अटक करण्याचे फर्मान काढतो. दाढीनेही चोरी पकडता येते याचे हे उदाहरण होय. लबाड राजकारण्यांना चपखल बसणारी 'आत्याबाईला मिशा आल्या कुणी पाहिल्या' अशा अर्थाचीही म्हण आपल्याकडे आहे. खेरीज 'केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा' हा सुविचार आपण अनेकदा वाचलेला आहे. मात्र आताचा काळ या सुविचाराचा नसून 'एकाची जळते दाढी दुसरा तीवर पेटवतो काडी' या म्हणीचा आहे ! असो. आता दाढीचं काहींना अप्रूप वाटत असेल मात्र लोकांनी 'दाढीला कांदे बांधले' की यातली मेख त्यांना कळेल. आजच्या काळात 'ओटी पसरोनि धरितो मी दाढी । नरकांतुनि येकदां काढी' अशी लोकांची अवस्था झाली आहे. तर सरकारे मात्र 'वर दाढी धरून खाली टाच रागडण्यात' मग्न आहेत. विश्व मराठी कोशातली दाढीची माहिती तर थक्क करते.

दाभोळकर, सुशांतसिंह आणि न्याय...


सध्या जगभरातल्या राज्यकर्त्यांची आणि त्यांच्या सरकारांची वैचारिकता पाहू जाता अर्धवट सोफिस्टांचं जोरदार पुनरागमन होताना दिसतं. फॅसिझमच्याही आधीचा हा जीवनविचार जाणून घेण्यासाठी इसवीसनपूर्व कालखंडात जावे लागेल.
सोफिस्टपासून विस्तारित झालेल्या सोफेस्टिकेटेड या शब्दाचा आपण सर्रास उल्लेख करत असतो.
सोफेस्टिकेटेडचा आपला प्रचलित अर्थ 'सुसंस्कृत सवयी व अभिरुची असलेला' असा आहे.
सोफिस्ट म्हणजे कोण ? तर याचे उत्तर जाणताच आपल्या अवतीभवती अशी अगणित माणसं आढळतील.

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

मुन्नाभाई एमबीबीएस - प्रकाशाची अदृश्य ओंजळ..
आमच्या सोलापूरमधील मीना चित्रपटगृहात 2003 साली डिसेंबरमध्ये लागला होता ‘मुन्नाभाई एमबीबीएस’. विधू विनोद चोपडा लिखित निर्मित मुन्नाभाईचे दिग्दर्शन केले होते राजकुमार हिरानीने. संजय दत्त, अर्षद वारसी, ग्रेसी सिंह, बोम्मन इराणी, जिमी शेरगिल, सुनील दत्त आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या मुख्य भूमिका त्यात होत्या. खेड्यातील एका सेवाभावी दांपत्याचा शहरात राहणारा तरुण मुलगा मुन्नाभाई हा अपहरण, खंडणी अशा अवैध धंद्याचा बादशहा असतो, त्याच्या साथीला सर्किट हा त्याचा मित्र अख्ख्या टोळीसह काम करतो. आईवडील भेटीस यायचे कळताच ही मंडळी मुन्नाभाईच्या ठिय्याचं रुपांतर इस्पितळात करत असतात, मुन्ना डॉक्टर आणि बाकीची मंडळी रुग्ण असल्याची बतावणी करत असतात. पुढे जाऊन मुन्नाला खरेच वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. त्याच्या बालमैत्रिणीवरील प्रेमापोटी तो तिथे रमतो. तिथल्या बऱ्यावाईट गोष्टींवर आपल्या स्टाईलने व्यक्त होतो. अखेरीस त्याचे बिंग उघडे पडते मात्र त्याच्यातला माणूस त्याच्या वाईटपणावर मात करतो जो सर्वांना भावतो अशी रम्य कथा यात होती. ‘मुन्नाभाई’ देशभरात सुपरहिट झाला तसा सोलापुरातही झाला. मात्र इथे त्यावर पब्लिकने अंमळ जास्त जीव लावला कारण त्यातलं वातावरण, त्यातली माणसं, त्यातलं खुलेपण, जिंदादिल तरुणाई या शहराशी मेळ खाणारी होती. सोलापूरची जडणघडणच अशी झालीय की इतिहासाच्या कोणत्याही टप्प्यावर जाऊन पाहिलं तर इथे निवांतपणा अधिक आढळतो, फुरसत असलेली रिकामटेकडी मनमिळाऊ माणसं खंडीभर दिसतात. इथल्या बोलीत एक तऱ्हेचा रफटफ अंदाज आहे आणि इथली तरुणाई काहीशी बेभान नि आव्हानात्मक वाटते, इथे एक प्रकारचा संथपणा आहे जो माणसाला एकमेकाशी व्यक्त व्हायला भाग पाडतो. श्रमिकापासून ते गर्भश्रीमंतापर्यंतचे लोक इथे असले तरी एक सोलापुरी बेपर्वाई आणि कमालीची आपुलकी इथे सर्रास जाणवते. ‘मुन्नाभाई’मध्ये हे घटक ठासून भरलेले असल्याने इथल्या लोकांनी त्यातल्या पात्रात स्वतःला शोधले तर त्यात नवल ते काय ? असो. फिल्मी मुन्नाभाई संजयदत्तच्या असली आयुष्यातला एक योगायोग इथे सांगावा वाटतो.

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

कृष्णशोध...रामायणात एक कथा आहे. श्रीराम आणि लक्ष्मण गंगा नदी पार करतात तेंव्हाचा तो प्रसंग आहे. नदी पार करून नावेतून उतरल्यावर नावाड्याच्या लक्षात येतं की रामचंद्रांच्या स्पर्शाने आपली नाव सोन्याची झाली आहे. तत्क्षणीच त्याच्या मनात एक विचार येतो. तो धावतच आपल्या घरी जातो. काही वेळातच आपल्या पत्नीसह घरातल्या सर्व लहान मोठ्या जिनसा तिथे घेऊन येतो आणि प्रभू रामचंद्रांना विनंती करतो की त्यांनी त्या वस्तूंना स्पर्श करावा. श्रीराम त्याच्या इच्छेचा आदर करतात आणि स्पर्श करतात. त्या सर्व वस्तू सोन्याच्या होतात. हे पाहून लक्ष्मणास विस्मय वाटतो. काहीशा विशादानेच तो त्या नाविकास म्हणतो, तुला त्यांच्या स्पर्शाचा खरा अर्थच कळला नाही, नाहीतर तू त्यांना आपल्या घरी नेलं असतंस आणि आपलं घरच त्यांच्या स्पर्शाने पावन करून घेतलं असतंस. तात्पुरत्या भौतिक सुखाचीच तू अपेक्षा केलीस आणि महत्वाचं सुख तू गमावून बसलास !

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

बैरुत स्फोटाच्या निमित्ताने...मध्यपूर्वेतील देश म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे अरबी वेशातील (थ्वाब) टिपिकल मुस्लिमांचे दृश्य तरळते आणि आपल्याकडे माध्यमांनी दृढ केलेली कडवट मुलतत्ववादाची छबीही दिसते. वास्तवात हे सार्वत्रिक आणि एकमेव सत्य नाही. मध्यपूर्वेतील महत्वाचा देश असणाऱ्या लेबॅनॉनबद्दलची एक विशेष बाब अशी आहे की लेबॅनॉनचा राष्ट्राध्यक्ष मरोनाईट ख्रिश्चन, पंतप्रधान सुन्नी मुस्लिम, संसद अध्यक्ष शिया मुस्लिम तर उपपंतप्रधान व संसद-उपाध्यक्ष ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मीय असणे बंधनकारक आहे. याचं कारण असं आहे की अनेक धर्मीय लोकांचे वास्तव्य असलेल्या लेबेनॉनमध्ये धर्मावर आधारित संसदीय लोकशाही पद्धतीचे सरकार अस्तित्वात आहे. संविधानानुसार देशामधील सर्व 18 धर्म व जातीच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळते. असो...