शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

रेड लाईट डायरीज - नाळेचं कर्ज ...सोबतचा जिन्याचा फोटो श्रेया कालराने काढला आहे. फोटोबद्दल जाणून घेण्याआधी हे वाचलं तर संदर्भ लागतील..
श्रेया फोटोस्टोरीमेकर आहे. भारतीच्या केसमुळे तिची माहिती मिळालेली.
तामिळनाडूमधल्या ईरोडे या शहरातील गांधीनगर या स्लममधील भारतीने स्वेच्छेने वेश्याव्यवसाय स्वीकारत मुंबई गाठली होती त्याला दशकं उलटून गेलीत. कामाठीपुऱ्याची एक खासियत आहे, इथे भाषेगणिक वर्गीकरण असलेल्या इमारती आहेत. कानडी, तेलुगू, उडिया, आसामी, मल्याळी, मराठी, हिंदी अशा बहुतेक सर्व भाषेच्या कन्या इथं राहतात. एके रात्री ईरोडेमधून मुंबईत आलेल्या एका व्यक्तीने भारतीला ओळखलं. खातरजमा करून तिची माहिती तिच्या घरी कळवली. काही दिवसात तिला घेऊन जाण्यासाठी तिच्या घरची मंडळी कामाठीपुऱ्यात आली. ती ऐकत नाही हे लक्षात येताच त्यांनी तिला झोडपायला सुरुवात केली. तिला मारहाण होऊ लागल्यावर बाकीच्या बायका मध्ये पडल्या आणि त्यांनी तिच्या नातलगांना पिटाळून लावलं.

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

आत्महत्त्या केलेल्या आईच्या शोधात...आईच्या आयुष्यात डोकावता येतं का ?
आई हयात नसताना तिच्याजागी स्वतःला ठेवून तिचं दुःख आणि तिच्या इच्छा आकांक्षांचा चुराडा मांडता येईल का ? आईने भोगलेली दुःखे तिला सहन करावा लागलेला दुस्वास, तिची आयुष्यभराची परवड काटेकोर तशीच लिहिता येईल का ? आईच्या इच्छा वासना ; तिच्या भावनांची गळचेपी, न गवसलेलं इप्सित हे सगळं मांडता येईल का ?

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९

सौंदर्यवती दुर्गांची कर्तृत्ववान गाथा...


आजचा रंग हिरवा... 
ही पोस्ट वाचण्याआधी तुमच्याकडून एक प्रॉमिस हवंय, द्याल का प्रॉमिस ? 
खूप काही मागत नाही मी. फक्त तुमची छोटीशी साथ हवीय, मला खात्री आहे पोस्टच्या अखेरीस तुम्ही होकार द्याल. ताजमहाल पाहायला जाल तेंव्हा माझी पोस्ट विसरू नका एव्हढी विनंती लक्षात असू द्यात. 
फोटोत दिसणाऱ्या तरुणीचं नाव आहे शबनम, तिच्यावर ऍसिड हल्ला झाला होता. 

शबनमवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला वाटलं होतं की 
एका प्रसन्न क्षणी शबनम 
इतक्या भयानक ऍसिड हल्ल्यानंतर शबनम मरून जाईल किंवा विद्रुपतेच्या भीतीने घरात बसून राहील, तिच्या आयुष्याची पुरती धूळधाण होईल याची त्याला खात्री होती. हल्ला झाल्याला आता काही वर्षे उलटून गेलीत पण त्या दिवसानंतर शबनमच्या आयुष्यात काहीच भयप्रद वा दुःखद घडलेलं नाही.

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

तुमच्यात मी दुर्गेला पाहतो... - 'रेड लाईट डायरीज'मधल्या दुर्गा...धवल भगवा ... २९-३०/०९/२०१९
सोशल मीडियाच्या आभासी जगातल्या नटलेल्या, सजलेल्या आणि कथित तृप्तीच्या रंगात न्हालेल्या स्त्रियांचे नवरात्रीच्या नवरंगातले फोटो दिसून येतात. या फोटोत आणि या स्त्रियांत खऱ्या भारताचे प्रतिबिंब दिसते का ? या प्रश्नावर माझे उत्तर नाही असे आहे. असो...
नवरात्रीच्या कथित रंगशृंखलेत आजचा रंग केशरी आहे आणि उद्याचा रंग शुभ्रधवल आहे,
हे दोन्ही रंग या एकाच फोटोत आहेत.
फोटोतल्या सगळ्याच जणी देवदासी आहेत...
परंपरा, प्रथा हे आपले दाखवायचे दात आहेत, खरे दात तर मनमुराद शोषणाचे आहेत.

टिप - माझे मत अनेकांना अमान्य असू शकते, त्यात वावगं काही नाही. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ! .. असो .. मुळात नवरात्रीच्या नऊ रंगाच्या साड्यांची कल्पना हीच बाजारू दृष्टीकोनातून माथी मारली गेलीय परंतु त्या फोल कल्पनेने आता रूढीचे स्थान मिळवले आहे ही बाब भूषणावह खचितच नाही...

________________________________________