Monday, May 30, 2016

'आमच्या काळी असं नव्हतं (?)......'आताच्या तरुण पिढीचे प्रेम आणि लग्नाबद्दलचे विचार स्वतःचे असे स्वतंत्र आणि स्वागतार्ह आहेत. यासाठी कधी कधी त्यांचा हेवाही वाटतो. पण काही चाळीशी गाठलेली वा चाळीशी पार केलेली मंडळी याच मुद्द्यावर बोलताना थोडा कद्रूपणा करतात.
'ही पिढी फार नशीबवान बघा नाहीतर आमच्या पिढीला असली सुखं नव्हती' असा सूर जनरली ते आळवत असतात.
मित्रांनो हे तद्दन खोटं असतं, ही धूळफेक असते.


'औदुंबर' आणि बालकवी - मराठी कवितेला पडलेले एक अद्भुत स्वप्न ....औदुंबर ही निसर्गाच्या प्रेमात पडलेल्या हळव्या माणसाने कागदावर चितारलेली शब्दांची एक नक्षीच आहे, ऐल तटावरून पैल तटावरून अंगावर गर्द हिरवाई ल्यालेल्या बेटातून नागमोडी वळणे घेत खळखळत वाहत जाणारया स्फटिकजलांचे तुषार उडवत जाणारया अवखळ झरयाचे चैतन्य या कवितेत आहे. दोन्ही बाजूंनी समृद्ध हिरवाई घेऊन पुढे वाहत जाणारया या झरयाच्या ऐल पैल तटापैकी एका तटावर असणारया हिरवाईच्या पलीकडे असणारया टेकडी लगत एक चिमुकले गाव आहे. कोकणात असे वर्णन आढळणारी अनेक छोटेखानी गावे आहेत, टेकडीच्या एका कुशीत अंग चोरून बसलेल्या कोवळ्या लहानग्यासारखी ही गावे पाहता क्षणी बघणारयाच्या काळजाचा ठाव घेतात. एखादे छोटेसे देऊळ ज्याचे निमुळते टोकदार शिखर अन त्यावर असणारा पिवळट पडलेला कळस मेघांना देखील मोहात टाकत असतो. शंभर एक उंबरयाच्या गावातून हळूच बाहेर पडत असणारी धुरांची नक्षीदार वलये त्या आसमंतात एक वेगळी नशा भरून टाकतात. तांबूस विटकरी रंगाची उतरती छपरे असणारी ती घरे मनात कायमची घर करून राहतात. अशा या रम्य गावाने टेकडीची कूस समृद्ध झाली आहे, अन तिच्या पुढे शेतमळ्यांची गर्दी नजरेत मावत नाही. ही भातशेतीची हिरवी- शेवाळी- पोपटी रंगाची वारयावर डुलणारी गच्च कंच कुरणे अजून भुरळ घालत राहतात.


Thursday, May 26, 2016

आठवणीतले विलासराव...आठवणीतले विलासराव ...
विलासरावांच्या ६०व्या वाढदिवशी ज्येष्ठ पत्रकार श्री.मधुकर भावे यांचे 'राजहंस' हे पुस्तक मुद्रा प्रकाशनने प्रसिद्ध केले होते. त्याचे प्रकाशन त्यावेळचे राज्यपाल रा.सु. गवई यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाची कल्पना भावेंनी विलासरावांना दिली. त्यावर विलासराव त्यांना फोनवर म्हणाले की, " तुम्हाला त्यात ज्या कोणत्या मान्यवरांचे फोटो द्यायचे असतील ते द्या; पण दोन फोटो द्यायला विसरू नका, एक वसंतदादा पाटील यांचा आणि दुसरा माधवराव शिंदे यांचा. पुढे राजहंसचे थाटात प्रकाशन झाले. त्या पुस्तकाची प्रत भावेंनी विलासरावांना दिली. वसंतदादा आणि माधवरावांचे फोटो पाहून ते काहीसे हळवे झाले. कारण तेंव्हा हे दोन्ही नेते जगात नव्हते आणि विलासराव म्हणाले, "तुम्हाला हे दोन फोटो टाकायला सांगितले त्याचे कारण म्हणजे मला वसंतदादांनी राज्यमंत्री करून गृहखाते दिले आणि कॅबिनेट मंत्र्याला देतात त्याप्रमाणे मी राज्यमंत्री असताना मला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री केले."


Monday, May 23, 2016

'शोले'तल्या ध्येयपरास्त 'सांभा'च्या जिद्दी मुलीची यशोगाथा ......१९४६- ४७ चा काळ असेल. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात स्वातंत्र्य मिळायला अवघे काही महिने बाकी होते, मात्र दोन्ही देशात प्रचंड राजकीय - सामाजिक अस्थैर्य माजले होते, अशातच पाकिस्तानातील कराची शहरातला एक किशोरवयीन सिंधी मुलगा त्याच्या आईवडिलांना भारतात जाण्याविषयी विनवत होता.शेवटी कुटुंब विभक्त झाले,


Sunday, May 22, 2016

आम्रपाली…. एक सौंदर्यवती वेश्या ते भिख्खूणी !

Related image
ही कथा आहे भारतीय इतिहासातील सर्वात सुंदर महिलेच्या बिरुदाने विख्यात असलेल्या 'आम्रपाली'चीजिला आपल्या सौंदर्याची किंमत वेश्या बनून चुकवावी लागली. ती कोणाचीही पत्नी होऊ शकली नाही परंतु संपूर्ण नगराची नगरवधू मात्र बनली. आम्रपालीने स्वतःसाठी अशा आयुष्याची निवड केली नव्हतीउलट वैशालीमध्ये शांती आणि गणराज्याची अखंडता कायम ठेवण्यासाठी तिला सर्वांची पत्नी बनवून संपूर्ण नगराकडे सोपवण्यात आले होते.


Saturday, May 21, 2016

रेड लाईट डायरीज - इमान - गोष्टी बुधवारपेठेतल्या ........


पुण्यातल्या बुधवार पेठेत शेवटच्या गल्लीतून खाली आले की तिरंगा हॉटेल लागते. त्याच्या उजव्या बाजूला वळले की आरती बिल्डींग आहे. या पाच मजली इमारतीत वेणाचा गुत्ता आहे. तिचं खरं नाव वेण्णा मात्र सगळे तिला वेणा या नावानेच ओळखतात. रोज सकाळी उशिरा अंघोळ करून ती परकर पोल्क्यावरच तिच्या मुख्य खोलीत ती उभी असतेएका हातात साडीचे एक टोक धरायचेसमोरच्या यल्लम्माच्या तसबिरीला तेच टोक लावून घ्यायचे मग तेच टोक कपाळाला लावून पाया पडल्यासारखे करून ते डाव्या अंगाला परकरच्या नाडीत खोवायचे असा तिचा रोज सकाळचा शिरस्ता. त्या दिवशीही ती एका रांगेत लावलेल्या देवांच्या तस्बिरींसमोर उभी होती. साडी नेसताना उजव्या पायाच्या अंगठ्यात साडीचा काठ दाबून धरत अगदी चापून चोपून साडीचा अर्धा घेर घेऊन झाल्यावर पदराचा काठ ओठाच्या चिमटयात पकडून ती अगदी पायघोळ निऱ्या घालत होती. मात्र तिचे लक्ष दुसरीकडेच आहे हे तिच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होतं. तिला इथं येऊन आता तीसेक वर्षे झालीत. तिचं वय जेमतेम अकरा बारा असेल तेंव्हा तिचा मामा तिला इथं सोडून गेलेलातिचा मामा सख्खा की सावत्र की आणखी कसा यातलं तिला काही आठवत नाही. तिचं आंध्रातलं गाव मात्र तिला अंधुक आठवतं. तिच्या भूतकाळाविषयी बोललेलं तिला आवडत नाहीमग ती तत्काळ विषय बदलते अन मूळ मुद्द्यावर येते. तरीही समोरच्याने ऐकलं नाही तर त्याला सरळ दाराबाहेर काढते. तिला तिच्या गतकाळाविषयी किळस आहेतिच्या मनात उफाळता संताप आहे. दोन पाच वर्षाकाठी ती कधी तिरुपतीला जावून आली की ती प्रचंड अस्वस्थ असते. तिच्या घालमेलीला अंत नसतोदोन तीन दिवस नुसती धुमसत राहते. त्यामुळे तिच्या नावडत्या विषयावर बोलायचं धाडस कुणी करत नाही.


Tuesday, May 17, 2016

आदय क्रांतिकारक उमाजी नाईक - क्रांतीचा गौरवशाली इतिहास...३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्व प्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढले. या थोर आद्य क्रांतीकारकाचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते...
मराठेशाहीतील उत्तरार्धात पेशवाई बुडाल्यानंतर हिंदुस्थानावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला तेव्हा उमाजी नाईकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिले बंड पुकारले म्हणून ते आद्यक्रांतिवीर ठरतात. छत्रपती शिवाजीराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी गनिमीकाव्याने लढत ब्रिटिशांशी झुंज दिली...

~~~~~~~~

ब्रिटिशांनी १८१७ मध्ये भारतात मद्रास लिटररी सोसायटीची स्थापना केली. याच संस्थेकडून मद्रास जर्नल ऑफ लिटरेचर अँड सायन्स नावाचे 

नियतकालिक चालवले जात होते. त्याचे पाच शृंखलात ३८ अंक काढले गेले. १८३३ ते १८९४ या काळात ते प्रकाशित केले गेले. १७५० पासून ते १८९४ पर्यंतच्या विविध ठिकाणी विविध हुद्द्यावर कार्यरत असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बहुपेडी माहितीचं हे संकलन स्वरूप होतं. यात पानाफुलांपासून ते किटकापर्यंत आणि तापमान - पर्जन्यमानापासून ते क्रांतीकारकापर्यंत व जात - वंश भेद इथपर्यंतचे मुद्दे, घटना, व्यक्ती विशेष चर्चिले गेलेत. हे सगळं तटस्थ वृत्तीने केल्याचे जाणवतं. याच उपक्रमा अंतर्गत 'ऍन अकाऊंट ऑफ द ओरिजिन अँड प्रेझेंट कंडिशन ऑफ द ट्राईब ऑफ रामोसीज इनक्लुडिंग लाईफ ऑफ द चीफ उमैया(उमाजी) नाईक' या कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉश लिखित पुस्तकात उमाजी नाईक आणि रामोशी समाज यांचा सविस्तर इतिहास मांडला आहे. अलेक्झांडर मॅकिंटॉश हे मद्रास आर्मीच्या २७ व्या रेजिमेंटमधील लष्करी सेवेत होते यामुळे या ऐतिहासिक दाव्यांना, तथ्यांना महत्व आहे. यात एके ठिकाणी उमाजी नाईक याने बंड केले असा उल्लेख आहे, विशेष म्हणजे बंड हा मराठी शब्द BUND असा लिहिलाय. उमाजी नाईक यांचे प्रेरणास्थान मराठा राज्याचे नायक शिवाजी होते असा महत्वाचा उल्लेख यात आढळतो.


Friday, May 13, 2016

वढू तुळापूरची गाथा .....


राजे, इथल्या पाण्यात अजूनही तुमचे प्रतिबिंब दिसते, 

हताश झालेला औरंग्या दिसतो, त्या दिवशी अबोल झालेली इथली सृष्टी अजूनही तशीच थबकून आहे ! 
राजे इथे तुमच्या किंकाळ्या कुठेच ऐकायला येत नाहीत वा ना हुंदके ऐकायला येतात ! 
कवीराज कलश यांचे थोडेसे उमाळे मात्र इथल्या हवेत अजूनही ऐकता येतात ! ज्यांनी तुमचा छळ केला ते रात्र रात्र झोपू शकत नसत त्यांच्या कन्हण्याचा आवाज मात्र इथल्या मातीला कान लावला की ऐकायला येतो ! 
राजे तुमची जिव्हा जेंव्हा कापली त्या दिवशीपासून इंद्रायणी जी अबोल झाली ती आजतागायत मूक बनून राहिलीय ! 


मुघलपूर्व भारत अन हिंदूंचे पतन ....एक वेध इतिहासाचा... -मुघलपूर्व भारतीय उपखंडाचा इतिहास अभ्यासल्यावर असे दिसून येते की इस ५०० पर्यंत गांधार, हुण -श्वेतहुंण (आताच्या अफगाणीस्तानातील कंदहार), तक्षशीला - सिंध, मुलतान (आताच्या पाकिस्तानातील ताक्सिला ), आताच्या ब्रम्हदेश - बांगलादेश पर्यंत असणारे पाटलीपुत्रचे विशाल साम्राज्य, दक्षिणेकडे पांड्य,चोल आणि थेट आताच्या श्रीलंकेत असणारे ताम्रपर्णी साम्राज्य असे चौफेर विविध राजवटी आणि राज्यांचा विस्तार होता. हिंदुस्तान वा भारत नावाचा सलग भूप्रदेश जरी तेंव्हा अस्तित्वात नव्हता तरी सर्व राज्ये - राजवटी गैरमुस्लीम आणि हिंदूबहुल होती. मात्र जसजशी शतके उलटत गेली तसतसे मुसलमानी आक्रमक सत्ताविस्तार, भूविस्तार, लूटमारी आणि धर्मप्रसार यासाठी आक्रमण करत गेले आणि इथले शासक बनून गेले. हा सर्व इतिहास इस ६१५ ते इस १७००च्या दरम्यानचा आहे. इस्लामी आक्रमकांनी इथल्या राजवटी कशा ताब्यात घेतल्या आणि तेंव्हाचा हिंदूशासित प्रदेश इस्लामी राज्यकर्त्यांचा कसा अंकित होत गेला यावर प्रकाश टाकणे हा या लेखाचा हेतू आहे.Thursday, May 12, 2016

अल्लाउद्दिन खिलजी ते शिवछत्रपती .....

 

एक काळ होता जेंव्हा खरोखरच महाराष्ट्रावर वर्षांतील बाराही पौर्णिमा सुखाचे चांदणे शिंपीत होत्या. अन् शेकडो वर्षांपूर्वी मोठा घात झाला. चंद्राला अकस्मात खळे पडले. कसे पडलेकेव्हा पडले ते कुणाला समजलेच नाही. विंध्याचलाच्या मागून धुळीचे लोट उठले. आठ हजार घोडय़ांच्या बत्तीस हजार टापा वाढत्या वेगाने आणि आवेशाने खडाडत महाराष्ट्रावर चालून आल्या. त्यांचा आवेश कत्तलबाजांचा होता..
त्यांचा म्होरक्या होता अल्लाउद्दीन खिलजी पठाण. त्याचा युद्धपुकार अस्मान फाडीत होता. ती पठाणी फौज नर्मदा ओलांडून सातपुडय़ाच्या माथ्यावर चढली. पठाणांची पहिली झडप पडली एलिचपुरावर. हंबरडे आणि किंकाळ्या फुटल्या. परचक्र आले. महाराष्ट्रावर परचक्र आले. थोडे दिवसच आधी महाराष्ट्रातील संतांची दिंडी उत्तर हिंदुस्थानात यात्रांना जाऊन आली होती. त्यांनी सुलतानांची सत्ता पाहिलीकाही कठोर कडवट अनुभव घेतले. लोकांना सांगितले होते. तरीही राजा आणि राज्य गाफील होते..


निळू फुले ....एक बहुआयामी व्यक्तिमत्व..


"मी स्त्रीचा असा स्वतंत्रपणे विचार केलेला नाही. मी संसारालासुध्दा लायक नाही. तसंही मला कळतं की, स्त्री देहाशी जवळीक किंवा आपण जे काही दिवसभर केले ते कुठेतरी बोलून दाखवण्याची जागा आणि मग शारीरिक संबंध, हे कुठेही अडचणीचं होता कामा नये. असं असणं त्या वेळी फार कटकटीचं होतं. एखादी स्त्री माझ्यात इन्व्हॉल्व्ह झाली आणि ती मला व्यापून टाकायला लागली की मला नाही आवडत. तिनं कब्जा करता कामा नये. तिने वेसणही घालू नये. आणि तिनं सातत्यानं माझ्या जवळ असणं, हेही मला आवडत नाही. माझे जे मित्रमैत्रिणी आहेत, ते स्वतंत्र आहेत आणि ते तुम्हालाही तसेच स्वतंत्र ठेवू इच्छितात. कोणी आपलं आयुष्य व्यापून टाकावं आणि कोणाला आपण व्यापून राहणं हे त्यांनाही आवडत नाही. अशी स्त्री-मैत्री असू शकते. असे काही मित्र आहेत ज्यांची नावे घेणे बरे नाही, पण आहेत. ते एकमेकांना कुठेही जड होत नाहीत. एकमेकांना कुठेही ऑकवर्ड करीत नाहीत. ते एकत्र येतात, एकत्र राहतात आणि निघून जातात, ते कळवतसुध्दा नाहीत. पुन्हा ते अधिक चांगल्या पध्दतीने एकत्र येऊ शकतात. एकमेकांच्या व्यक्तिगत, खाजगी जीवनाबद्दल कसलाही बिलकुल संबंध नाही, आकस नाही, नुसता सहवास..." - इति निळू फुले.शिंदेशाहीचा दैदिप्यमान इतिहास .....


शिवकालानंतर मराठ्यांच्या इतिहासातली रणांगणावरची सर्वोच्च पराक्रमाची शर्थ म्हणून पानिपताकडे पाहिले जाते. या सर्व धामधुमीच्या कालखंडात ज्या मराठा सरदारांनी आपल्या शौर्याची शिकस्त केली त्यात शिंदे घराणे अग्रस्थानी होते आणि पानिपतात गेलेली पत परत आणण्याचे महत्कार्य करणारे शिंदे होळकर यांचा इतिहास हा भव्य आणि उत्तुंग आहे. यातही शिंदे घराण्यातल्या महादजी शिंद्यांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी व पराक्रम अलौकिक असा आहे. महादजी शिंद्यांनी उत्तर हिंदुस्थान आपल्या कब्जात घेतला होता. मध्यंतरी ज्या गोवध हत्या बंदीवरून आपल्या देशात गदारोळ माजला होता ती बंदी महादजींनी १७८५ मध्ये शहाआलम या मुघल बादशहाला आपली कठपुतळी बनवून अंमलात आणली होती. मुघल बादशहा सत्तेत असूनही हा फतवा त्यांनी अमलात आणला होता यावरून महादजींचे दिल्लीवरील वर्चस्व लक्षात यावे. उत्तर भारताचा प्राण असणारा मध्य - पूर्वेचा भाग आपल्या टापाखाली ठेवणारे धोरणी राणोजीसर्वांग जखमांनी भरलेले असतानाही बचेंगे तो और लढेंगे असं म्हणण्याची जिगर ठेवणारे दत्ताजीवयाच्या १६ व्या वर्षी नजिबाच्या गुरुचे कुतुबशहाचे मुंडके जमदाडाच्या एका वारात तोडणारे अन पुढे पानिपतावर हौतात्म्य पत्करणारे जनकोजीकाळाची पावले ओळखून आपला विकास साधून घेणारे जयाजी व माधवरावस्वातंत्रोत्तर काळात राजकारणात आपली पत राखणारया विजयाराजे अन त्यांचे पुत्र माधवरावअन आताच्या काँग्रेसमधील एक आशास्थान असलेले ज्योतिरादित्य शिंदे असा यांचा छोटेखानी परिचय देता येईल. ग्वाल्हेरचे संस्थानिक म्हणून ओळखले जात असलेल्या शिंदे घराण्याचा इतिहास सुरु होतो राणोजी शिंदयांपासून.....


Wednesday, May 11, 2016

माहेरवाशिण.....एका जिद्दी स्त्रीची कथा ...


कालचीच गोष्ट आहे. चिलारीच्या माळावर असणार्‍या बायडाबाईच्या खोपटात दोन दिवसापासून लगबग चालली होती. बायडाबाईची म्हैस व्यायला झाली होतीम्हातारी बायडाबाई सदानकदा तिच्या पुढयात तर जाऊन बसायची नाही तर तिच्या बाजूला बसून तिच्या पाठीवरून हात फिरवत राहायची. नातू बन्सीधर तिची लगबग आपल्या डोळ्यात साठवत तिच्या उठबशीत बारीक सारीक मदत कारायचा. साठीच्या घरातली बायडाबाई दशरथ पाटलाची दुसरी बायको होती. दशरथ पाटील म्हणजे रोमनाळ गडी. त्याचं सारंच काम आडमाप होतं. संसार देखील त्यानं बाभळीच्या वाकडया फाटयासारखाच केला होता. त्याची पहिली बायको सावित्री अत्यंत देखणी होतीनाकी डोळी नीटस आणि खानदानी कुळातली सावित्री दशरथ पाटलाला एकदम शोभून दिसायची.


गोब्राम्हण - जुन्या वादाला नवी फोडणी !"आजवर शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला. ज्ञान देण्याची मक्तेदारी विशिष्ट वर्गाकडे असल्याने त्यांना अभिप्रेत असलेला इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी होते, अशी प्रतिमा तयार करण्यात आली. आजही विशिष्ट भूमिका समाजासमोर मांडण्याचे आणि तरुणाईच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना मिळणारे यश अस्वस्थ करते", अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली आणि राज्यात एकच धुरळा उडाला.


Tuesday, May 10, 2016

मराठ्यांच्या इतिहासातील भाऊबंदकी ... कोल्हापूर - सातारा गादी !


#१२जानेवारीचे दोन संदर्भ - एक अतिव सुखाचा तर एक भाऊबंदकीचा...
१२ जानेवारी हा जिजाऊ मांसाहेबांचा जन्मदिवसज्या जिजाऊनी शिवराय घडवलेस्वराज्याची आस जागवली अन एक भव्य दिव्य स्वप्न नुसते पाहिलेच नाही तर प्रत्यक्षात आणले त्यांचा जन्मदिवस म्हणजे तमाम मराठी माणसांचा आनंदोत्सव !! हा खरा सणज्यांनी आपल्या सर्वांचे स्वराज्य निर्मिले त्यांचा हा जन्मदिन !! त्यामुळे आजच्या या १२ जानेवारीचे महात्म्य कैक पटीने वाढले ! १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा (आजच्या बुलढाणा जिल्ह्यातले) इथे लखुजी जाधवरावांच्या घरी त्यांचा जन्म झाला अन सह्याद्रीपासून ते भीमा-गोदाच्या प्रवाहावर आनंदाचा रोमांच आला. जिजाऊ मांसाहेबांच्या जन्मामुळे १२ जानेवारीचा संदर्भ आत्यंतिक आनंदाचा होऊन गेला आहे. पण ज्या जिजाऊनी मराठ्यांच्या शौर्याचे बीज रोवलेज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले ज्यांनी स्वराज्यनिर्मितीसाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्या जन्मदिनाच्याच तारखेला ११० वर्षांनी मराठी स्वराज्यात दुही माजलीभाऊबंदकी झाली ! या दिवशी झालेल्या घटनेतून बोध घेऊन प्रत्येक मराठी माणसाने आपसातले वाद नक्कीच टाळले पाहिजेत नाहीतर १२ जानेवारीचा हा दुसरा संदर्भ आपल्याला आयुष्यभर अणकुचीदार दुहीचे भाले टोचवत राहतील....


स्त्रीत्वाची कोंडी - 'आई' ! प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या 'आई' पुस्तकाचा रसास्वाद ..."जायची चार वाजताची वेळ होत आली. ती हट्टानं अधिकच बेभान झाली. मी जाणार नाही हं !- तिचा पक्का निश्चय. तिच्या लक्षात आलं, बाळाला हे सोडून मला नेणार. तिला तिचा कुक व 'तो' दोघांनी दोन्ही बखोट धरून बेडरूमच्या दारापर्यंत खेचून आणलं. तिने दोन्ही पायाचे पंजे उंबरयाला घट्ट टेकवून दोन्ही हात दाराच्या चौकटीला दाबून धरले. "मला बाळाला टाकून नाही जायचं...मी नाही जाणार." दोघांनी सारी त्यांची ताकद पणाला लावली.तिला बाहेर काढली अन अक्षरशः फरफटत ओढीत बाहेरच्या दारापर्यंत आणली. ते सारं पाहून मी जमिनीवर कोसळलेच. तिची गाडी जसलोकच्या गेटपर्यत पोहोचली अन ती कोमात गेली ती अखेरपर्यंत. तिला कृत्रिम लंग्जवर ठेवून, १३ तारीख उलटली आणी बाळाच्या बारश्यापासूनची त्याची स्वप्नं पाहणारी एक बाळवेडी 'आई' त्याला सोडून कायमची निघून गेली. दुःखाचा डोंगर कोसळला, बाळाला क्षणभरही पापणीआड न करणारी. आईपणाला अखंड आसुसलेली ही थोर आई तिच्या बाळासाठी फक्त एक स्वप्न बनून राहिली.....


Monday, May 9, 2016

शहीद भगतसिंह आणि हिंदुत्व - एक विरोधाभास ...

"एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल,
भगतसिंह 
एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणार्‍या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे की ज्याक्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.


Tuesday, May 3, 2016

प्रेमस्वरूप आई - माधव ज्युलियन ....एक धांडोळा ...


प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई ! 

माधव ज्यूलियन
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,

तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.
चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

ही भूक पोरक्याची होई न शांत आई,

पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही.
वाटे इथून जावे, तूझ्यापुढे निजावे,
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परि हे केव्हा स्थिरेल डोके,

देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?
घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !


रेड लाईट डायरीज - नाझनीन - रेड लाईट एरियातील वर्तुळपुण्यातल्या बुधवार पेठेत श्रीनाथ थिएटरच्या उजव्या बाजूने पुढे गेले की 'आफताब मंजिल' इमारत आहे. सारया बुधवार पेठेत अशा अनेक बहुमजली इमारती आहेत, ज्यात कोंबडयांच्या खुराडयासारख्या खोल्या आहेत. इथं बायकांचा बाजार चोवीस तास भरलेला असतो अन उष्ट्या तोंडाची लाळ गाळत फिरणारी आशाळभूत पुरुषी गिधाडं सदोदित पाहायला मिळतात. या आफताब मंजिलच्या जिन्याच्या तिसरया मजल्यावरील पायरयांवर म्हातारा झालेला विलास अंगाचे मुटकुळे करून पडून असायचा. सगळ्या अंगावर तेलकट धुळीची पुटं चढलेली, कपडे फाटून त्याची लक्तरे झालेली, हातापायाची पिवळी नखे वाढून वाकडीतिकडी झालेली, तळव्यांना मातीचे चिकट थर चिकटलेले, डोळ्याच्या पापण्या नेहमी अर्ध्या मिटलेल्या अन डोळ्याखाली मोठाली काळीवर्तुळे, चेहऱ्यावर पांढरी पिवळी दाढी वाढलेली अन डोक्यावर विस्कटलेले राठ कोरडे केस, काळ्या शुष्क ओठांना भेगा पडलेल्या, गालफाडे आत गेलेली अन समोरचे दात पडल्याने जबडे ढिले झालेले अशा चिंधूकलेल्या अवस्थेत एका जीर्ण फाटक्या सतरंजीच्या तुकडयावर तो पोटात पाय दुमडून पडलेला असे. विलासच्या देहाची वळकटी जिथे असे तिथेच एक काळपट जर्मनचा वाडगा त्याच्यासारखाच निपचित पडून असे.


कंदहार - हिंदूकुश पर्वतरांगा . एक रोचक शोध - इतिहास ...


क़ीमत, क़ुरबानी हे जसे खालच्या बिंदूचे उर्दू उच्चारण असलेले उर्दू शब्द आहेत तसाच क़ंदहार हा शब्द देखील आहे. आपले काही इतिहास अभ्यासक आणि संशोधक कंदहार शहर - प्रांत म्हणजे आपल्या ग्रंथ पुराणात उल्लेख असलेले काही हजार वर्षापूर्वीचे गांधार हे राज्य समजतात. तसेच उर्दू - पर्शियन इतिहास अभ्यासक या शहराला सिकंदरने (द ग्रेट वॉरियर) स्थापन केलेले सिकंदरिया हे शहर मानतात. आजच्या घडीला हे शहर तालिबानी कट्टरवाद्यांचे प्रमुख आश्रयस्थान आहे. अफगाणीस्तानच्या दक्षिणेकडील हा सर्वात अस्थिर प्रांतापैकी एक आहे, याची दक्षिणेकडील सीमा पाकिस्तानच्या उत्तरेस लागून आहे. पश्तून ही इथली मुख्य भाषा आहे. कंदहार येथील उत्खननात सापडलेल्या चीजवस्तूंना मोठे ऐतिहासिक मुल्य आहे कारण त्याचा कालखंड !