रविवार, १८ ऑक्टोबर, २०२६
'चोरबागान' दुर्गापूजेचा इतिहास आणि उत्सवाला लागलेले गालबोट!
कोलकाता येथील ऐतिहासिक 'चोरबागान सर्वोजनिन दुर्गा पूजा समिती'च्या मांडवाच्या एक्झिट गेटपाशी चेंगराचेंगरी होऊन 19 लोकांना आपला जीव गमवावा लागला ही माहिती एव्हाना सर्वांपर्यंत पोहोचली असेलच. ह्या दुर्गा पूजा समितीच्या यंदाच्या आगळ्या वेगळ्या दुर्गा मूर्ती विषयी आणि चोरबागान विषयीची ही पोस्ट.
सोबत दिलेल्या फोटोवरून लक्षात येते की, मातीच्या नैसर्गिक स्वरूपात दिसणारी दुर्गा मूर्ती अगदी निःशस्त्र आहे! चोरबागान मंडळाच्या 91 व्या वर्षाच्या उत्सवा निमित्त एका विशेष उद्देशाने मातीच्या रंगाची आणि शांत रूपातील मूर्ती स्थापित केलीय.
यंदाच्या पूजा मंडळाची संकल्पना 'अ-रव', म्हणजेच आवाजापलीकडील शांतता किंवा शांत वातावरण, ही आहे. पारंपारिक महिषासूरमर्दिनीच्या रौद्र, आक्रमक किंवा युद्धोत्सुक रूपाऐवजी, येथे देवी दुर्गा आणि तिची मुले अत्यंत गहन ध्यानमुद्रेत लीन असल्याचे दाखवलेय.
जगभरात सुरू असलेला हिंसाचार, युद्ध आणि शत्रुत्वाच्या वातावरणात शांतता, संयम आणि स्थिरता यांचा प्रसार व्हावा, असा संदेश या मूर्तीद्वारे आणि संपूर्ण पंडालच्या रचनेतून देण्यात आला होता. यामध्ये महिषासूरसुद्धा देवीसमोर आपली शस्त्रे समर्पित करताना दाखवलाय.
शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६
कोकणातले दिवस - रवींद्र पिंगे!
'त्याचा ठसका थेट मस्तकापर्यंत उसळे आणि हाताचा वास दोन-दोन तास घमघमे. नंतरचं गोड काम म्हणजे कलमी आंब्याच्या फोडींवर ताव मारणं. आंबे किती मटकावले त्याचा फालतू हिशेब कोण कशाला ठेवणार? ते स्वादिष्ट जेवण मनसोक्त रेटायचं, वर बावीचं गारगार पाणी घटाघटा प्यायचं, वाऱ्याच्या दिशेला सतरंजी टाकून नंतर घामानं निथळत झोपी जायचं हा दिवसभराचा उद्योग.'
'झोपून उठल्यावर संध्याकाळी फुलपात्र भरून गरमागरम चहा घेतला की, हातात काठी घेऊन घाटी पकडायची. वर रानात जीव रमवायचा नि आभाळ गोळा व्हायला लागलं की माघारी यायचं. रात्री तांबडा गरम भात, बडग्यांची आमटी, कधी कुळथाचं पिठलं. कधी गऱ्यांची फोडणीची भाजी. रातांब्यांचं तिखट सार किंवा सोलकढी आम्ही अंगतपंगत करून कंदिलाच्या उजेडात जेवायचे. जेवणे यथासांग आटोपली आणि भांडीकुंडी नीट जागेला लागली, की मोकळ्यावर अंगणात बसून दुस-यांच्या इस्टेटींच्या गप्पा मारायच्या..'
शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२६
औरंगजेब ते लियाकत अली खान .....

मुघल सम्राट शहाजहान हा 1658 मध्ये आपल्या मुलाकडून औरंगजेबाकडून कैदेत बंदिस्त झाला, औरंगजेबाने आपला सख्खा भाऊ दारा शुकोह याचा मुडदा पाडला आणि मुघल सम्राटाची गादी कब्जा केली. जवळपास 300 वर्षांनी हाच इतिहास पाकिस्तानात थोड्याफार फरकाने पुन्हा घडला. वास्तविक पाहता आपल्या स्पर्धकांना बंदी बनवणे अथवा ठार मारणे ही मुघलकालीन खुनशी परंपराच झाली होती. हीच परंपरा पाकिस्तानात थोड्याफार फरकाने सुरु राहिली. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नाह यांनी अट्टाहास करून अखंड भारताची फाळणी करून 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान पदरात पाडून घेतला, पण 11 सप्टेबर 1948 ला त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पुढे त्यावरून अनेक तर्क वितर्क लढवले गेले....
मोहम्मद अली जिन्ना यांनी स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीत निर्णायक राजकीय भूमिका बजावली होती. नव्या देशाच्या संस्थात्मक उभारणीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच त्याच्या संस्थापकांची प्रकृती गंभीररीत्या खालावली होती. जिन्ना दीर्घकाळ क्षयरोगाने त्रस्त होते आणि त्यांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचाही त्रास असल्याच्या वैद्यकीय नोंदी आहेत. त्यांचा आजार सार्वजनिकरीत्या मोठ्या प्रमाणावर उघड केला गेला नव्हता. नव्याने जन्मलेल्या देशाचे नेतृत्व करत असताना त्यांचे शरीर मात्र साथ सोडत चालले होते.
बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२६
निळाई आणि भारत!
फार पूर्वीपासून, निळा रंग हा वस्त्र रंगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात सामान्य रंगांपैकी एक आहे. आजच्या काळात कापडांना रंग देण्यासाठी लागणारे बहुतांश रंग कारखान्यांमध्ये कृत्रिमरित्या तयार केले जातात, इतिहासात मात्र कापडांना रंग देण्यासाठी नैसर्गिक रंगांची आवश्यकता असायची.
भूतकाळात, निळा हा अशा तेजस्वी रंगांपैकी एक होता, ज्यासाठी फारसे नैसर्गिक पर्याय उपलब्ध नव्हते. निळ्या रंगाचा एकमेव नैसर्गिक स्रोत म्हणजे नीळ वनस्पती होती. ऐतिहासिकदृष्ट्या भारतानेच या वनस्पतीचा वापर घरगुती स्तरावर आणला. इंडिगोफेरा टिंक्टोरिया नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती एक झुडूप असून, प्राचीन काळापासून भारताच्या विविध भागांमध्ये तिची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात होती.
सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२६
अटोन्मेंट - चुकांचा असह्य पश्चाताप!
चित्रपटाची कथा 1935 च्या इंग्लंडमधील एका मोठ्या राजवाड्यात सुरू होते. टॅलिस कुटुंबाची तेरा वर्षांची मुलगी ब्रायोनी टॅलिस ही अत्यंत कल्पक आणि महत्त्वाकांक्षी कुमार वयीन लेखिका. तिच्या सभोवतालच्या गोष्टींना ती स्वतःच्या कल्पनेत रंगवून पाहत असते.
आज्जी नातवाची गोष्ट - 'द पोर्ट्रेट ऑफ अ लेडी'!
कथेचे नायक असलेले खुशवंत सिंग, आपल्या आज्जीच्या वर्णनाने कथेची सुरुवात करतात. आज्जी, अत्यंत वृद्ध, चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे असणारी आणि कंबरेत किंचित वाकलेली काहीशी थकलेली स्त्री. ती नेहमी शुभ्रधवल वस्त्रे परिधान करायची आणि एका हाताने जपमाळ ओढत घरात वावरायची. तिचे रूपडे विलक्षण देखणे नसले तरी तिच्या चेहऱ्यावर एक दैवी शांतता आणि पवित्रता होती, ज्याची तुलना खुशवंत सिंग, हिवाळ्यातील बर्फाच्छादित पर्वतराजीशी करतात.
शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६
गांधीजींना नोबल पुरस्कार का मिळाला नाही?
12 वेळा नामांकन मिळाल्यानंतर तरी गांधीजींना नोबल पुरस्कार नक्की मिळायला पाहिजे होता, असे आजही अनेकांना वाटते त्यांनी हा लेख अवश्य वाचावा. त्यांच्या शंकांची उत्तरे नक्की मिळतील.
हा लेख आयविन टोनसन यांनी लिहिला आहे. ते एक विख्यात नॉर्वेजियन इतिहासकार आहेत आणि अॅग्डर विद्यापीठाल आंतरराष्ट्रीय इतिहासाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. नोबेल शांतता पुरस्काराच्या इतिहासाचे ते तज्ञ आहेत. त्यावर त्यांनी पीएचडी केली आहे. मूळ लेखाचा हा मराठी अनुवाद -
मोहनदास गांधी (1869 -1948) हे विसाव्या शतकातील अहिंसेचे सर्वात प्रबळ प्रतीक बनले आहेत. आता मागे वळून पाहताना असे वाटते की, याच भारतीय राष्ट्रीय नेत्याची नोबेल शांतता पुरस्कारासाठी निवड व्हायला हवी होती. त्यांना अनेक वेळा नामांकन मिळाले, पण त्यांना हा पुरस्कार कधीच प्रदान करण्यात आला नाही. का?
हे प्रश्न वारंवार विचारले गेले आहेत: नॉर्वेजियन नोबेल समितीची दृष्टीकोन खूपच संकुचित होता का? समितीचे सदस्य युरोपाबाहेरील लोकांच्या स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व जाणू शकले नाहीत का? किंवा नॉर्वेजियन समितीचे सदस्य कदाचित असा पुरस्कार देण्यास घाबरत होते, जो त्यांच्या स्वतःच्या देशाचे आणि ग्रेट ब्रिटनचे संबंध बिघडवू शकेल?
गांधींना 1937, 1938, 1939, 1947 मध्ये आणि अखेरीस, जानेवारी 1948 मध्ये त्यांच्या हत्येच्या काही दिवस आधी नामांकन मिळाले होते. अखेरचे नामांकन वेळेत न मिळाल्याबद्दल नोबेल समितीच्या नंतरच्या सदस्यांनी जाहीरपणे खेद व्यक्त केला आहे; जेव्हा 1989 मध्ये दलाई लामा यांना शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला, तेव्हा समितीच्या अध्यक्षांनी म्हटले होते की ही, “अंशतः महात्मा गांधींच्या स्मृतीला दिलेली आदरांजली” होती. तथापि, गांधींना हा पुरस्कार का दिला गेला नाही, याबद्दलच्या अटकळांवर समितीने कधीही भाष्य केलेले नाही आणि अलीकडेपर्यंत या प्रकरणावर प्रकाश टाकू शकणारे स्रोत उपलब्ध नव्हते.
मोहनदास गांधी (1869 -1948) हे विसाव्या शतकातील अहिंसेचे सर्वात प्रबळ प्रतीक बनले आहेत. आता मागे वळून पाहताना असे वाटते की, याच भारतीय राष्ट्रीय नेत्याची नोबेल शांतता पुरस्कारासाठी निवड व्हायला हवी होती. त्यांना अनेक वेळा नामांकन मिळाले, पण त्यांना हा पुरस्कार कधीच प्रदान करण्यात आला नाही. का?
हे प्रश्न वारंवार विचारले गेले आहेत: नॉर्वेजियन नोबेल समितीची दृष्टीकोन खूपच संकुचित होता का? समितीचे सदस्य युरोपाबाहेरील लोकांच्या स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व जाणू शकले नाहीत का? किंवा नॉर्वेजियन समितीचे सदस्य कदाचित असा पुरस्कार देण्यास घाबरत होते, जो त्यांच्या स्वतःच्या देशाचे आणि ग्रेट ब्रिटनचे संबंध बिघडवू शकेल?
गांधींना 1937, 1938, 1939, 1947 मध्ये आणि अखेरीस, जानेवारी 1948 मध्ये त्यांच्या हत्येच्या काही दिवस आधी नामांकन मिळाले होते. अखेरचे नामांकन वेळेत न मिळाल्याबद्दल नोबेल समितीच्या नंतरच्या सदस्यांनी जाहीरपणे खेद व्यक्त केला आहे; जेव्हा 1989 मध्ये दलाई लामा यांना शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला, तेव्हा समितीच्या अध्यक्षांनी म्हटले होते की ही, “अंशतः महात्मा गांधींच्या स्मृतीला दिलेली आदरांजली” होती. तथापि, गांधींना हा पुरस्कार का दिला गेला नाही, याबद्दलच्या अटकळांवर समितीने कधीही भाष्य केलेले नाही आणि अलीकडेपर्यंत या प्रकरणावर प्रकाश टाकू शकणारे स्रोत उपलब्ध नव्हते.
गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६
ट्यूजडेज विथ मॉरी - जीवन मरणाचे रहस्य!
त्यांचे वडील चार्ली श्वार्ट्झ हे रशियन ज्यूईश मिश्र वंशीय होते. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अनिवार्य केली गेलेली लष्करी भरती टाळण्यासाठी त्यांनी रशियामधून पलायन केलं.
या सर्व धावपळीत चार्ली यांची प्रिय पत्नी आजारी पडली, त्यातच तिने कायमची हाय खाल्ली. संसार अर्ध्यात टाकून ती निघून गेली.
पोलिओग्रस्त मुलाची काळजी घेण्यासाठी चार्ली श्वार्ट्झ यांनी दुसरं लग्न केलं. इवा ही रोमानियन तरूणी त्यांची दुसरी पत्नी. मात्र तिच्यापासून त्यांना सुख लाभलं नाही. त्यांचे संतुलन ढासळत गेले. त्यातच एके दिवशी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले.
आई आणि वडील गमावून बसलेले तरूण मॅारी रूग्णसेवेकडे आकर्षित झाले. मानसोपचार रूग्णालयात संशोधक म्हणून काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की, या क्षेत्रात खूप मोठे काम बाकी आहे. त्यासाठी आधी समाजाचा दृष्टीकोन प्रगल्भ व्हायला हवा. परिणामी त्यांनी समाजशास्त्रात डॅाक्टरेट करण्याचे निश्चित केले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)



.jpg)


