सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

औरते – रमाशंकर यादव विद्रोही..

A close-up of a person crying

AI-generated content may be incorrect.


काही स्त्रियांनी
स्वेच्छेने विहिरीत उडी मारून जीव दिलाय
असं पोलिसांच्या नोंदींमध्ये लिहिलंय.

आणि काही स्त्रिया
चितेवर जळून मरण पावल्या —
असं धर्मग्रंथांमध्ये लिहिलंय.

मी कवी आहे,
कर्ता आहे,
घाई कशाची?

एके दिवशी मी पोलीस आणि पुरोहित
दोघांनाही एकाचवेळी
स्त्रियांच्या न्यायालयात उभं करेन,

आणि मधली सगळी न्यायालयं
रद्द करेन.

मी त्या दाव्यांनाही निकालात काढेन
जे कथित सभ्य पुरुषांनी
स्त्रिया आणि मुलांच्या विरोधात दाखल केलेत.

मी ते हुकुमनामे नष्ट करेन
ज्यांच्या आदेशावरून सैनिक चढाई करतात.

मी ते वारसनामे फाडून टाकेन
ज्यात दुर्बळांनी आपलं आयुष्य
मातब्बरांच्या नावावर लिहून दिलंय.

मी त्या स्त्रियांना
पुन्हा जिवंत करेन,
ज्या विहिरीत उडी मारून,
किंवा चितेत जळून मेल्या आहेत!
आणि त्यांची साक्ष
पुन्हा नोंदवून घेईन

कुठे काही राहून गेलं का?
कुठे काही विसरलं गेलं का?
कुठे काही चुकलं का?

कारण, मला माहीत आहे त्या स्त्रिया,
ज्यांनी आपल्या वीतभर अंगणात
आपल्या सात वीताच्या देहाला
आयुष्यभर बसवून ठेवलं,
आणि कधी बाहेरचं आकाशसुद्धा पाहिलं नाही.

आणि जेव्हा त्या घराबाहेर पडल्या
तेव्हा त्या स्त्रिया सचेत नव्हत्या,
त्यांची कलेवरं होती.

ज्या भूमीत विखुरल्या
मातीप्रमाणे.
मित्रांनो, एखाद्या स्त्रीचं कलेवर
धरतीमातेसमच असतं!
जे सर्वत्र विद्ध केलं जातं
पोलीस चौक्यापासून ते न्यायालयांपर्यंत.

मी पाहतोय —
अन्यायाचे सगळे पुरावे
मिटवले जात आहेत.

भाळी चंदनाचा टिळा ल्यालेले पुरोहित,
आणि छातीवर पदकं लटकवलेले सैनिक,
सारेच राजामहाराजांचा जयघोष करताहेत.

ते राजे महाराजे,
जे आता जिवंतही नाहीत,
आणि महाराण्या
सती होण्याची तयारी करत आहेत.

मग जेव्हा महाराण्या नसतील,
तेव्हा दासी कशा मागे राहतील?
त्या पण निर्वाणाच्या तयारीत आहेत.

मला महाराण्यांपेक्षा
त्या दासींची जास्त काळजी वाटते -
ज्यांचे पती अजून हयात आहेत,
आणि बिचारे शोकाकुल आहेत.

किती वेदनादायक असेल,
एका स्त्रीसाठी,
तिच्या रडणाऱ्या नवऱ्याला सोडून मरणं —
पण पुरुषांना मात्र
रडणाऱ्या स्त्रियांना मारण्यात
वाइटही वाटत नाही.

स्त्रिया रडत राहतात,
पुरुष मारत राहतात.

स्त्रिया अजून मोठ्याने रडतात,
पुरुष अजून जोशाने मारतात.

स्त्रिया अखेर किंचाळतात —
आणि पुरुष इतके मारतात,
की त्या मरतात.

इतिहासातली ती पहिली स्त्री कोण होती
जिला सर्वप्रथम जाळलं गेलं —
मला ठाऊक नाही.
पण जी कोण असेल —
ती माझी आई असेल.

पण माझी खरी चिंता आहे —
भविष्यातली ती शेवटची स्त्री कोण असेल,
जिला शेवटी जाळलं जाईल?
मलाही माहीत नाही.
पण जी कोण असेल —
ती माझी मुलगी असेल,

आणि —
मी हे होऊ देणार नाही.

रमाशंकर यादव विद्रोही यांच्या हिंदी कवितेचा हा स्वैर मराठी अनुवाद.

अंतःकरणाचा तळ ढवळून काढण्याची ताकद या कवितेत आहे.
मानवी इतिहासात शेवटची जाळली जाणारी स्त्री ही माझी मुलगी असेल आणि तिची हत्या मी होऊ देणार नाही, ही भावना जितकी उदात्त आहे तितकीच बंडखोर आहे!
आताच्या घडीला संपदा मुंडेसारख्या विद्रोही मुली जेव्हा शोषणाला कंटाळून जीव देताहेत, तेव्हा ती पोर आपल्या पोटी जन्मल्या नसल्याने आपल्यातले अनेकजण मौनाची शेणगोळी खाऊन गपगुमान आहेत!
एखादाच रमाशंकर विद्रोही असतो, ज्याला प्रत्येक शोषित पीडित स्त्री आपल्या मुलीसारखी वाटते आणि तिच्यासाठी तो पेटून उठतो!
आपल्याला असं कधी वाटत नाही का? नसेल वाटत काही तर, किमान सवाल तरी करायचं बंद केलं नाही पाहिजे!
- समीर गायकवाड
______________________________________________


मूळ कविता –


कुछ औरतों ने
अपनी इच्छा से

कुएँ में कूदकर जान दी थी,
ऐसा पुलिस के रिकार्डों में दर्ज है।

और कुछ औरतें
चिता में जलकर मरी थीं,

ऐसा धर्म की किताबों में लिखा है।
मैं कवि हूँ,

कर्ता हूँ,
क्या जल्दी है,

मैं एक दिन पुलिस और पुरोहित,
दोनों को एक ही साथ

औरतों की अदालत में तलब कर दूँगा,
और बीच की सारी अदालतों को

मंसूख कर दूँगा।
मैं उन दावों को भी मंसूख कर दूँगा,

जिन्हें श्रीमानों ने
औरतों और बच्चों के ख़िलाफ़ पेश किया है।

मैं उन डिक्रियों को निरस्त कर दूँगा,
जिन्हें लेकर फ़ौजें और तुलबा चलते हैं।

मैं उन वसीयतों को ख़ारिज कर दूँगा,
जिन्हें दुर्बल ने भुजबल के नाम की होंगी।

मैं उन औरतों को
जो कुएँ में कूदकर या चिता में जलकर मरी हैं,

फिर से ज़िंदा करूँगा,
और उनके बयानात को

दुबारा क़लमबंद करूँगा,
कि कहीं कुछ छूट तो नहीं गया!

कि कहीं कुछ बाक़ी तो नहीं रह गया!
कि कहीं कोई भूल तो नहीं हुई!

क्योंकि मैं उन औरतों के बारे में जानता हूँ
जो अपने एक बित्ते के आँगन में

अपनी सात बित्ते की देह को
ता-ज़िंदगी समोए रही और

कभी भूलकर बाहर की तरफ़ झाँका भी नहीं।
और जब वह बाहर निकली तो

औरत नहीं, उसकी लाश निकली।
जो खुले में पसर गई है,

माँ मेदिनी की तरह।
एक औरत की लाश धरती माता

की तरह होती है दोस्तो!
जो खुले में फैल जाती है,

थानों से लेकर अदालतों तक।
मैं देख रहा हूँ कि

जुल्म के सारे सबूतों को मिटाया जा रहा है।
चंदन चर्चित मस्तक को उठाए हुए पुरोहित,

और तमग़ों से लैस सीनों को फुलाए हुए सैनिक,
महाराज की जय बोल रहे हैं।

वे महाराज जो मर चुके हैं,
और महारानियाँ सती होने की तैयारियाँ कर रही हैं।

और जब महारानियाँ नहीं रहेंगी,
तो नौकरानियाँ क्या करेंगी?

इसलिए वे भी तैयारियाँ कर रही हैं।
मुझे महारानियों से ज़्यादा चिंता

नौकरानियों की होती है,
जिनके पति ज़िंदा हैं और

बेचारे रो रहे हैं।
कितना ख़राब लगता है एक औरत को

अपने रोते हुए पति को छोड़कर मरना,
जबकि मर्दों को

रोती हुई औरतों को मारना भी
ख़राब नहीं लगता।

औरतें रोती जाती हैं,
मरद मारते जाते हैं।

औरतें और ज़ोर से रोती हैं,
मरद और ज़ोर से मारते हैं।

औरतें ख़ूब ज़ोर से रोती हैं,
मरद इतने ज़ोर से मारते हैं कि

वे मर जती हैं।
इतिहास में वह पहली औरत कौन थी,

जिसे सबसे पहले जलाया गया,
मैं नहीं जानता,

लेकिन जो भी रही होगी,
मेरी माँ रही होगी।

लेकिन मेरी चिंता यह है कि
भविष्य में वह आख़िरी औरत कौन होगी,

जिसे सबसे अंत में जलाया जाएगा,
मैं नहीं जानता,

लेकिन जो भी होगी
मेरी बेटी होगी,

और मैं ये नहीं होने दूँगा ।

_____________________________________ 

#facebook #समीरगायकवाड #trending #blogger #mustread #goodread #threads #art #life #literature #साहित्य #sameergaikwad #blog #vlog #humanity #mankind #support #search #sameerbapu #समीरबापू #साहित्य #instagram #कविता #kavita #poetry 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा