पॅलेस्टाईनची द्रोहफुले...
ताकद, दहशत आणि राक्षसी आकारमान याच्या जोरावर कुणी अमर आणि सर्वकालिक राहू शकत नाही. त्यास आव्हान देणारे, त्याच्याशी झगडून आपलं छोटंसं का होईना पण स्वतंत्र अस्तित्व दाखवणारे निर्माण होतच राहतात. कितीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली वा कसलीही षडयंत्रे रचली तरीही अशा आव्हानांना नेस्तनाबूत करता येत नाही. मातीतून अंकुर उगवावा इतक्या सहजतेने ही विद्रोही रोपटी तग धरत नसली तरी चिकाटीने दगडमातीचं काळीज भेदून आपल्या परीने ती उगवत राहतात, जमेल तशी वाढत राहतात. अगदी जेत्यांच्या चिरेबंदी गढ्यांच्या परसदारात, अंगणातदेखील ही द्रोहफुले उगवतात. त्यांच्यातल्या प्रत्येकाला तरवारीचं पातं लाभलं नसलं तरी त्यांचा दरवळ अस्मान पेटवण्यास पुरेसा ठरतो. पॅलेस्टिनी कवी खालेद अब्दुल्लाह यांच्या 'सीड्स ईन फ्लाईट' या मूळच्या अरेबिक कवितेचा स्वैर मराठी अनुवाद याला साक्ष आहे. जीवनाच्या रसरशित जाणिवांनी आणि अर्थपूर्ण प्रतिमांनी ही कविता सजलेली आहे. पहिल्या पंक्तीपासून ती मनाचा ताबा घेते. कवितेच्या अखेरीस विद्रोहाचं बीज वाचकांच्या मनात अलगद पेरण्यात कवी यशस्वो होतो. उत्तुंग आशयाने आणि कवीच्या पार्श्वभूमीने ही कविता बोलकी झाली आहे. कवीच्या मातृभूमीची ओढ यात आस्ते कदम तरळत जाते आणि अखेरीस दृढ होत होते.
वाऱ्यावरची बीजे..
एक आदिम स्त्री, जी सर्व ऋतू जगली होती
डेझीची सुगंधी फुलं गोळा करत दिशाहीन चालायची.
तिच्या पदरातलं प्रत्येक फुल म्हणजे जणू तारा,
तिचा पदर म्हणजे आकाश.
जेंव्हा ती घरी परतायची,
किनाऱ्यावर शिंपले विखरावीत तद्वत फुले उधळायची,
त्यांना सौभाग्य लाभावं, भविष्याशी कुजबुजता यावं
याची मुभा द्यायची.
उन्हांत तिचं गोंदण चमकायचं, जणू तारेच चमकताहेत
तिच्या सोनेरी कर्णफुलांत डेझीची सुमनं सुकून जायची.
तिच्या हातावर ईश्वराची नावे मेंदीत आरेखली असत,
त्याच हाताने फ्लॉकच्या धाग्यांनी ती कशिदा करायची.
तिच्या लग्नाची वस्त्रं, डेझीच्या सुक्या फुलांनी भरून गेली
पण पुढच्या ऋतूत जेंव्हा भविष्याचा नवकाळ आला
त्याने फुलांची कुजबुज शांत केली, पूर्वजांशेजारी तिला दफन केलं गेलं
आणि तरीही एका अवधीने, एका जादूने, जणू एका चमत्काराने
घराच्या परसदारात प्रत्येक मौसमात डेझी उगवतेच आहे
डेझीची अनेक बीजे उडून गेलीत, पण ही टिकून आहेतच...
~~~~~~~~~

कवीने अत्यंत खूबीने डेझीचं रूपक वापरलंय. इथे संदर्भ त्याच्या मायभूमी पॅलेस्टाईनचा आहे. इस्त्राईलने कितीही आणि कसलीही दडपशाही केली तरी त्याला उत्तर देणारी माणसं (डेझीची फुलं) नकळत अस्तित्वात येत राहतील असं तो सुचवतो. पॅलेस्टाईन आणि इस्त्राईल यांच्यातल्या वैरास असंख्य घटना, बिंदू कारणीभूत आहेत. यापैकीच एक कारण आहे गाझापट्टीची लसलसती जखम. जिथे कवीच्या मातृभूमीच्या विलगतेची धगधगती दुःखे सातत्याने प्रसवतात. याच गाझापट्टीतील दैर-अल-बह या शहरात १९७० साली खालेद अब्दुल्लाह यांचा जन्म झाला. त्यांच्या 'एफएम' या काव्यसंग्रहास कतान फौंडेशन पोएट्रीचा पुरस्कार मिळाला होता. तर 'दर-अल-आदाब' या काव्यसंग्रहास २००२ साली बैरुतमधला काव्य पुरस्कार मिळाला होता. त्यांच्यावरील बंधनांपायी २००१ पासून ते फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये वास्तव्यास आहेत. संघर्षमय वातावरणात वाढलेल्या कवीच्या या जाणिवा काळजाला स्पर्श करून जातात.
पॅलेस्टीनींची भाषा मुख्यत्वे अरेबिक आहे. पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याचा लढा प्रचंड रक्तरंजित संघर्षाचा आणि धगधगत्या समर्पणाचा आहे. त्याचं प्रतिबिंब तिथल्या साहित्य विश्वात पडणं साहजिक आहे. युद्ध, मायभूमीची ओढ, विजनवास, स्वातंत्र्य, विद्रोह, सामाजिक धार्मिक जाणिवांचा आकृतिबंध, बंधुता यावर इथल्या साहित्याचा जोर आहे. प्रेमाला अपेक्षित असलेला रोमँटीसिझम आणि जगण्याच्या भोंदू आदर्शवादाचं थोतांड मस्तकात प्रसवणाऱ्या आयडियालिझमला तिथे कमी स्थान आहे. क्लासिक प्रि-ईस्लामिक फॉर्ममधल्या कविता हा इथला आवडीचा काव्यप्रकार. १९४८ मधील पॅलेस्टीनींच्या सामूहिक शिरकाणानंतर या कविता क्रांतीचं माध्यम बनल्या. आताचे सर्व प्रमुख तरुण पॅलेस्टिनी कवी या कालखंडाच्या पश्चात जन्मलेले आहेत तरीही त्यांच्या साहित्यातदेखील हाच आशय केंद्रस्थानी आहे हे विशेष ! महंमूद दरविश, समीह अल कासिम, तौफिक झाएद या कवींचे बालपण मात्र या अग्नीकाळात तावून सुलाखून निघालेलं असल्याने त्यांच्या कविता प्रमाण मानल्या गेल्यात. या सर्व कवींचं साहित्य कित्येक वर्षे जगाला ज्ञात नव्हतं. १९७२ मध्ये इस्त्राईली गुप्तहेर यंत्रणा मोसादने घसन कनिफ़नी या पॅलेस्टिनी लेखकाची हत्या केली आणि जगाचं लक्ष पॅलेस्टिनी साहित्याकडे वळलं. आता तिथल्या बंडखोरांच्या धमन्यात रक्तासोबत विद्रोही कवितांचा लाव्हाही सळसळत असतो. कवितेचे रूपांतर तिथे द्रोहफुलांत झालं आहे. याहून अधिक दाद कुठल्या कवीला मिळेल काय ?
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा