मुजरा नर्तिका, गायिका यांचा जगातला सर्वात मोठा बाजार लाहौर मधील 'हिरा-मंडी' मध्ये भरतो. आपल्या नारायणगावला जशी तमाशापंढरी म्हणतात तसे हिरा मंडी ही मुजऱ्याची काशी पंढरी होय. आपल्या अनेक साहित्य व कलाकृतींचा विषय ठरलेल्या मुजरा नर्तिका असलेल्या अनारकलीचे मूळ लाहौरमध्येच सापडते. 'अकबरनामा' आणि 'तुझुक -ए- जहांगिरी' अर्थात 'जहांगीरनामा' या दोहोतही अनारकलीचा उल्लेख नाही पण ईस्ट इंडिया कंपनीच्या नीळाच्या व्यापारासाठी भारतात आलेला विल्यम फिंच १६११ मध्ये लाहौर येथे पोहोचला तेंव्हा त्याला अनारकली विषयी माहिती मिळाली असे त्याने नमूद केले आहे. अनारकलीच्या निधनानंतरच्या सहा वर्षे पश्चातचा हा कालावधी असल्याचे तो म्हणतो. विल्यम फिंचच्या काही वर्षानंतर भारतात आलेल्या एडवर्ड टेरी या ब्रिटीश प्रवाशानेही अनारकलीचे उल्लेख केले आहेत. इतिहासात तिच्या अस्तित्वाबद्दल एकमत नाही मात्र तत्कालीन मुजरा संस्कृती आणि गुलाम महिलांचे शोषण यावर सहमती आहे. लाहौरच्या मुजरा इतिहासाची सुरुवात अशा प्रकारे चारशेहून अधिक वर्षाची आहे.
मुजरा नृत्य करणाऱ्या स्त्रियांबद्दल अनेक लोकोपवाद होते आणि आजही आहेत. खरेतर यातल्या बहुतांश स्त्रिया खूप प्रेमळ, लाघवी असतात, त्या सच्च्या प्रेमाच्या भुकेल्या असतात. यातल्या काहींचा रोख त्यांच्या ग्राहकांच्या पैशावर, संपत्तीवर जरुर असतो हे देखील येथे नमूद करावेच लागेल अन्यथा लेख संतुलित होणार नाही. जिथं सामान्य माणसांच्या मनात खोट असू शकते तिथे यांच्या मनात का असू नये ? आपल्यातल्या कुणालाच 'आनंदबाबू' बनायचे नाही पण तरीही जर कधी कुठल्या मुजरावालीशी वा कोठेवालीशी सामना झाला तर तिच्यात वेश्या पहायची की पुष्पाला शोधायचं हे आपल्या संस्कारावर अवलंबून आहे. त्याच बरोबर बदलत्या काळात श्रीमंती, अय्याशी आणि ऐशारामाच्या नव्या संदर्भानुसार या दशकात काही ठिकाणी विवाह सोहळ्यात नाचण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुजरा कलावंताचे पुनरुज्जीवन होऊ लागलेय. मात्र त्यांच्या या स्वरूपास समाज कोणत्या नजरेने पाहतो हे काळच सांगेल.
'मुक्कद्दर का सिकंदर'मध्ये जोहराबाई सिकंदरला म्हणते की, "एक तवायफ की जिंदगी कोठे से शुरू होती हैं और कोठे पे खतम होती है.." आता कोठे उरले नाहीत आणि मुजरा नर्तिकाही इतिहासजमा झाल्यात. उरल्यात त्या केवळ त्यांच्या पाऊलखुणा. त्याचबरोबर अलीकडील काळात मुजरा नृत्याच्या नावाखाली बीभत्स आणि हिडीस नृत्य करणाऱ्या तोकड्या कपड्यातील नार्तिकांचा (?) धांगडधिंगा घालनाऱ्यांबद्दल लिहावं वाटत नाही. मुजरा नृत्य आणि नर्तिकांच्याबद्दल मानवी मनात प्रेम, वासना, रसिकता, सौंदर्यासक्ती, आकर्षण अशा विविध भावना असू शकतात त्याचे उदात्तीकरण करणे वा त्याचा धिक्कार करणे हा स्वतंत्र लेखाचा विषय असू शकतो. या भावनांचे स्वरूप काहीही असले तरी मुजऱ्याच्या या पाऊलखुणा अत्यंत वेधक आणि देखण्या होत्या हे नक्की. आयुष्यात जेंव्हा कधी पाकिस्तानला जायचा योग येईल तेंव्हा लाहौरच्या 'हिरा मंडी'ला नक्की भेट देऊन माझ्या पोतडीत काही नवी चीजा सामील करून घेईन. तिथल्या स्त्रिया संपन्नावस्थेत नसल्या तरी त्यांच्यामुळे अनेकांची आयुष्ये समृद्ध झाली असतील हे नक्की.
- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा