प्रामुख्याने त्याचे दोन संदर्भ दिले जातात.
अमेरिकेच्या इतिहासात पोटोमॅक येथील युद्धात जनरल जोसेफ हुकर यांच्याकडे नेतृत्व होते. त्यांच्या तुकडीमध्ये सैनिकांपैकी बहुतांश रंगेल आणि रगील होते. 1862 ते 1863 दरम्यान हुकर हा त्यांचा कमांडर होता.
त्याला अपघातानेच 'फायटिंग जो हे नाव लाभलं होतं.
त्याच्या तुकडीतले सैनिक स्त्रियांबद्दल अनुचित दृष्टिकोन बाळगत.
लैंगिक शोषण आणि व्यसन याबद्दल त्याची पलटण ओळखली जायची.
तरीदेखील त्याच्या तुकडीतील अधिकाऱ्यांना सैनिकांना तत्कालीन लष्करामध्ये बढत्या मिळत गेल्या.
याचं कारण त्यांनी स्किन करन्सी वापरत तडजोडी केल्या हे होय.
परिणामी हुकरची हेडक्वार्टर असलेल्या नॉर्थ कॅरोलिना आणि वॉशिंग्टन मधला सैनिकी परिसर अय्याशीचा अड्डा म्हणून ओळखला जाऊ लागला.
वॉल्टर हरबर्ट यांनी हुकरचे चरित्र लिहिलेय, त्यात याविषयी सविस्तर नोंदी आहेत. हुकरची तुकडी जिथे असेल तिथे कुंटणखाने, दारूअड्डे, जुगारअड्डे एकत्र असल्यागत वातावरण असे.
हुकर पराक्रमी होता, त्याला स्वतःला या सवयी नव्हत्या,
मात्र त्याच्या अखत्यारीत असणाऱ्या सैनिकांच्या दुराचाराबद्दल, व्याभिचाराबद्दल त्याची तक्रार नव्हती किंबहुना तो त्याबाबतीत मौन बाळगून होता.
कारण त्यायोगे त्याच्या हाताखालचे बरेच अधिकारी पुढे गेले आणि त्यांनी हुकरला त्याचे क्रेडिट दिले!
वॉशिंग्टनमध्ये त्याची तुकडी कार्यरत असताना त्याच्या सैनिकांनी असा काही हैदोस घातला की तिथल्या सर्व परिसरात सेक्स वर्कर स्त्रियाच दिसू लागल्या.
परिणामी तो भाग प्रॉस्टिट्यूशनसाठी ओळखला जाऊ लागला!
यालाच 'हुकर्स डिव्हिजन' हे कोडनेम मिळाले.
इथून पुढच्या काळात हा शब्द वेश्यांना कायमचाच चिटकला.
हुकरच्या अनैतिक व्यभिचारी जगातल्या स्त्रिया म्हणजेच 'हुकर्स वुमन' त्या अर्थाने वेश्या म्हणजेच हुकर्स हा शब्द रूढ झाला!
हा झाला एक संदर्भ आता दुसरा संदर्भ पाहू. हा संदर्भ भौगोलिक आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या मॅनहटनच्या पूर्वेकडील खालच्या भागात कॉरलियर्स हुक नावाचा एक भाग आहे.
इसवी सन 1600 मधली ही नोंद आहे.
ईस्ट रिव्हरच्या वळणावरती हे एक प्रकारचे भुशीर टोक आहे.
तत्कालीन मॅनहटन बेटाच्या सामुद्रिक ऍक्टिव्हिटीसाठी हे प्राइम लोकेशन होते.
तिथल्या कायद्यान्वये तेव्हा वेश्यांवरती कडक बंधने होते.
त्या नागरी भागात फिरू शकत नसत.
मात्र हा तटवर्ती इलाखा त्यांच्यासाठी सेफ होता.
इथल्या रस्त्यांवरती त्या अंमळ मोठ्या संख्येने दिसत,
त्यांच्यावर इथे बंधने नव्हती उलट पोषक वातावरण होते त्यामुळे कालांतराने त्यांची संख्या इतकी वाढली की इथे येणारे नाविक खलाशी खास त्या बायकांसाठी येऊ लागले!
कॉरलियर्स हुक या भागात हे देहव्यवहार केले जायचे.
त्यामुळे तिथल्या स्त्रियांच्या संदर्भात हुक येथे असणारी ती 'हुकर' ही संज्ञा लागू झाली.
इथे सर्व वारांगनाच असत त्यांची सौदेबाजी येथे होई, त्यामुळे इथल्या बायकांना आपोआप हे नाव चिकटले. हा झाला दुसरा संदर्भ.
19व्या शतकात तिथे वेश्यांची संख्या इतकी वाढली की तब्बल 85 कुंटणखाने तिथे अस्तित्वात होते!
वास्तवात ही सर्व जागा जेकब व्हॉन कॉरलियर्स या एकल व्यक्तीची होती.
त्याच्या बागा होत्या. इथे ज्यूटची शेती केली जायची, तिथे मनुष्यबळ नव्हते.
परिणामी मोठ्या संख्येने मजूरांची नेआण करावी लागे.
बाहेरून मजूर आणले जात.
त्याचबरोबर जूटची वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बोटींची वर्दळ तिथे असे.
तिथे येणाऱ्या नावाडयांच्या देहभुका भागवण्यासाठी या बायका कामी आल्या तर आपल्या इलाख्यात पोट भरत नसल्याने इथे रेंगाळणाऱ्या बायकांना मुबलक ग्राहक उपलब्ध झाले!
त्यातून हा भाग यासाठी बदनाम झाला.
परिणामी 'हुकर्स' म्हणजे वेश्या हे समीकरण दृढ झाले.
पुढे जाऊन युरोपियन देशांमध्ये 'पुरुषांना हुक लावणारी ती हुकर' असाही टवाळकीवजा युक्तिवाद मांडला गेला!
वास्तवात तेव्हा या बायका पुरुषांना हुक लावायला कुठेही जात नव्हत्या आताही जात नाहीत, त्या एकाच जागी असतात, पुरुषच त्यांच्यापाशी येतात याचा लोकांना सहज विसर पडतो.
ज्या कमांडरची बहुतांश पलटणच नीतीभ्रष्ट होती तशा तर या स्त्रिया नव्हत्या,
त्या बहुतांशी बळजबरीने तर क्वचित स्वेच्छेने हा व्यवसाय करत त्यामुळे त्यांना जनरल हुकरच्या सैनिकांसारखं नीतिभ्रष्ट ठरवणे अनुचित होते!
हुकर हा शब्द वेश्यांसाठी अन्याकारकच होता.
सर्वोच्च न्यायालयाने हा शब्द असभ्य ठरवताना एक चांगली मार्गदर्शक शब्दसंहिता दिली आहे, त्यासाठी न्यायव्यवस्थेला धन्यवाद!
- समीर गायकवाड


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा