शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४
शोध मराठी रंगभूमीवरील 'ती'च्या अस्तित्वाचा!
सुखाचे घर!
गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४
स्वर्गसुखाच्या भेटीगाठी!
दिवाळसण सरताच आपलं घर मागं टाकून अनेक बिनचेहऱ्याची माणसं आपापल्या घाण्याला जुंपून घेण्यासाठी वेगवेगळ्या इप्सित शहरांकडे रवाना झाली होती. दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी फिरणारी मंडळी आणि उदास देहबोलीने कामावर रुजू होण्यासाठी निघालेली माणसं एकाच बसमधून प्रवास करत होती. असो. आज सकाळच्या प्रवासात माझ्या शेजारी एक बऱ्यापैकी वयस्क विधवा महिला बसून होती.
मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४
'गुड़िया' - सहस्त्र लेकींची आई!
सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४
आयेशा परवीन नावाची दुर्गा!
आयेशा परवीन |
सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४
हिरवाई..
'पांढरे केस, हिरवी मने' या नावाचे वि. द. घाटे यांचे पुस्तक जीवनासक्त व्यक्तींच्या आयुष्याचा धांडोळा घेणारे आहे. ते 'कथित' हिरवट नाहीये. असो.
शांता शेळके यांची 'पाकोळी' ही कविता सुप्रसिद्ध आहे. कवितेची सुरुवातच हिरवी 'झाडी या शब्दांनी केलीय.
हिरवी झाडी, पिवळा डोंगर, निळी-सावळी दरी,
बेट बांबुचे त्यातुन वाजे, वार्याची पावरी.
कभिन्न काळ्या खडकांमधुनी, फुटति दुधाचे झरे.
संथपणे गिरक्या घेती, शुभ्र शुभ्र पाखरे!.. '
गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४
अनमोल 'रतन'!
मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४
आईच्या आठवणींचा पाऊस!
गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४
पैशाने साऱ्या गोष्टी मिळत नाहीत - गोष्ट मटकाकिंगची!
हितेश भगत हा कुख्यात मटकाकिंग सुरेश भगत याचा लाडाने बिघडलेला मुलगा. 2008 साली आपल्या वडिलांची सुपारी देऊन हत्या केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झालेली. त्याची आई जया भगत ही देखील या प्रकरणी आरोपी होती. नंतर ते जामीन देऊन बाहेर आलेले. मात्र या खटल्याची सुनावणी सुरु असतनाच अघटित घडलेलं.
हितेशची स्वतःची एक ऐय्याशीची नि मस्तीची दुनिया होती.
डान्सबारच्या जगात त्याचं लाडाचं नाव होतं चिंटूसेठ!
बारमध्ये तो पैसे उधळायला यायचा तेंव्हा त्याची साईज अदनान सामीसारखी सुपरहेवीवेट होती. पुढे त्याने लिपोसक्शनची शस्त्रक्रिया केली. देहाचा आकार कृत्रिमरित्या घटवून घेतला.
मात्र 2014 मध्ये या शस्त्रक्रियेचा त्याला फटका बसला आणि पोटात नव्या व्याधी उद्भवल्या, त्यातच तो मरण पावला.
त्याचे तीन फेमस डान्स बार होते (कार्निव्हल - वरळी, बेवॉच - दादर, टोपाझ - ग्रॅण्ट रोड) जिथल्या मुलींना त्यानं मोकळ्या हाताने बिदागी दिली. असो...
मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४
किस ऑफ लाइफ आणि आत्महत्या!
घटना १९६७ सालची आहे. १७ जुलै १९६७,अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील जॅक्सनविले शहर. एका ओव्हरहेड वायरमधून स्पार्किंग होत असल्याने विजेची समस्या उद्भवली तेंव्हा शहराच्या देखभाल विभागाद्वारे दोन लाईनमन्सवर दुरुस्तीची जबाबदारी सोपवली गेली. निरोप मिळताच भर दुपारी त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. वेळेत काम केले नाही तर नागरिकांना त्रास सोसावा लागेल याची त्यांना जाणीव होती त्यामुळे एक क्षणही न दवडता त्यांनी अत्यंत नेटाने कामावर फोकस ठेवला. काही तासांतच त्यांचं काम जवळपास उरकत आलं होतं आणि तेव्हढ्यात घात झाला.
रॅन्डल चॅम्पियन ह्या तरुण लाईनमनकडून अनवधानाने दुसऱ्या एका उच्च दाबाच्या वायरला अवघ्या काही क्षणांसाठीच स्पर्श झाला. त्या उच्च दाबाच्या वायरला स्पर्श करताच त्याला जोराचा झटका बसला. खरे तर तत्क्षणीच त्याचा मृत्यू झाला असता. मात्र त्याचं प्राक्तन तसं नव्हतं. झटका बसताच तो काहीसा मागे रेटला गेला नि त्यावेळी तो वायरवरील सपोर्टवर बसून असल्याने जागीच उलटा लटकला गेला. जिथे लाइन फॉल्ट होती तिथे एकूण चार ओव्हरहेड वायर्स होत्या, पैकी मधल्या वायरला त्याचा स्पर्श झाला होता, दरम्यान एकदम वरच्या वायरच्या दुरुस्तीचे कामही त्याच वेळी सुरू होते. त्याच पोलवर त्याचा सहकारी जे. डी. थॉमसनकडे या कामाची जबाबदारी होती. आपला सहकारी रॅन्डल याला उच्च दाबाच्या वायरमधून जोरदार शॉक बसला असल्याचे निमिषार्धात त्याच्या लक्षात आले, पोलवर पाय ओणवे करून उभं राहत त्यानं त्याला कवेत घेतलं आणि ताबडतोब त्याला तोंडावाटे श्वास देणं सुरू केलं.मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४
किडलेल्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची ‘प्रतीक्षा’!
सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४
‘सोशल’ आक्रोशाचा दांभिकपणा!
रविवार, २५ ऑगस्ट, २०२४
"यंदा दुर्गा मूर्तीसाठी आम्ही माती देणार नाही!... "
कोलकता येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्या प्रकरणी बंगालमधील वेश्यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिक आहे! किंबहुना सामान्यांचे डोळे उघडणारी आहे! कथित सभ्य सामान्य माणसं या स्त्रियांपासून अंतर राखतात मात्र जेव्हाही कुठला महत्वाचा सामाजिक प्रश्न उद्भवतो तेव्हा या स्त्रिया त्यात उडी घेतात हा आजवरचा अनुभव आहे.
पीडितेला न्याय मिळावा म्हणून बंगालमधील वेश्यांनी मोर्चात सहभाग नोंदवला! यावेळी त्यांच्या हातात काही घोषणाफलक होते त्यावर लिहिलं होतं की,
प्रयोजने आमादे काचे आशून, किंतू नारी के धारशन कोरबे ना!
প্রয়োজনে আমাদের কাছে আসুন, কিন্তু নারীকে ধর্ষণ করবেন না।
याचा अर्थ असा आहे - तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर आमच्याकडे या, परंतु कुठल्या स्त्रीवर बलात्कार करू नका!
मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४
प्राणी-प्रेमाआडचा छुपा विकृत चेहरा - अॅडम ब्रिटन!
शुक्रवार, ७ जून, २०२४
मोदी, वाजपेयी आणि चंद्राबाबू नायडू - नव्याने जुने सवाल!
अचर्चित विषयावरची धाडसी कादंबरी - दुभंगलेलं जीवन!
दुभंगलेलं जीवन - मुखपृष्ठ |
शनिवार, २५ मे, २०२४
पँडेमोनियम, जॉली एलएलबी आणि पुणे अपघात!
शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४
मनोहर जोशींचा महत्वाचा पण दुर्लक्षित पैलू!
मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४
आयुष्याची लढाई!
गर्दीच्या ठिकाणी दिवसभर फिरस्ती करुन खेळणी विकणाऱ्याचं पोर घरी खेळणीसाठी रडत असतं,
बांधकाम मजूरास पत्र्याच्या वा तत्सम घरात राहावं लागतं,
लोकांची घरे रंगवणाऱ्या रंगाऱ्याच्या घराचे पोपडे उडालेले असतात,
हमाली करणाऱ्याचं ओझं कुणीच उचलत नसतं,
जगाच्या चपला शिवून देणाऱ्याच्या पायतल्या वाहणा झिजलेल्या असतात,
कापडाच्या दुकानात कामास असलेला कामगार कॉलरजवळ विरलेले शर्ट नि कंबरेत अल्टर केलेली विजार वापरतो,
मिठाईच्या दुकानातल्या सप्लायवाल्याच्या घरी वर्षाला देखील नीट गोडधोड होत नसतं,
हॉटेलमधल्या वेटरचा आपलं कुटुंब घेऊन हॉटेलात जेवायला जाण्याचा बेत कधीच तडीस जात नाही,
दिवसभर बाजारात उभं राहून गजरे विकणाऱ्या फुलवाल्याची बायको मोगऱ्याविनाच असते,
वखारीत काम करणाऱ्याच्या घरी सैपाकासाठी इंधन नसतं,
आडत बाजारात शेकडो पोती धान्य वाहून नेणाऱ्याच्या घरी धान्याची भांडी भरलेली नसतात,
चार घरची कामे करणाऱ्या मोलकरणीला आपल्या घरची धुणीभांडी करताना लाख आवंढे गुमान गिळावे लागतात...
या नोंदी काही केल्या संपत नाहीत.
सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४
कलात्मक अभिव्यक्तीवर धर्मवादाचे दडपण!
शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४
नैतिकतेचा दंडुका आपल्या हाती शोभतो का?
गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४
हे विधात्या इतके तर तू करू शकतोस!
आपल्याच धडावर आपलेच शिर असले पाहिजे!
मयत झाली. त्या राजकीय कार्यकर्त्याची पत्नी अकाली विधवा झाली.
काही नालायकांनी तिच्या कानात राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न केला पण ती बधली नाही.
त्याच्या कोवळ्या पोरांना काही हराम्यांनी मधाचे बोट लावले.
पोरं बिथरली. बापाचे कटआऊट लावून बापाच्या राजकीय दुष्मनांना चॅलेंज देऊ लागली. परिसरात असणाऱ्या दोन नंबर धंद्यावरून भांडणे होऊ लागली.