'तो' कुलाब्याच्या कॉजवे मार्केटहून यायचा. हॅण्डसम देखणा. अगदी मदनबाण वगैरे म्हणतात तसा अतिशय आकर्षक नसला तरी तरुण पुरुषाच्या अंगी असणाऱ्या खाणाखुणा त्याच्या ठायी होत्या. उंचापुरी भक्कम पिळदार अंगयष्टी. गौर वर्ण, कुरळे केस, उभट चेहरा, काहीशा दाट जाड भुवया आणि त्याखालचे मत्स्याकृती पाणीदार डोळे, विस्तीर्ण कपाळ, त्यावर रेंगाळणारी मस्तीखोर झुल्फं, सरळ नाक, वर आलेले गालाचे चीक मसल्स, उभट निमुळती हनुवटी यामुळे त्याचं इम्प्रेशन मॉडेलिस्टीक असायचं. कुणीही त्याला पाहिलं की किमान काही दिवस तरी त्याला विसरणं शक्य नसे, त्याची वेशभूषा ही अत्यंत आटोपशीर आणि रॉकींग होती. बहुतांश करून फिकट रंगशैलीचा चौकडा शर्ट आणि काळी जीन्स, व्हाईट स्पोर्ट्स शूज असा त्याचा वेष असे. शर्टचं वरचं बटन खुलं असे ज्यातून त्याची भक्कम छाती डोकावत असे.त्याची नजरही कमालीची तीक्ष्ण होती. तो काही एकटक पाहायचा नाही मात्र त्यानं एकदा जरी पाहिलं तरी समोरच्या व्यक्तीला वाटे की तो एकसारखा आपल्याकडेच पाहतो आहे. प्रत्यक्षात त्यानं आपल्याकडे पाहत राहावं असं समोरच्याची अपेक्षा असे. तो कॉजवे मार्केट परिसरात एका मरीन कंपनीत सेल्स एक्झिक्युटीव्ह होता. कमाई खूप काही नव्हती पण जितकी होती त्यात तो खुश होता. एके दिवशी त्याच्या आयुष्यात 'ती' आली.
ती प्रभादेवीहून यायची. ती अगदी हेमांगी नाजूका ! शिडशिडीत शेलाट्या बांध्याची विसविशीत अंगाची होती ती. तिच्या मासुळी डोळ्यांचा डोह इतका खोलवर होता की पाहणारा डुबुनच गेला पाहिजे. वर जालीम काजळ लावलेलं असे. चाफेकळी नाकास पातळ निमुळत्या जीवन्या खूप खुलून दिसत, ज्यांना नैसर्गिक रीत्याच लाली होती. तिला रुज मस्कारा लावायची वेळ कधीच आली नाही. गोलाकार चेहऱ्याची ती खूप आकर्षक नि लाघवी होती. तिच्या कपाळावरची महिरप खूप भारी दिसे. गळ्यातली नाजूक बारीक सोनसर तिच्या कोमल गळ्यास खूप खुलून दिसे. हातातल्या बांगड्यांची किणकिण जीवाला ओढ लावील अशी होती. जोडीला पैंजणांचं गाऱ्हाणं असे की आम्हाला हि ऐकलं जावं ! ती बहुत करून मॅचिंगकरून यायची. बांगड्यापासून ते नेकलेस पर्यन्त सगळं एकाच रंगाचं असे. ती त्या रंगात खूप खुलून दिसे आणि तो तिच्या रंगात बुडून जाई !
मरीन लाईन्स वरती तो तिला बरोबर कॅच करायचा. तिच्या लोकलची वाट बघत उभा राहायचा. ऊन, पाऊस वादळवारा यातल्या कुठल्याच घटकाचा त्याच्या या निश्चयावर परिणाम झाला नव्हता. तो येणार म्हणजे येणारच आणि तिला भेटणार म्हणजे भेटणारच ! क्वचित ती आजारी पडली वा अन्य कारणामुळे कधी येऊ शकली नाही तरीही तो माहिती असूनही तिथं यायचाच. लेडीज स्पेशल डब्यातून तिला बाहेर पडताना पाहिलं की याच्या काळजाचे ठोके वाढत. त्याला भेटताच तिच्या अंगावरून मोरपीसं फिरायची.
अवतीभवतीच्या जगाला विसरून ते एक झालेले असत. देहरूपाने ते कधी एक होऊ शकले नाहीत मात्र त्यांचं एकमेकावर इतकं निस्सीम प्रेम जडलं होतं की त्याला शब्द वा कुठल्या लिपीची. भाषेची गरज पडली नव्हती. इव्हन स्पर्शाची देखील आस उरली नव्हती. ते दोघे म्हणजे त्यांच्या तारुण्यसुलभ वयात असणार्या प्रेमासक्त भावनांनी मोहरून गेलेले बहारदार गुलमोहरच जणू. त्यांची भेट ही अशी स्टेशनवर होत असल्याने रेल्वेच्या बेजान लोखण्डी देहापासून ते पत्थरदिल प्लँटफॉर्मपर्यंत सगळ्यांना त्यांच्या भेटीची ओढ लागून राही.
ती बीएमसीच्या सी वॉर्डमध्ये कामाला अकाऊंटंट पदावर कार्यरत होती. तो पोटाची खळगी भरण्यासाठी युपीहुन इथे आलेला आणि पाहता पाहता इथलाच एक घटक होऊन गेलेला. तिला भेटल्यावर तो फार काही बोलत नसायचा. त्यांच्यात गप्पाष्टक झडताना कधी कुणी पाहिलं नव्हतं. मात्र प्रत्येक वेळेस तो न चुकता लालबुंद गुलाब घेऊन यायचा. सुरुवातीला एकमेकांच्या नजरा चुकवत चोरट्या नजरेने पाहणारे ते दोघेही आताशा अगदी एकजीव झालेले.
या मौसमात त्यांचं दोनाचं चार व्हायचं ठरलेलं. मरीन लाईन्सस्टेशननजीक असणाऱ्या श्रीनिकेतन कॉर्नरवर ते दोघे भेटायचे. ते जिथे भेटत तिथं आता लॉकडाऊनच्या काळात गुलाबाचं रोप बहरून आलंय. त्याला त्याच्या गावाकडे जाऊन महिना लोटलाय. परवाच तिचा दुःखद इंतकाल झाला. अखेरच्या दिवसात त्याला भेटण्यासाठी व्याकुळ होती ती. श्वास संपत आल्यावर तिनेच कळवळून सांगितलेलं, मरीन लाईन्सलगत असलेल्या बडा कब्रस्तानमध्ये तिला दफन करावं. श्रीनिकेतन जवळच्या गुलाबाचा दरवळ आता तिच्या कबरीपाशी जाऊन मुक्यानं रडत असतो तेंव्हा त्या कबरीतुन येणारी स्पंदने हवेत मिसळतात. वारा त्यांना थेट त्याच्या गावी नेऊन पोहोचवतो. लॉकडाऊन संपलं की तिची भेट घेण्यासाठी तो लगेच निघणार आहे. दरम्यान त्याच्या घराच्या अंगणातला सोनचाफा का सुकून गेलाय हे अजून त्याला उमगलेलं नाही....

- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा