जिला रक्ताच्या नात्यांनी झिडकारलेलं असतं, समजाने धुत्कारलेलं असतं, शासनदरबारी जिची कोणती किंमत नसते, जिचं अस्तित्वच मुळात कलंकीत ठरवलं गेलेलं असतं अशी ती म्हणजे वेश्या होय. लॉकडाऊनच्या या कठीण काळात तिचं कसं होणार या विषयीची पहिला आवाज मी 27 मार्च रोजी उठवला होता. त्यास प्रतिसाद देत विविध दिग्गजांनी मदतीचे आश्वासन दिले होते. काहींनी तर मलाच पैसे पाठवले होते, जे मी त्यांना तत्काळ परत केलेले. राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या कार्यालयातूनही याची दखल घेतली गेली. तसेच समाजकल्याण खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीनेही मदतीचे आश्वासन मिळालं. खेरीज कालच सुप्रिया सुळे यांच्या वतीनेही विचारणा झाली. दरम्यानच्या काळात विविध ठिकाणी एनजीओजच्या वतीने मदतीचा ओघ सुरू झाला होता.
ताज्या माहितीनुसार सरकारने या माताभगिनींच्या
पोटाची काळजी घेण्याचा मुद्देसूद आराखडा अंमलात आणलाय. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर या शहरात देहविक्रय व्यवसायातील महिला मोठ्या संख्येने आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील कामाठीपुरा, फोकलँड, खेतवाडी, काँग्रेस हाऊस, सिप्लेक्स बिल्डिंग, अंटॉप हिल, पारस रोड, दामोदर मॅन्शन या क्षेत्रात देहविक्रय करणाऱ्या महिला राहत आहेत. या महिलांच्या मुलांसाठी दिवसरात्र खुली निवारागृहे चालविली जात आहेत. शासनासोबतच बर्याच सामाजिक संस्था त्यांच्यासाठी काम करत असून महानगरपालिकेमार्फत अन्नाचे डबे त्यांच्यापर्यंत पोहोचविले जात आहेत. या स्त्रियांना पुढील १५ दिवस पुरेल इतके अन्नधान्याचे (रेशन) किट पुरविण्यात आले असून त्यानंतरही महिनाभराचे रेशन पुरविण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर सॅनिटायजर्स, सॅनिटरी किट, सोया बिस्किटे व इतर खाद्य वस्तू या वस्त्यांमध्ये पुरविण्यात येत आहेत. अन्नधान्य पुरवठ्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्यावतीने मोफत सुलभ शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. 'एचआयव्ही'ग्रस्त महिलांसाठी 'एआरटी' उपचारपद्धती सुरू असून नियमीतपणे औषधे पुरविण्यात येत आहेत.
पुणे जिल्ह्यात सुमारे दोन हजार पाचशे महिला देहविक्रय व्यवसायात असून त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांनी पोलीसांच्या मदतीने त्यांच्यापर्यंत अन्नधान्य, रेशन किट, सॅनिटरी किट पोहोच केले आहे. फरासखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या मदत कार्यात विशेष भूमिका बजावली आहे. तसेच आरोग्य विभागाकडून नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे. बुधवार पेठमध्ये देहविक्रेत्या महिलांच्या मुलांची संख्या मोठी असून त्यांच्यासाठी शासकीय दूध योजनेतून दुधाचा पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी कात्रज दूध संघाने मदत केली आहे. 'सहेली' संस्थेने येथील महिलांच्या मोबाईल रिचार्ज केले असून त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबांशी संवाद साधता येत असल्याने मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी त्याची मदत झाली आहे.
नाशिक, अहमदनगर, नागपूर आदी मोठ्या शहरांसोबतच सर्वच जिल्ह्यात या महिलांसाठी रेशन किट वाटप, सॅनिटरी किट वाटप आदी उपक्रम सुरू असून अनेक स्वयंसेवी संस्था तसेच या महिलांच्या मुलांसाठी चाईल्डलाईन संस्था काम करत आहे. काही जिल्ह्यात नोंदणी नसलेल्या छुप्या पद्धतीने देहविक्रय व्यवसायात महिला असून त्यांनाही मदत मिळावी यासाठी महिला व बालविकास विभाग अन्य शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे.
आता केवळ एक अडचण उरली आहे ती म्हणजे या स्त्रियांपैकी काहींकडे शासकीय ओळखपत्रे नाहीत, शिधापत्रिका नसलेल्या महिलांनाही शासनाच्या वितरण व्यवस्थेमार्फत रेशन पुरवठा होण्यास अडथळे येताहेत. यासाठीही पाठपुरावा सुरू आहे, सीएमओ महाराष्ट्र यांच्याकडे विशेष अपवाद म्हणून या स्त्रियांना ही मदत देण्यात यावी यासाठी पत्रव्यवहार केला आहे, त्यालाही यश येईल. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रालगतच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश या दोन्ही राज्यातही अशीच मानवतावादी भूमिका घेतल्याचे समोर आलेय. मध्यप्रदेश सरकारने इंदौर, भोपाळ शहरात महाराष्ट्राच्या धर्तीवर योजना राबवण्याचे निश्चित केल्याचे समजते आहे. बंगालमध्ये तर दरबार या एनजीओने अख्ख्या बंगालमधील सेक्सवर्कर्स महिलांची जबाबदारी घेतली आहे, तिथली संख्या देशात सर्वाधिक आहे. ममता सरकारनेही त्यांना मदत देऊ केलीय. दिल्लीमधील जीबीरोडच्या सर्व कोठयात राहणार्या स्त्रियांचीही सर्व सोय केली गेलीय. उत्तरप्रदेशमधील कानपूर, मेरठ, लखनौ या मोठ्या शहरातही अशीच माहिती समोर येतेय. हे चित्र खूप आशावादी आहे. ज्या समाजाने यांना कधी कोणती प्रतिष्ठा दिली नाही आणि कधी आपला घटक मानलं नाही त्या समाजात आजच्या कठीण समयी त्यांना आपलंसं करून घेऊन त्यांची काळजी घेतली जातेय हा बदल खूप सकारात्मक आहे. यांच्या दुवा नक्कीच असर करतील. आमेन..
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा