मंगळवार, २१ जुलै, २०२०

सुब्रमण्यपूरम - भाषेच्या साखळ्या तुटून पडतात तेंव्हा ...

तुम्हाला असं कुणी मान वेळावून पाहिलंय का ?

क्रिस्टल क्लिअर स्क्रीनप्ले आणि लोकेशन्सची नेटकी निवड असली की सिनेमाला भाषेची गरज लागत नाही. पडदा बोलू लागतो आणि कॅमेऱ्याची भाषा आपल्याला सहज कळू लागते...
नेहमीच तिच्या अंगावर प्लेन सिंगल कलर्ड लेहंगा चोळी आहे, तर त्याचे सर्व शर्ट नक्षीदार आहेत. तिचे कलर्स मंद फिकट आहेत तर त्याच्या शर्ट्सचे कलर काहीसे भडक आहेत. त्यानं शर्टला कॉन्ट्रास्ट पॅन्ट घातलीय तर तिच्या आवळ ब्लाऊजला मॅच होणारा दुपट्टा तिला शोभून दिसतो. कधी ती एक वेणी घालते जणू नागीण सळसळते ! तर कधी दोन वेण्या तर कधी अंबाडा बांधते. मात्र तिच्या केसांतला गजरादेखील आकार बदलतो. कधी तो दुपेडी आहे तर कधी सरळ वेणीला पिळे घेणारा आहे तर कधी अर्धवर्तुळाकार आहे. तिच्या गजऱ्यातल्या मोगरकळ्या तिच्यासारख्याच टवटवीत तजेलदार आहेत. तिच्या चेहऱ्यावर रंगरंगोटी दिसत नाही. या बाबतीत त्याचा तर प्रश्नच नाही. दोघानांही रूढार्थाने फेस व्हॅल्यू नाही. कथित देखणेपणाच्या चौकटबद्ध फिल्मी व्याख्येत ते चपखल बसत नाहीत. नायकाला असतो तसा सिक्स पॅक ऍब्जवाला स्टायलिश देखणा लूक त्याच्या तर गावीही नाही. नायिकेसाठी आवश्यक असणारी कोणतीच गणिते तिच्या अंगी नाहीत. तरी देखील ती दोघं आपल्याला खुपत नाहीत ! असं का ? याचं उत्तर प्रेझेंटेशनमध्ये आहे !


पहिल्यांदा ती फिकट गुलाबी ड्रेसमध्ये दिसते तर तो पिवळ्या करड्या शर्टमध्ये. तो सायकलवरून तिच्या
'सुब्रमण्यपूरम'च्या पोस्टरवर देखील
तिच्या याच फेमस लुकला
स्थान मिळालं होतं...
स्वातीचं सौंदर्य टिपिकल दाक्षिणात्य
असलं तरी त्यात स्नेह आणि
आपुलकी जाणवते जी
भारतीय स्त्री मध्ये सार्वकालिक आहे !
मागे येताना मागे मेघात डोकावणाऱ्या नारळाच्या झावळ्या त्याच्या शर्टला खुलून दिसतात. तिचं मान वेळावून मागं पाहणं, त्यानं बत्तीशी दाखवत मनमोकळं हसणं मोहक वाटतं. बसमध्ये तिच्या समोरच्या सीटवर अगदी नवंकोरं नवविवाहित काळंसावळं दांपत्य असणं, तिच्या आकाशी रंगाच्या ड्रेसला मॅच होणारं आभाळ बसच्या खिडकीतून डोकावत राहणं हे विलक्षण आहे. तिने वर्तमानपत्रातलं राशीभविष्य वाचणं आणि तिकडे त्याने हस्तसामुद्रिक ज्योतिषाकडे जाऊन हात दाखवणं मनाला खुणावत राहतं. तिचे जांभळे निळे दुपट्टे डोळ्यात साठून राहतात. गल्लीच्या कोपऱ्यावर तिनं त्याला शोधणं आणि त्यानं मागच्या रस्त्यातून येऊन तिला हुलकावणी देणं, ती येतेय हे कळल्यावर त्यानं लुंगी काढून चालता चालता पॅन्ट कोंबून गल्लीच्या दुसऱ्या टोकाला जाऊन उभं राहणं आणि त्याला पाहून तिचं लाजेने चूर होणं सगळं मंत्रमुग्ध करणारं आहे. ती टांग्यातून जाते तेंव्हा तो तिचा पाठलाग करतो, ती त्याला खुणावते पण तो दाद देत नाही. मधल्या काळात देखणा सूर्योदय होतो आणि चंचल रात्रही होते. त्याच्या
तिच्या ड्रेस कलेक्शन बद्दल शशीकुमारने
बारकाईने विचार केला असावा याची साक्ष जागोजागी येते ...
मित्रांना तिचं वेडावून दाखवणं आणि त्यांचा राग अनावर होणं, त्यानं मध्यस्थी करणं सगळं लोभस वाटतं. गाण्यातली प्रत्येक फ्रेम देखणी आहे. ती पाळण्यावर बसते तेंव्हा तिच्यावर पडणारी पंख्याची सावली असो की देवळाबाहेरच्या कट्ट्यावर ती त्याच्या विचारात दंग झालेली असो, सगळ्या फ्रेम्स मोहक आहेत. आपली मुलगी काय करतेय हे पाहण्यासाठी तिच्या वडिलांचं चाहूल घेणं असो की त्यांना चकवून तिथंच कट्ट्यावर बसून तिला न्याहाळणं असो सगळं मनात साठत जातं. गाण्यातला एक शब्दही कळाला नाही तरी हरकत नाही मात्र गाणं मनाला भावतं. कारण त्या गल्ल्या, ती रंगीबेरंगी बैठी घरं, निरभ्र आकाश, आपल्याच तालात असणारं चराचर आणि यातले बारकावे आपल्यापर्यंत पोहोचवणारा कॅमेरा याच्या जोरावर हे शक्य होतं ! म्हणूनच मला आवडणाऱ्या तमिळ गाण्यात या गीताचं स्थान अव्वल आहे. 


सिनेमा काढायचा असेल आणि त्यातून बक्कळ कमाई करायची असेल तर नामांकित प्रस्थापितांची वर्णी
समोरच्या तळयाकाठी एखादा ध्यानस्थ औदुंबर असता तर त्याचीही समाधी लोप पावली असती. होय ना ?
लावणं अपरिहार्य समजलं जातं. क्वचित कुणी तरी नागराज मंजुळे नव्या लोकांना घेऊन त्यांच्यावर नशीब अजमावतात. नाहीतर ठरलेली नावं आणि ठरलेली प्रस्थ सोबत घेऊन सिनेमे बनवले जातात. या ब्लॉगपोस्टसॊबत दिलेलं गाणं तामिळ सिनेमातलं आहे. 'सुब्रमण्यपूरम' त्या सिनेमाचं नाव. जुलै २००८ मध्ये हा सिनेमा रिलीज झाला आणि तामिळ सिनेसृष्टीत यशोगाथेचा नवा अध्याय लिहिला गेला. एम. शशीकुमार हा याचा निर्माता होता. विशेष बाब म्हणजे त्यानेच दिग्दर्शन केलं होतं, कथा आणि पटकथाही त्याचीच होती. खेरीज सिनेमात त्याची महत्वाची भूमिकाही होती. शशीकुमारच्या आयुष्यातला हा सर्वात मोठा जुगार होता. यावेळी त्याचं वय होतं अवघं चौतीस वर्षांचं. त्याच्या शिदोरीत जेमतेम तीन
कॅमेरा परफेक्शन 
चित्रपटांच्या सहायक दिग्दर्शनाचा अनुभव होता. त्यातही नवे आणि पडीक चेहरे अधिक होते. या चित्रपटांना संमिश्र यश लाभलं होतं. असं असूनही शशीकुमारला जुगार खेळावा वाटला कारण त्याच्या पटकथेवर त्याचा अफाट विश्वास होता. खेरीज मोठी नावं घ्यायची झाली असती तर त्यांना देण्याइतके पैसे त्याच्याकडे नव्हते. बड्या अभिनेत्यांच्या तारखा घेऊन त्याप्रमाणे शेड्युल आखले असते तर चित्रीकरण आठनऊ महिने चालले असते ज्याचा परिणाम बजेटवर झाला असता. शशिकुमारच्या डोक्यात सगळा सिनेमा डोक्यात खिळा ठोकावा तसा फ्रेम टू फ्रेम रुतून बसला होता. त्याने नव्या आणि पडेल चेहऱ्यांना संधी देण्याचं पक्कं केलं. आणि झपाटल्यागत शूट करत अवघ्या ८४ दिवसात सिनेमा पुरा केला.


हे सर्व त्याने आपल्या कथेच्या पटकथेच्या जोरावर केलं. क्रिस्टल क्लिअर स्क्रीनप्ले आणि लोकेशन्सची
काही रंग बहिष्कृत असतात मात्र त्यांचंही एक सौंदर्य असतं...
नेटकी निवड असली की सिनेमाला भाषेची गरज लागत नाही. पडदा बोलू लागतो आणि कॅमेऱ्याची भाषा आपल्याला सहज कळू लागते यावर त्याचा दृढ विश्वास होता. एप्रिल, मे आणि जूनच्या रणरणत्या उन्हाचं वातावरण त्यानं निवडलं होतं. सिनेमात हे ऊन अक्षरशः जाणवतं. त्यानं सेट्सवर अफाट पैसे उधळले नाहीत. दोन गल्ल्यांचे सेट उभे केले आणि बाकीचं चित्रीकरण तामिळ खेड्यांत केलं. १९८० सालची मदुराई त्यानं शब्दशः जिवंत केली. त्याच्या लोकेशन्सवर तामिळ पब्लिक इतकं खुश झालं की 'सुब्रमण्यपूरम'मधल्या गल्ल्या आणि मंदिरं फेमस झाली. लोकांनी तिथं भेट देण्याचा सपाटा लावला. शशीकुमारचा कॅमेरा आपल्याशी घडाघडा बोलतो. तिथली लोकेशन्स आपल्याला हवीहवीशी वाटतात. गावातली माणसं आणि त्यांचं गावाशी एकरूप होऊन जाणं आपल्याला खुणावत राहतं. एक प्रकारचं अनामिक आकर्षण आपल्याला वाटू लागतं.


मदुराईत राहणाऱ्या पाच बेरोजगार मित्रांची कथा 'सुब्रमण्यपूरम' मधे आहे. त्यातल्या जयची प्रेमकथा टप्प्याटप्प्याने समोर येत जाते. सामाजिक विषमतेचे
कपड्यांचा रंग आणि प्रकाश यांची
सांगड घालता आली तर फ्रेम अधिक उठून दिसते...
आणि राजकीय महत्वाकांक्षेत चिरडून निघणाऱ्या जीवांचे संदर्भ घेत त्यांची प्रेमकथा वळणवाटेने सरकत जाते. प्रेक्षक कासावीस होत जातात. सिनेमा फ्लॅशबॅकमधून सुरु होतो. २८ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा भोगलेल्या एका कैद्याची सुटका होणार असते. त्याची सुटका झाल्यावर पोलीसांना त्याच्यात स्वारस्य असायचं काहीच कारण नकोय. मात्र पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून असतात कारण २८ वर्षाच्या कारावासात त्यानं कुठल्याही कैद्याशी वा कारावासातील कोणत्याही तुरुंग कर्मचाऱ्याशी एक शब्दाचे संभाषण केलेलं नसतं. खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगलेला एखादा माणूस २८ वर्ष मौन राहिल्यानंतर त्याच्या डोक्यात काय विचार घॊळत असतील, तो आणखी काही गुन्हे करेल काय याचा सेकंदकाटा पोलिसांच्या डोक्यात टिकटिकत असतो. इथून सिनेमा २८ वर्षे मागे जात थेट १९८० सालच्या मदुराईत जातो. त्याच्या आयुष्यात येऊन गेलेल्या घटनांचे एकेक पदर उलगडत जातो. सिनेमाच्या शेवटी त्याची कोणतीच चूक नव्हती हे कळतं तेंव्हा आपण उन्मळून पडतो. एक अत्यंत भडक कथा असूनही तिचे सादरीकरण कवितेसारखं केल्याने शशीकुमारच्या दिग्दर्शनाचं राहून राहून कौतुक वाटतं.


सिनेमाची कास्टींग करताना शशीच्या डोक्यात काही गणितं पक्की होती. नायिका एकदम सोबर साधी 
magic moments !
टिपिकल तामिळ लुक्स असणारी चुणचुणीत मुलगी हवी होती. त्यानं निवडलेली स्वाती त्याच्या सर्व निकषांना मात देणारी होती. स्वातीला तामिळ लोक 'कलर स्वाती' या नावाने ओळखतात ! तेलुगू कलर्स वाहिनीवर तिचा एक शो होता जो खूप लोकप्रिय ठरला आणि तोच शो तामिळ 'मां टीव्ही'वर टीआरपी कॅचर ठरला. त्यामुळे स्वातीची ओळख कलर स्वाती अशी झाली. एका अर्थाने ती तिला खूप सूट होते कारण कोणत्याही रंगाच्या आणि कोणत्याही धाटणीच्या वस्त्रात तिचं साधं सौंदर्य खुलून दिसतं.
रंगांचा सेन्स परफेक्ट असला की गजऱ्याऐवजी वापरलेला गुलाब अजूनच लालबुंद वाटू लागतो, जोडीला असे नयनबाण !
सिनेमाचा नायक असलेला जय याने याआधी काही मिडीयम बजेटसिनेमात सहायक अभिनेत्याच्या भूमिका केल्या होत्या. जयच्या मित्राची काहीशी विनोदी ढंगाची भूमिका निभावणाऱ्या करुप्पूचा तामिळ इंडस्ट्रीतला प्रवास चढउताराचा होता. खुद्द शशीचा कॅमेऱ्यासमोरचा पहिलाच वावर सरप्राईजिंग होता. सिनेमा लोकांनी इतका डोक्यावर घेतला की २०१२ मध्ये मल्याळममध्ये याचं रीमेक केलं गेलं आणि 'प्रेम अड्डा' या नावाने कन्नड रिमेक केला गेला.


प्रस्थापितांची सद्दी मोडीत काढायची असेल तर धाडस दाखवण्याशिवाय पर्याय नाही हे खरे असले तरी
निरागसता आणि वासना स्पष्ट कळते,
त्यासाठी डोळयांची भाषा कळायला हवी...
स्वाती आणि जय दोघेही निरागस दिसतात !
का तर आपण त्यांच्या डोळ्यात रोखून पाहतो !
धाडसाच्या जोडीने पक्का गृहपाठ असणं आणि कंबरडं मोडेल इतकं हार्डवर्क करण्याची तयारी असणं गरजेचं आहे. अन्यथा धाडस अंगाशी येतं आणि माणूस निराशेच्या खोल गर्तेत जातो. आज शशीकुमारचं दक्षिणेत मोठं नाव आहे कारण शशीकुमारने धाडस केलं आणि तो यशस्वी झाला. याचं कारण त्याचे बेसिक्स एकदम पक्के होते. लेट्स मेक अवर बेसिक्स ऑन हायर साईड... 


- समीर गायकवाड

हातात वही आणि जेवणाचा डबा घेऊन येणारी लाजऱ्या छबीची गुलाबी ड्रेसमधली ती, बिडीचे झुरके घेत मागून निवांत चालत येणारा खेडूत आणि घाईत असलेल्या आजीबाई ....

निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर मंदिराजवळचं पानांनी लगडलेलं झाड खूप प्रसन्न वाटतं मात्र तेच झाड तिच्या फिकट निळसर घागर्यावर मेंदी कलरच्या वेलबुट्टीतून उमटल्यासारखं वाटतं.... या गाण्यातली ही फ्रेम कलर सेन्ससाठी अमेझिंग आहे... मंदिराबाहेरची सौंदर्यदेवता !

२ टिप्पण्या: