गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

देश म्हणजे कागदाचा नकाशा नसतो - देश कागज पर बना नक्शा नहीं होता



जर तुमच्या घराच्याएका खोलीत आग लागली असेल
तर तुम्ही दुसऱ्या खोलीत झोपू शकता का?
जर तुमच्या घराच्या
एका खोलीत प्रेतं
सडत असतील
तरी ही तुम्ही
दुसऱ्या खोलीत प्रार्थना करू शकता का?
जर उत्तर होय असेल
तर मला तुमच्याशी
काही बोलायचे नाही.

देश म्हणजे कागदावर बनवलेला
नकाशा नसतो
ज्यातला एक भाग फाटला गेला तरी
बाकी भाग तसेच शाबूत राहतील
आणि नद्या, पर्वत, शहर, गाव
पूर्ववत आपल्याच जागी दिसतील
खिन्न नसतील.
जर तुम्ही असं मानत नसाल
तर मला तुमच्या सोबत
राहायचे नाही.
या जगात अद्याप तरी मानवाच्या जिवापेक्षा
काहीच मोठं नाही
ना ईश्वर
ना ज्ञान
ना निवडणूक.
कागदावर लिहिलेली कोणतीही रचना
फाडली जाऊ शकते
आणि मातीच्या सातही थरांमध्ये
गाडली जाऊ शकते.
जो विवेक
प्रेतांच्या टेकूवर उभा असेल
तो अंध असेल.
जे शासन
बंदुकीच्या नळीवर चालत असेल
तो शस्त्रांचा व्यापार असेल.
जर तुम्ही असे मानत नसाल
तर मला
आता एक क्षण देखील
तुम्हांस सहन करायचे नाही

याद राखा
एका बालकाची हत्या,
एका स्त्रीचा मृत्यू,
एका माणसाचा
गोळ्यांनी चाळण झालेला देह
म्हणजे कुठल्या सरकारचे पतन नसून
पतन संपूर्ण देशाचे.
असा रक्तपात केल्याने
धरतीत आत्मा राहत नाही
नि आकाशात फडकणारे झेंडे
काळे होऊन जातात.

ज्या भूमीवर
सैनिकांच्या बुटांचे ठसे असतील
आणि त्यांच्यावर
कलेवरं पडत असतील
ती भूमी
जर तुमच्या धमन्यात
आग बनून वाहत नसेल
तर समजून जा
की तुम्ही बंजर झाला आहात
तिथे तुम्हाला श्वास घेण्याचा देखील अधिकार नाहीये
तुमच्यासाठी नाही राहिली ही दुनिया.

अखेरची गोष्ट
अगदी स्पष्ट,
कोणत्याच खुन्याला
कधीही माफ करू नका
मग असला जरी तुमचा दोस्तयार,
धर्माचा ठेकेदार
वा असला जरी लोकशाहीचा
स्वयंघोषित चौकीदार!

देश म्हणजे कागदावर बनवलेला
नकाशा नसतो
देश असतो कोट्यवधी माणसांनी बनलेला एकसंध देह
ज्यात नांदतात तुमचे आमचे यांचे त्यांचे सर्वांचे संसार!

नोंद - विख्यात हिन्दी कवी सर्वेश्वर दयाल सक्सेना यांच्या 'जर तुमच्या घराच्या
एका खोलीत आग लागली असेल
तर तुम्ही दुसऱ्या खोलीत झोपू शकता का?
जर तुमच्या घराच्या
एका खोलीत प्रेतं
सडत असतील
तरी ही तुम्ही
दुसऱ्या खोलीत प्रार्थना करू शकता का?
जर उत्तर होय असेल
तर मला तुमच्याशी
काही बोलायचे नाही.

देश म्हणजे कागदावर बनवलेला
नकाशा नसतो
ज्यातला एक भाग फाटला गेला तरी
बाकी भाग तसेच शाबूत राहतील
आणि नद्या, पर्वत, शहर, गाव
पूर्ववत आपल्याच जागी दिसतील
खिन्न नसतील.
जर तुम्ही असं मानत नसाल
तर मला तुमच्या सोबत
राहायचे नाही.

या जगात अद्याप तरी मानवाच्या जिवापेक्षा
काहीच मोठं नाही
ना ईश्वर
ना ज्ञान
ना निवडणूक.
कागदावर लिहिलेली कोणतीही रचना
फाडली जाऊ शकते
आणि मातीच्या सातही थरांमध्ये
गाडली जाऊ शकते.
जो विवेक
प्रेतांच्या टेकूवर उभा असेल
तो अंध असेल.
जे शासन
बंदुकीच्या नळीवर चालत असेल
तो शस्त्रांचा व्यापार असेल.
जर तुम्ही असे मानत नसाल
तर मला
आता एक क्षण देखील
तुम्हांस सहन करायचे नाही

याद राखा
एका बालकाची हत्या,
एका स्त्रीचा मृत्यू,
एका माणसाचा
गोळ्यांनी चाळण झालेला देह
म्हणजे कुठल्या सरकारचे पतन नसून
पतन संपूर्ण देशाचे.
असा रक्तपात केल्याने
धरतीत आत्मा राहत नाही
नि आकाशात फडकणारे झेंडे
काळे होऊन जातात.

ज्या भूमीवर
सैनिकांच्या बुटांचे ठसे असतील
आणि त्यांच्यावर
कलेवरं पडत असतील
ती भूमी
जर तुमच्या धमन्यात
आग बनून वाहत नसेल
तर समजून जा
की तुम्ही बंजर झाला आहात
तिथे तुम्हाला श्वास घेण्याचा देखील अधिकार नाहीये
तुमच्यासाठी नाही राहिली ही दुनिया.

अखेरची गोष्ट
अगदी स्पष्ट,
कोणत्याच खुन्याला
कधीही माफ करू नका
मग असला जरी तुमचा दोस्तयार,
धर्माचा ठेकेदार
वा असला जरी लोकशाहीचा
स्वयंघोषित चौकीदार!

देश म्हणजे कागदावर बनवलेला
नकाशा नसतो
देश असतो कोट्यवधी माणसांनी बनलेला एकसंध देह
ज्यात नांदतात तुमचे आमचे यांचे त्यांचे सर्वांचे संसार!

नोंद - विख्यात हिन्दी कवी सर्वेश्वर दयाल सक्सेना यांच्या 'देश कागज पर बना नक्शा नहीं होता’ या प्रसिद्ध कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे आणि यातले अंतिम कडवे स्वरचित आहे.
सोबतची क्लिप इंटरनेटवरून साभार.

https://fb.watch/eUgR8DiJco/’ या प्रसिद्ध कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे आणि यातले अंतिम कडवे स्वरचित आहे.
सोबतची क्लिप इंटरनेटवरून साभार.

https://fb.watch/eUgR8DiJco/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा