Friday, July 1, 2016

अनुवादित कविता - जेहरा निगाह : पाकिस्तान, उर्दू कविता

 आई तू मला वाचवू शकली
असतीस, आई तू मला वाचवू शकली असतीस.
तुझ्या रक्ताच्या मेंदीने माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक अणूरेणू रंगलेला होता गं !

मला पूर्णत्वास येऊ द्यायला पाहिजे होतं, प्रत्येक अंग रक्ताने अजूनही भरलं गेलं असतं.
माझ्या डोळ्यांना प्रकाशकिरणांनी शिवण्याआधी काजळाने रेखांकीत केलं असतं.
सट्टा बट्टा करावा तसं मला दिलं घेतलं असतं, वा हॉनर किलिंगसाठी मी कामी आले असते !
मात्र आता प्रत्येक स्वप्नं अधुरीच राहिलीत ..
मी थोडी मोठी झाली असती तर माझ्या वडीलांचा लौकिक घटला असता,
माझी ओढणी थोडी जरी घसरली असती तर माझ्या भावाच्या पगडीच्या गर्वाला धक्का बसला असता.
पण तुझी मधुर अंगाई ऐकण्याआधीच, माझ्या न जन्मलेल्या चिरनिद्रेच्या मी अधीन झाले.
आई, मी एका अज्ञात प्रदेशातून आले होते आणि आता एका अज्ञात प्रदेशात हरवतेय.
आई मला वाचवू शकली असतीस, आई मला वाचवू शकली असतीस
तुझ्या रक्ताच्या मेंदीने माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक अणूरेणू रंगलेला होता गं !

~~~~~~~~~~~~~
सुप्रसिद्ध पाकिस्तानी कवयित्री जेहरा निगाह यांच्या कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे. आज घडीला जेहरांच्या बंडखोर काव्यशैलीने संपूर्ण पाकिस्तानला भुरळ घातलीय. क्लेशदायक विचारांना त्या आपल्या रचनांत नव्या आयामात गुंफतात, त्यातला आशय एकदम टोकदार करताना
वाचकांना विचार करण्यास भाग पाडतात. स्त्रियांविषयक पारंपारिक दृष्टीकोनास सुरुंग लावताना त्या आपला ठसा कवितेत उमटवतात. बालवयापासून त्यांनी काव्यनिर्मिती केली आहे. एक मनस्वी अक्षरयात्री म्हणून त्या साहित्यविश्वास परिचित आहेत..

या कवितेतील पाकिस्तानची सामाजिक स्थिती आणि आपल्याकडील सामाजिक स्थिती यात काहीच फरक नाही. चला इथे तरी आपल्या दोहोंत समानता आहे. दोहोतले कुणी पुढारलेले नाही, आपण दोघेही मागासलेलेच आहोत !! स्त्री असतेच मुळात शोषणासाठी हा विचार इतका खोलवर रुजलाय की त्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी कोट्यावधी हातांचा एल्गार अनिवार्य आहे, तो होईल तेंव्हा होईल पण तोवर संवेदनशील मनांनी शब्दांचा अविरत जागर केला पाहिजे..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Mother I’ve Been Saved

I’ve been saved Mother, Mother I’ve been saved
The henna of your blood has dyed every pore of my almost being
Had I been allowed to form, each feature would have still filled with blood
Had light come to my eyes they would have been lined with the kohl of acid
I would have been bartered in satta-watta or been useful for an honour killing
Every dream would have been unfulfilled 
Had I grown even a little, my father would have diminished in stature
Had my scarf slipped just a little, my brother’s proud turban would have tumbled
Before I could hear your lullaby, I went into my own unborn sleep
I came from an unknown land, Mother I am lost in an unknown land
I’ve been saved Mother, Mother I’ve been saved
The henna of your blood has dyed every pore of my almost being
I’ve been saved Mother
​~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Main bach gayi maa

Main bach gayi maa, main bach gayi maa
Tere kachhe lahu ki mehndi mere por por men rach gayi maa

Gar mere naqsh ubhar aate, vo phir bhi lahu se bhar jaate
Meri aankhen raushan ho jaatin to tezaab ka surma lag jaata

Sate-wate men bat jaati, ya kaari men kaam aa jaati
Har khwaab adhoora reh jaata

Mera qad jo thora sa barhta, mere baap ka qad chhota parta
Meri chunni jo sar se dhalak jaati, mere bhaai ki pagri gir jaati

Teri lori sunne se pehle main apni neend men so gayi maa
Anjaan nagar se aai thi, anjaan nagar men kho gayi maa

Main bach gayi maa, main bach gayi maa
Tere kachhe lahoo ki mehndi mere por por men rach gayi maa
Main bach gayi maa
[Note: n in italics - the ’n’ is not pronounced, it just indicates that the vowel before is nasal] No comments:

Post a Comment