Monday, March 7, 2016

विश्वाचे आर्त ....


आटल्या नद्या, आटले ओढे, मातीत नुरले पाणी टिपूसभर. 
वाळूच्या मोहात खोदले डोह, डोहांच्या पात्री उरले सांगाडे ! 
कापली झाडे, तोडली बने, जंगलात नुरली सावली कणभर. 
काँक्रिटच्या जगात चिणले देह, झाडांच्या अंती चितेचे जळणे 
गेले सांगुनी तुकोबा वृक्ष वल्ली वनचरे आम्हा सोयरे आम्ही तुकोबांनाच सदेह स्वर्गात पाठवले बुडवून गाथेचे उतारे ! 
अक्कल न आली आम्हा, मृत्यू राहिला जरी सर्वांच्या दारी उभा 
पाण्यासाठी पडतील जेंव्हा मुडदे, तेंव्हा उरतील फक्त झाडांचे बुडखे! 
आटल्या नद्या, आटले ओढे, मातीत नुरले पाणी टिपूसभर. 
पाण्याच्या शोधात खोदले विश्व, विश्वाचे आर्त जाहले कोरडे ! 

 - समीर गायकवाड.