रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

पोरीची जात, त्यात कवळी..!


चापून चोपून नववार साडी नेसणारी पारुबाई भाजी मंडईच्या बाहेर रस्त्यावर भाजी विकायला बसते. सविता आणि मी आम्ही दोघेही भाजी आणायला गेलो की पारुबाईची भेट हमखास होतेच. आजही तिच्यासमोर भाजी घेत उभे होतो. तिचे तोंड एकदम उतरलेलं. तिचा मूड बदलावा म्हणून प्रश्न केला.

"काय पारुबाई नात कुठं दिसत नाही?"
तिने मान हलवली नि कसनुसं हसली. तिचे उदास मौन पाहून सवितानेही तोच प्रश्न केला. मग ती बोलती झाली.
"काही नाही, तिला काल न्हाण आलंया. आता ती इथं यायची नाही."

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

जानकी के लिए ..

sameerbapu
जानकी के लिए..  

देह गतप्राण झलाय रावणाचा 
स्तब्ध झालीय लंका सारी
सुनसान झालीय किल्ल्याची तटबंदी
कुठे कसला उत्साह नाही
नाही तेवला दिवा कुणाच्या घरी
घर बिभिषणाचे वगळता!

समुद्र किनारी बसलेले विजयी राम
बिभिषणास राज्य लंकेचे सोपवताहेत
जेणेकरून प्रातःकाळीच व्हावा त्याचा राज्याभिषेक
सातत्याने ते लक्ष्मणास पृच्छा करताहेत
आपल्या सहकाऱ्यांचे क्षेम कुशल जाणताहेत
चरणापाशी त्यांच्या बसुनी आहे हनुमान!