शुक्रवार, ३१ मे, २०१९

शुगर अँड ब्राऊनीज - दारिया कोमानेस्क्यू (रोमानिया)


जेंव्हा कधी 'टिकटॉक' ओपन केलेलं तेंव्हा तेंव्हा हे गाणं कानावर आलेलं. आपली जिज्ञासा मूलतःच चौकस असल्यानं सवयीनं या गाण्याचा पिच्छा पुरवला.
मग हाती लागली एक सुंदर प्रेम कविता आणि एक संवेदनशील प्रतिभाशाली तरुण गायिका, कवयित्री.
दारिया कोमानेस्क्यू तिचं नाव. धारिया हे तिचं निकनेम.

रोमानियाची ती पहिली फिमेल सिंगर आहे जिने अनेक देशाचे चार्ट बर्स्ट केलेत. वयाच्या १३ व्या वर्षी ब्रियानाच्या 'लॉस्ट इन इस्तंबूल'साठी तिनं कंटेंट रायटरचं काम केलं होतं. दक्षिण अमेरीकन देशातील अनेक गायिकांसाठी तिनं कंटेंट प्रोव्हाईड केलंय.
ती आता केवळ १५ वर्षांची आहे पण तिनं लिहिलेली गीतं खूप अर्थपूर्ण आहेत. मागच्या वर्षी रिलीज झालेला 'शुगर अँड ब्राऊनीज' अल्बम हिट झाला. त्याच्या कव्हर सॉंगने टिकटॉकवर धुमाकूळ घातलाय.
विशेष म्हणजे जगभरातील अनेक भाषीय टिकटॉक युजर्सकडून वापरल्या गेलेल्या मोजक्या गाण्यांत याचा समावेश झालाय.

हे गाणं ज्यांनी ज्यांनी वापरलं त्यांना मूळ गीत ठाऊक होते का किंवा त्याचा अर्थ ज्ञात होता का हा मुद्दा आता गौण ठरेल. हे गाणं म्हणजे कोवळ्या वयात प्रेमात पडलेल्या आणि नंतर बाजी हरूनही उमेद टिकवून असलेल्या प्रेमिकेची विराणी आहे.
'शुगर अँड ब्राऊनीज' या गीताचा हा स्वैर अनुवाद -

काही जण डायरी लिहितात,
खरं तर ते फँटसीसारखं वाटतं
पण प्रत्यक्षात त्यासाठी प्रेम असणं आणि प्रेमाचा आवेग असणं गरजेचं असतं
हे असं काही असतं की ज्याच्या आड मी दडते
ज्याची काहीच शाश्वती नसते.
प्रेमात पडणं इतकं सोपं असतं की
काहीजण याची व्याख्या साखर आणि चॉकलेटसारखी करतात...

समुद्रसूतासही तिथं गारवा लाभतो
ज्याच्या आसपास कुठं तरी तू मला वचन दिलं होतंस
केवळ मला आनंद देण्यासाठीची बाब होती ती !
तिथं आता वीजा चमकल्यासारखं वाटतंय
तरीही तुझा अज्ञात प्रकाशच मला दिशा देतोय
त्यावरही जीव जडेल की काय अशी भीती वाटतेय
लपून राहावं अशी जागाच उरली नाहीय
जरी लपलेच तरी शोधून काढणं कठीण जाणार नाही...

आपल्या प्रेमात आपण हार का मानत नाही याचं कारण अगदी साधं आहे
खरं तर आपण चंद्र सूर्यासारखे आहोत, जणू मादी नि नर !
एकमेकांना चकाकताना पाहण्यात आपल्याला आनंद वाटतो
आपल्याकडं आजची रात्र आहे, उद्याचा दिवस असेल
आणखीही बरेच दिवस असतील
ज्यातून आपण एकमेकांना अनुरोध करत राहू
आपली केमिस्ट्री जुळवण्याचा प्रयत्न करत राहू
तोवर मी तुझ्या साठी गात राहीन
ऊह ऊहा नान ना ऊह नान ना ऊह...

~~~~~ ~~~~

गाण्यातले ड्रम बीट्स लाजवाब आहेत. रिदम परफेक्ट् आहे. धारियाचा आवाज ही छान आहे, व्हिडीओ तर भारीच आहे.
जग सुंदर देखणं आहे, प्रेमाने ओतप्रोत भरलेलं आहे. आपल्याला काय पाहायचं आहे आणि काय शोधायचं आहे हे उमगायला हवं !
बस्स ! जगणं समृद्ध होण्यासाठी आणखी सात जन्म कशाला हवेत ?

- समीर गायकवाड.

मूळ गीत -
Some keep a diary
Seems like a fantasy
But it may require some love and desire
It's something to cover me
There's never a guarantee
That loving is so easy
Some may define it as sugar and brownies
But sour just as lime is

Uh na na na

Son of the ocean breeze
Somewhere you promised me
A love like a fire, no fears, no denial
Just something to gladden me
I feel electricity
Your lighting is guiding me
I fear that I like it
No place we can hide it
So hard not to find it

Uh na na na

The reason why we don't give up on our love is simple
We're like the sun and moon versuri.us
We like to see each other shining bright
We have tonight, tomorrow
And the other days that follow
We have to try to make things right
I'll sing to you like

Uh na na na
Uh na na na...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा