गुरुवार, १९ जुलै, २०१८

रेड लाईट डायरीज - पांढरपेशींच्या दुनियेतला ऑनलाईन रेडलाईट 'धंदा' ..


पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्कमधील गणेश मंदिरानजीकच्या एका उच्चभ्रू वस्तीतील अपार्टमेंटमध्ये अठरा जुलै २०१८ रोजी पोलीसांनी रेड टाकून सात मुलींची सुटका (?) केली आणि पाच जणांना अटक केली, दोघे फरार (!) होण्यात यशस्वी झाले. हे रॅकेट व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामवरून चालत होते. आयटी पार्क मधले रॅकेट असल्याने याचे सर्व्हिस प्रोव्हायडींग फंडे ही डिजिटल आणि आधुनिक होते. ही माहिती स्टेशन डायरीतून येते. मी याही पुढची माहिती देतो. या गोरखधंद्याची व्याप्ती पुणे शहरात वा संपूर्ण महाराष्ट्रात वा अखिल देशात किती आणि कशी असावी याची झलक तुम्हाला यातून मिळेल.


केवळ पुण्यातील फिमेल एस्कॉर्टच्या अनेक साईट्स इंटरनेटवर खुलेआम उपलब्ध आहेत. वानगीदाखल इथे एक लिंक देतोय - http://www.kritiapte.com/pune-call-girls-contact.html ही लिंक संशयास्पद आहे. कुणा  किर्ती आपटेच्या नावाने उघडलेले हे वेब पोर्टल जसे खरे ही आहे तसे फसवेही आहे. पुण्यातील विश्रांतवाडी, येरवडा, धायरी, लोणावळा, कोथरूड, लोणावळा, कोरेगाव, कात्रज, औंध, शिवणे, पाषाण, विमान नगर, शिवाजी नगरसह अनेक सबलिंक्स यात ओपन होतात. प्रत्येक लिंकवर मुलींबद्दल आणि व्यवहाराबद्दल माहिती दिलीय. मुलींचे फोटो आहेत पण ते फेक आहेत. प्रत्येक पेजवर एक नंबर येतो आणि या नंबरवर कॉल करा असे सुचवले जाते. नंबर एकच आहे पण प्रत्येक पेजवर त्याची नावे वेगवेगळी दिली आहेत. +919168151778 हा तो नंबर आहे. या नंबरला कॉल केला तर बीप आवाज येऊन कॉल कट होतो. हा नंबर सेव्ह केल्यास व्हॉटसऍपवर एक मुलीचा डीपी दिसतो आणि स्टेट्समध्ये 'कीर्ती आपटे मॅनेजर' असा मजकूर येतो. मेसेज पाठवल्यास कधी रिप्लाय येतो तर कधी नाही. मुलींचे फोटो पाठवले जातील, पत्ता सांगा, बँक डिटेल्स, पे टीएम प्रोव्हाइड होतात. कधी कधी काहीच रिप्लाय येत नाही.

घटकाभर आपण असे धरून चालू की हे सगळे फ्रॉड आहे आणि याद्वारे सेक्स स्कँडल्स वा प्रॉस्टीट्युशन होत नाही. मग या पोर्टलवरून मुलींचे आमिष दाखवून पैसे काढले जातात हे तर नक्की. अशा पद्धतीने फसवल्या गेलेल्या अनेकांनी त्यांची माहिती माझ्याशी शेअर केलीय. सायबर क्राईम अशा पोर्टल्सना सहज आळा घालू शकतं पण त्या साठीची इच्छाशक्ती तीव्र हवी आणि महत्वाचे म्हणजे पोलिसांच्या कारवाईत राजकारणी मंडळींनी हस्तक्षेप थांबवला पाहिजे. संजना एस्कॉर्ट tel:9657982077, स्वाती सेठी (swatisethi), https://pune.locanto.net/Personals-Services/209/, शिवानी - ९७१८६२७५०९, कविता - ७४४९२५१७०५, संध्या - ८३४७८५८९९२ ! किती म्हणून एस्कॉर्टची नावे, लिंक्स आणि नंबर द्यावेत !

यातले काही सर्विस प्रोवायडर तर मॉडेल्स आणि टीव्ही मालिकातील मुली उपलब्ध करून देतात. याकरिता आधी मुलींचे फोटो पाठवले जातात त्यातून मुलगी सिलेक्ट करून 'डील' फायनल करावी लागते. मग आपण हॉटेलचे नाव आणि रूम नंबर दिला की मुलगी तिथे पाठवली जाते. ही रक्कम एक हजार ते एक लाख इतक्या मोठ्या रेंजमध्ये घेतली जाते. दुर्दैव असे की या मुलींच्या वाट्याला जेमतेम काही शे वा काही हजार येतात. बाकी सगळे पैसे एस्कॉर्टवाले हडप करतात. शिवाय ब्लॅकमेलिंगची शक्यता मोठी असते.

पूर्वी या बायका शहराच्या एखाद्या भागात वा एकाच ठिकाणी राहत होत्या, तो भाग रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जायचा. तथाकथित सभ्य लोक येथून येत जात नसत. समाजाने त्यांची घृणा करत किळस करत त्यांना त्या त्या जागांवरून विस्थापित केलंय. आता प्रत्येक शहरात अनेक अपार्टमेंटमध्ये हा धंदा सुरु आहे. पूर्वी एकाच कोपरयात असलेल्या या बायका आता पांढरपेशी वस्तीपासून ते तथाकथित उच्चभ्रू एरियात देखील स्थिरस्थावर झाल्यात. आता यांची किळस कोण आणि कशी करणार ? यांची घृणा कशी येणार ? यांना कोण आणि कोठून हुसकून लावणार ? यांना कोण ओळखणार ?

आजवर अनेक टिप्स दिल्यात आता नको वाटते. इंटरनेटवर नुसते pune female escort phone numbers एव्हढेच टाईप केलं तर इतका मोठा उकिरडा समोर येतो की डोळे झाकून घ्यावे वाटतात. अन्य अनेक tag key बदलून टाईप केलं की आणखी वेगळ्या साईटस ओपन होतात. काही ठिकाणी अश्लील छायाचित्रे, अश्लील मजकूर येतो तर काही ठिकाणी सराईत सौदेबाजी !

कोण असतात या मुली ? कोठून येतात या ? यांना याची तिडीक येत नाही का ? इझी मनी समाजाला कुठे घेऊन जाणार आहे ? या मुलींचे भविष्य काय असणार आहे ? यांना यातून बाहेर काढले जाते का ? रेडमधल्या मुलींचे पुढे काय होते ? पोलीस आणि राजकारणी यांचा नेक्सस कसा काम करतो ? या प्रश्नांच्या मुळाशी गेलं की मेंदू बधिर होतो आणि प्रचंड निराशेच्या गर्तेत फेकलॊ जातो.

इथे पुणे शहराचा उल्लेख उदाहरणासाठी केलाय, अन्य कोणतेही हेतू नाहीत. ही कीड आता देशव्यापी आहे. भोवतालच्या साध्या, स्वच्छ दिसणाऱ्या वातावरणात नेमके काय काय सुरु आहे हे लोकांना कळावे एव्हढा एकच हेतू या लेखामागे आहे. फालतू प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात घालण्याची आणि स्वतःची बदनामी करून घेण्याची हौस नाही. एक मात्र नक्की सांगेन, माझा जर कधी अपघाती मृत्यू झाला तर त्याची चौकशी केली जावी. असो..

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा