रविवार, १० सप्टेंबर, २०१७

रेड लाईट एरिया आणि मुंबईतल्या एनजीओ...

रेड लाईट एरियावरील पोस्टस वाचून अनेकजण भारावून जातात. 'यासाठी आम्ही काय करू शकतो ?' अशी विचारणा करतात. सर्वांनीच प्रत्यक्ष ठोस कृती करावी म्हणून मी हे लेखन करत नाही. या उपेक्षित आणि शोषित घटकाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलावा यावर मुख्य फोकस आहे. ज्यांना प्रत्यक्ष मदत करावी वाटते त्यांनी शक्यतो एनजीओजच्या कार्यालयांना थेट भेट दिल्याशिवाय आर्थिक मदत देऊ नये असे माझे मत आहे. पेक्षा आपल्या भागातील एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यास सोबत घेऊन अशा वस्त्यांत आपली मदत वस्तूस्वरूपात देणं योग्य.

आर्थिक मदतच करायची असेल तर अशा स्त्रियांच्या मुलांचे पालकत्व घेणं वा 'लाईन'मधून बाद झालेल्या प्रौढ / वृद्ध स्त्रीस वृद्धाश्रमापर्यंत नेणे किंवा तिच्या देखभालीसाठी दरमहा मदत करणे असे अनेक पर्याय उभे राहतात... या क्षेत्रात टोटली ग्राउंड लेव्हलवर काम करणारया माणसांची प्रचंड वानवा आहे कारण यात लोकांना बदनामीची मोठी भीती वाटते जी रास्तच आहे. कारण अशी बदनामी झाली की माणूस त्याच्या सकल वर्तुळातून उठतो ! जसे फेबुवर काही लोक माझा उल्लेख '##बाज' असा करतात ! ते तरी काय करणार, बिचारे त्या वासनावर्तुळाबाहेर पडू शकत नाहीत. माफ करतो मी त्यांना. शिवाय मी जरा निगरगट्टही झालोय, अशा शेरयांची थोडीफार सवयही झालीय. असो. या महिलांच्या अडचणीत भर पडते ती या व्यवसायाची अनधिकृतता, याचं बटबटीत ओंगळवाणं स्वरूप व यातीलच काही स्त्रियांच्या बेताल वागण्याने तयार झालेली सामाजिक हानिकारक प्रतिमा. या सगळ्या हर्डल्सवर मात करताना कधी कायद्यांचा तर कधी भोवतालच्या परिसरातील लोकांचा तर कधी व्यवस्थेचा प्रचंड त्रास होतो. अनेकांना इनबॉक्समध्ये यावर माहिती दिलेली आहे. यांना दिलेली आपुलकीसुद्धा जगण्यास पुरेशी ठरते. फार काही मदतीची अपेक्षा नसते यांची. आपल्या महिला संक्रांतीच्या वाणासाठी जो खर्च करतात तितका खर्च एका मुलाचे आयुष्य घडवू शकतो. बकरी ईदला जिवंत प्राण्याची कुर्बानी देण्याऐवजी ती रक्कम इथे दिल्यास एका वृद्ध वेश्येचे वर्ष भागू शकते. लग्नाचा वा व्यक्तीचा वाढदिवस, पुण्यस्मरणासाठीचा खर्च अशा अगणित गोष्टीवरचा खर्च टाळून वा कमी करून आपण हे करू शकतो.

आजवर माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मदत करणारया सृजन व्यक्तींची संख्या शेकडोंच्या घरात गेली आहे याचा मला अभिमान आहे. इनबॉक्स याने ओसंडून वाहतो. बाहेरगावी असलो की अशा मेसेजेसना रिप्लाय देण्यात उशीर होतो याची खंत वाटते. केवळ मुंबईत या विषयावर काम करणारया काही संस्थांची नावे खाली दिली आहेत. मदतीविषयी या पोस्टच्या सुरुवातीसच माझे मत दिलेले आहे आणि त्यावर मी ठाम आहे. मदतीची याचना करणे हा पोस्टचा हेतू नसून माहिती देणे हा हेतू आहे. अन्यथा यावरही काही लोकं गॉसिप करायला मागेपुढे करणार नाहीत. यादीव्यतिरिक्तही बरयाच संस्था यावर काम करतात हे ही नमूद करतो.

आजवरच्या या विषयांवरील पोस्टसना प्रतिसाद देणारया सर्व सुहृदांचे आभार ...

- समीर गायकवाड.

______________________________________________
Apnalaya : Leena Joshi : Mob -98926 32224, Phone - 25506110, 30918248, 9892210752 . Grant Road

Doorstep School : Phone - 2385 9203 / 2382 6343 Kamathipura

PRERANA : Phone - 2305 3166 ;2569 5986 ;2570 0128 Kanjurmarg

Aadhar - Lilaben Dave : Block No. 9, 2nd Floor, Babuline Complex, S. V. Road, Malad (West), Mumbai – 400 064. Phone -2888 5018

All Saints Home - All Saints Home Buildings, 54-A, Dockyard Road, Mazgaon, Mumbai – 400 010.

Asha Sadan Maharashtra State Women Council, Rescue Home, Children Section - Asha Sadan Marg, Umerkhadi, Mumbai – 400 009. PHONE - 2376 1895, 2376 1477, 2374 0397, 2376 1386

Bal Asha Trust - King George Memorial, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai – 400 011. Phone - 2494 4090, 2492 6526

Beggar's Home for Women- Opp. Jain Mandir, R. K. Chemburkar Marg, Chembur, Mumbai – 400 071. Phone - 2522 1657
Maa Niketan - Opp. Devi Dayal Cables, 2nd Pokhran Road, Thane (West) – 400 601. Phone - 2534 1773, 2536 6949

Maharashtra State Womens Council - Town Hall (Central Library), Horniman Circle, Fort, Mumbai – 400 001. Phone - 2266 2013

Mahila Dakshata Sammitti - Yusuf Maherali Seva Kendra, D/15, Ganesh Prasad, Slater Road, Grant Road, Mumbai – 400 007. Phone - 2308 5010.

Matrusadan - Plot No. 30, Sector No. 10, Phase 2, Nerul, New Mumbai – 400 706 Phone - 2768 2360, 2409 6873
Maze Maher - Mahila Jeevan Samvardhan Mandal, Abhudaya Nagar, Building No. 34, First Floor, Opp. Kalachowky Police Chowky, Mumbai – 400 012. Phone - 2413 2677

Sakhya Nirmala Niketan - 38, New Marine Lines, Mumbai – 400 020.
Savdhaan - 115/B, Ambedkar Road, Bandra (West), Mumbai – 400 050. Phone - 2642 7123
Shepherd Widows Home - Superintendent, 15/A, Shepherd Road, Off Clare Road, Nagpada, Near Byculla Station, Byculla (West), Mumbai – 400 008 Phone - 2308 8726

Special Cell for Women in Distress - C. I. D. Office, Opp. Craford Market, Mumbai – 400 001. Phone -2262 0111, 2262 2775

Stree Chetna Shobha S. Wadhwani, 1210, Shubh Asha Bunglow, Off. 10th Road, B/H. Jain Temple, Chembur, Mumbai – 400 074. Phone - 2556 3747

Stree Niketan North Bombay Branch : A/19, 5th Road, Maharaja Surajmal, Char Bungla, Juhu Varsova Link Road, Andheri (West), Mumbai – 400 053. Phone - 2623 0981.

Swadhar Keshav Gore Smarak Trust - Aarey Road, Goregaon (West), Mumbai – 400 062. Phone - 2872 4123, 2872 0638

Women Centre - 104-B, Sunrise Apartment, Vakola Pipe Line, Nehru Road, Santacruz (East), Mumbai – 400 055. Phone - 2614 0403

Vatsalya : Phone - 2578 2958 / 2579 4798

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा