मंगळवार, २ जून, २०१५

सामूहिक कबर - खादीम खंजेर : इराकी कविता


ब्रेकींग न्यूज : निकटच्या अंतरावरच सामुहिक कबर सापडलीय !
कालच मी फोरेन्सिक मेडिसिन विभागात जाऊन आलो. 
त्यांनी माझ्या बोटांचे ठसे मागितलेले, डीएनए जुळतो का ते टेस्ट करण्यासाठी. 
ते सांगत होते की, त्यांना काही विजोड कुळाच्या अस्थी मिळाल्यात.
आशेच्या सुऱ्याच्या पात्यावर ठेवलेल्या संत्र्यासारखं दर टेस्टगणिक वाटत होतं. 
बंधू, मी आता घरी आलो आहे.
तुझ्या फोटो फ्रेमसमोर ठेवलेल्या कृत्रिम फुलांवरची धूळ हटवतोय अन अश्रूंनी त्यांचे सिंचन करतोय.

आताच मेडिकल रिपोर्ट आलाय,
ज्या हाडांची थैली मिळाल्याची पोच पावती मी दिलीय, ती थैली 'तुझी' आहे असं त्यात म्हटलंय.
पण ती खूपच किरकोळ आहे. 
घरी नेऊन टेबलावरती सगळी हाडे मी विखरून ठेवली आहेत, 
त्याचे त्यांनी बारकावे दिलेत - सहा छिद्रे असलेली कवटी, एक क्लेव्हिकल, तीन फासळ्या, 
तासलं गेलेलं फिमर, मनगटातील हाडांचा बुकणा आणि काही मणके. 
हा इतकासा ऐवज म्हणजे तू कसा काय असू शकतोस बंधू ? 
पण मेडीकल रिपोर्ट तर तसेच सूचित करतोय. 
सगळी हाडे मी पुन्हा थैलीत ठेवलीत. 
माझ्या हातांवर चढलेली त्या हाडांवरची मातकट धूळ मी झटकली, 
टेबलावर पडलेली उरली सुरली मातकट धूळही फुंकून टाकली आणि 
तुला माझ्या 'पाठीवर' घेऊन मी बाहेर पडलो. 

बसमध्ये बसल्यावर ती थैली माझ्याशेजारीच ठेवली. 
त्यासाठी मी दोन सीटचं तिकीट काढलं. 
यावेळेस तिकीटाचे पैसे अदा करणारा मी होतो !
आता मी तितका तरी नक्कीच मोठा झालोय की तुला पाठीवर वागवू शकेन अन तुझं बसचं तिकीट काढू शकेन.

मला इतकी छोटी अमानत मिळाल्याचं मी कुणालाच कळवलं नाही, 
ज्या सोफ्यावर 'तुला' सामावून घेणारी ती थैली ठेवली होती, त्याच्या अगदी जवळून तुझी पत्नी आणि मुलं खेटून गेली. 
त्यांच्यापैकी कोणी तरी ती थैली उघडून पाहावी असं मला राहूनराहून वाटत होतं. 
त्यांनी तुला अखेरचं डोळे भरून पाहावं असंही वाटत होतं. 
पण तुही या अस्थींसारखा झाला होतास, न विरघळणारा वज्रच !
नंतर त्यांनी सोफ्यावरच्या अश्रूंचे डाग पाहून त्या संदर्भात विचारणाही केली होती. 

आता मागच्या एक तासापासून मी धडपडतोय, 
शवपेटीच्या ताबूतात तळाशी ही ओलसर हाडे नीटस मांडतोय, 
तुला पूर्णत्व देण्याच्या नादात अब्दतोय.
आता ताबूताच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या खिळ्यांनाच फक्त ठाऊक आहे की हा अस्थीपंजर खूपच किरकोळ आहे. 
___________________________________

प्रसिद्ध इराकी कवी खादीम खंजेर यांच्या ‘जमायती मकबरा’ या कवितेचा हा स्वैर मराठी अनुवाद आहे. कवी ज्या परिसरात जगतो, वाढतो, जन्मतो त्याचे पडसाद त्याच्या रचनेत निश्चित उमटतात. त्याने अनुभवलेल्या जाणीवा, त्याच्या भोवतालची परिस्थिती, त्याच्या वाट्याला आलेलं आकाश या साऱ्यांचं प्रतिबिंब त्याच्या साहित्यात पडतं. कवी खादीम यांनी इराकमधला जीवघेणा हिंसाचार, नरसंहार याची देही याची डोळा अनुभवला असल्याने त्यांच्या कवितेत त्याचं चित्र रेखाटलं जाणं साहजिक आहे. कवीच्या भावाचा मृत्यू नेमका कधी, कुठे, कसा आणि का झाला हे त्याला माहिती नाही पण त्याची अखेर त्याने कशी अनुभवली याचे शब्दचित्र अत्यंत दाहक आणि वेदनादायक आहे. 

अंगावर काटे आणणाऱ्या हिंसाचाराचं वर्णन करण्यासाठी कोणतंही हत्यार वा हिंस्त्र शब्द न वापरता अगदी सहज सोप्या शब्दात कवी आपलं दुःख लाव्हा ओतावा तसं आपल्यापुढे ओतत जातो. संवादी शैलीतली ही कविता मनावर खोल आघात करते. इराकमध्ये काय घडून गेलं असेल याचं चित्र आपल्या डोळ्यापुढे ठळक उभं राहिल्याने वाचक कमालीचा अस्वस्थ होतो. कवीला हेच तर अपेक्षित आहे ! 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

“Breaking news: mass grave discovered nearby . . .”

Yesterday I went down to Forensics. They asked me for a sample for DNA matching. They said that they had found some bones, as yet unidentified. I turn and turn like an orange on the knife of hope.
Now I am at home, brother, wiping the dust from the artificial flowers around your picture, and watering them with tears.
***
The medical report says that the bag of bones that I signed for today is “You”. But this is little. I laid him out on the table in front of them. We counted again: a skull with six holes, one clavicle, three cervical ribs, a shattered femur, a pile of wrist bones, and a few vertebrae.
Is it possible that this little is a brother?
The medical report indicates that it is. I put the bones back in the bag. I brushed the earth from my hands, then blew the rest from the table, put you on my back, and left.
***
On the bus I sat the bag beside me. I paid for two seats (this time it’s me who pays). I grew up today, enough to carry you on my back and pay your bus fare.
***
I didn’t tell anyone that I had received this little. I watch your wife and your children brush by the sofa that I left you on. I wanted one of them to open the bag. I wanted them to see you one last time. But you were as unyielding as a bone. Afterwards they asked about the tearstains on the sofa.
***
For an hour I have been arranging these damp bones in the bottom of the coffin, trying to make you complete. Only the nails in either side know how little this is.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

"عاجل : العثور على مقبرة جماعية بالقرب ..."


البارحة ذهبت إلى الطب العدلي. طلبوا بصمة مطابقة للحمض النووي. قالوا أنهم عثروا على بعض العظام مجهولة الهوية. وفي كل مرةٍ أدور مثل برتقالة على سكينة الأمل.
الآن أنا في المنزل يا أخي، أمسح الغبار عن الزهور الاصطناعية التي تحيط صورتك، وأسقيها بالدموع.0
* * *
يقول التقرير الطبي بأن كيس العظام الذي وقّعتُ على استلامه اليوم هو "أنت". ولكن هذا قليل. نثرتُهُ على الطاولة أمامهم. أعدنا الحساب: جمجمة بستة ثقوب، عظم ترقوة واحد، ثلاث أضلاع زائدة، فخذٌ مهشّمة، كومة أرساغ، وبعض الفقرات.
هل يمكن لهذا القليل أن يكون أخاً؟
يشير التقرير الطبي إلى ذلك. أعدتُ العظام إلى الكيس. نفضتُ كفيَّ من التراب العالق فيهما، ثم نفختُ بالتراب الباقي على الطاولة، وضعتكَ على ظهري، وخرجت.
* * *
في الباص أجلستُ الكيس إلى جانبي. دفعت أُجرة لمقعدين (هذه المرة أنا الذي يدفع). اليوم كبرتُ بما فيه الكفاية كي أحملكَ على ظهري وأدفع عنك الأجرة.
* * *
لم أُخبر أحداً بأني استلمت هذا القليل. أُراقب زوجتك وأطفالك يمروّن بالقرب من الكنبة التي تركتكَ عليها. أردتُ أن يفتح الكيس أحدهم. وددت أن يروكَ للمرة الأخيرة. لكنك كنت عنيدا حدّ العظم. فيما بعد تساءلوا عن بقعة الدمع التي على الكنبة...!
* * *
منذ ساعة وأنا أرتّب هذه العظام الرطبة في بطن التابوت، محاولا اكمالك. وحدها تدري 
المسامير التي على الجانبين بأن هذا قليل.
~~~~~~~~~~~~~~~~~~

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा