अटलबिहारी वाजपेयी यांचे तेरा महिन्यांचे सरकार एक मताने पडले होते. 'ते' एक मत बरेच दिवस रहस्य बनून राहिले होते. वास्तविक, अटल सरकारच्या पराभवाची अनेक कारणे होती. काही लोक काँग्रेसचे तत्कालीन खासदार गिरधर गमांग यांच्याकडे बोट दाखवतात. ते ओडिशाचे मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता. सभापती जीएमसी बालयोगी यांनी त्यांना विवेकाच्या आधारे मतदान करण्याची परवानगी दिली होती. गिरधर गमांग यांनी सदविवेकास साक्षी मानत सरकार विरोधात मतदान केले. सरकार पडले.
त्या मतदानाच्या वेळी बसपा सुप्रिमो कांशीनाथ यांनी अटलजींना वचन दिले होते की, आम्ही तुमच्या समर्थनात मतदान करणार नाही, पण तुमच्या विरोधातही जाणार नाही. मुद्दा बसपाच्या अनुपस्थितीचा हाेता. प्रत्यक्ष मतदानाची वेळ आली तेव्हा मायावती आपल्या खासदारांसमोर जोरात ओरडल्या – लाल बटण दाबा. बसपा खासदारांनी सरकार विरोधात मतदान केले.
शुक्रवार, ७ जून, २०२४
अचर्चित विषयावरची धाडसी कादंबरी - दुभंगलेलं जीवन!
समलैंगिकतेबद्दल भारतीय समाज मनामध्ये अजूनही स्पष्टता नाही. समाज याविषयी तोंडात गुळणी धरून गप्प राहणे पसंत करतो. काहींच्या मते हा चर्चेचा विषय नाही कारण हा मुद्दा आपल्या संस्कृती संस्काराच्या विरोधातला आहे. खेरीज हा वैयक्तिक विषय असून याला सार्वजनिक स्वरूप देऊ नये अशी मल्लिनाथीही केली जाते. तर काहींना असे वाटते की हा
शारीरिक जडणघडणीचा विषय आहे याच्यावर खुली चर्चा योग्य नव्हे. काहींना हे पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण वाटते. याविषयी खोलात जाऊन चर्चा करण्याऐवजी काहीजण कुजबुज स्वरूपामध्ये बोलताना आढळतात! समलैंगिकतेडे संकुचित दृष्टिकोनातून पाहण्याच्या वृत्तीचे प्रतिबिंब भारतीय साहित्य, विविध कलाविष्कार आणि अन्य माध्यमांमध्ये दिसते. अत्यंत तोकड्या प्रमाणात याच्या समर्थनार्थ लिहिले गेलेय. त्यावर वाचकांचा उस्फूर्त प्रतिसाद न येता कथित संस्कृतीरक्षकांच्या गोंधळलेल्या मानसिकतेचे प्रतिसादच अधिक येतात. समलैंगिकतेवरती चित्रे, कथा, कविता, प्रहसने, सिनेमे, जाहिराती, नाटके, डॉक्युमेंट्रीज, पथनाट्य यांचे प्रमाण एकूण निर्मितीच्या प्रमाणात अगदी नगण्य आहे. भारतीय समाजात एकूण किती लोकांचा कल समलैंगिकतेकडे आहे याची नेमकी आकडेवारीही आपल्याला ठाऊक नाही. ती एक नकोशी देहवृत्ती आहे इथून आपली जाणीव सुरू होते, ही अनैतिक आणि अनैसर्गिक भावना आहे असे आपल्या मनात हेतुतः रुजवले गेलेय. अशी भावना मनात येणे हे पाप आहे ही आपली कमालीची 'प्रगल्भता'(?)! प्रत्यक्षात वास्तव उलटे आहे. मानवाखेरीज 1500 हून अधिक प्राण्यांमध्ये समलैंगिकता आढळते त्यामध्ये सिंह वाघ कुत्रा पेंग्विन इत्यादी प्राण्यांचा समावेश आहे. व्यक्तीचा लैंगिक कल पारंपरिक नसू शकतो, एखाद्याला समलैंगिक असावं वाटणं हे नैसर्गिक आहे हे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलेय. आपल्या शिक्षणप्रणालीमधून, अभ्यासक्रमातून लैंगिक शिक्षण वगळलेय कारण ते गुप्तज्ञान आहे अशी आपली जुनाट धारणा!
दुभंगलेलं जीवन - मुखपृष्ठ |
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)