![]() |
महादेव देवानूर |
या घटनेवरून विख्यात कन्नड साहित्यिक महादेव देवनूर या लेखकाची आणि त्यांच्या गाजलेल्या कादंबरीची आठवण झाली.
'कुसुमाबळे' हे त्या कादंबरीचे नाव. 1990 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला होता. या कादंबरीचा शेवट महत्वाचा वाटतो. होलेया (holeya आपल्याकडील चांभार) या दलित जातीतली कुसुमा या कादंबरीची नायिका आहे. तिच्यासह तिच्या समुदायातील व्यक्तींना एका धार्मिक विधीच्या वेळी मंदिरात प्रवेश नाकारला जातो, ज्यामुळे तणाव निर्माण होतो. यातून हिंसक संघर्ष होतो, जिथे दलित समाज आपला राग आणि प्रतिकार व्यक्त करतो. कुसुमा या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावते. ती मंदिरात प्रवेशाचा आग्रह सोडून देते. आपल्या मुलांना आणि समुदायाला एक नवीन दिशा देते — शिक्षण, एकता, आणि आत्मसन्मानाच्या मार्गाने लढण्याची. हा प्रसंग प्रतीकात्मक आहे, जो दलित समाजाच्या सततच्या लढ्याला आणि त्यांच्या भविष्याच्या आकांक्षांना दर्शवतो. रुढ अर्थाने जसा सुखद वा शोकांतिका स्वरूपाचा शेवट असतो तसा शेवट त्यांनी केलेला नाही. ज्याप्रमाणे फॅन्ड्रीमधला जब्या सिनेमाच्या शेवटी दगड मारतो आणि सिनेमा तिथेच संपतो तसे महादेव देवनूर त्यांच्या या कादंबरीला एन्डलेस ठेवतात. कुसुमाने जो मार्ग दाखवलाय त्याने काय होईल हे वाचकांनी निवडायचेय असं देवानूर म्हणतात.
![]() |
कुसुमाबळे |
'कुसुमाबळे'मध्ये कुसुमा आणि तिच्या समुदायाचे चित्रण करताना, देवानूर महादेव यांनी कर्नाटकातील मलनाड भागातील दलित
![]() |
माजी आमदार ज्ञानदेव आहुजा - ज्यांनी जातीभेद जोपासला |
कादंबरीत कुसुमा आणि तिच्या समुदायाला उच्चवर्णीय समाजाकडून होणाऱ्या भेदभावाचा सामना करावा लागतो. मंदिरात प्रवेश
![]() |
टिकाराम जुली - राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्ष नेते |
देवानूर महादेव यांची कविताही अशाच प्रकारचे टोकदार भाष्य करते. त्यांच्या कवितांमध्ये दलित समाजाच्या वेदना, संघर्ष आणि विद्रोह यांचे तीव्र चित्रण आहे. त्यांच्या "ನಾನು ಒಡಲಾಳದವನು" (Naanu Odalaladavanu, अर्थात "मी आतून खचलेला") या कवितेने कन्नड साहित्यात विलक्षण खळबळ माजवली. ही कविता सामाजिक आणि धार्मिक दांभिकतेवर प्रखर हल्ला करते. या कवितेत त्यांनी, जातीभेद आणि धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडलीय. समाजातील दूषित वातावरणावरही भाष्य केलेय.
या कवितेमधील काही पंक्तींचा स्वैर मराठी अनुवाद -
मोडून पडणाऱ्या माणसांपैकी मी नाही
मी शिरच्छेद करेन त्यांचा
जे देवाच्या नावावर पत्थरबाजी करतात.
मंदिराची दारे बंद असतील
तर मोडतोड न करता उघडेन,
मी खुले करेन माझे विशाल अंतःकरण
जे प्रत्येकासाठी खुले असेल!
या कवितेचा कालखंड १९८० च्या सुमाराचा आहे आणि 'कुसुमबळे'चे प्रकाशन वर्ष १९८८ चे आहे. त्यानंतर चार दशके उलटली असली तरी परिस्थिती बरीचशी तशीच आहे हे खेदाने नमूद करावे वाटते. अशा घटना घडल्या आणि त्यावर माध्यमांत पुरजोर विरोध केला गेला तरच त्यावर कारवाई होते अन्यथा अशा अनेक घटना घडत असतील ज्या समोर येतच नाहीत. सामाजिक समतेच्या वाटेवरचे हे अडथळेच होत. याच्या मुळाशी असणाऱ्या जातश्रेष्ठत्वाच्या अभिनिवेशाला खतपाणी घालणं बंद होत नाही तोवर बदल दृष्टीक्षेपातही येणार नाहीत.
महादेव देवानूर यांच्या बाबतीत सांगण्याजोगी आणखीन एक गोष्ट म्हणजे लिंगायत धर्म विचारांचे अभ्यासक आणि व्यासंगी विवेकी व्यक्तिमत्व म्हणून ख्यातनाम असणाऱ्या एम. एम. कलबुर्गी यांच्या नृशंस हत्येनंतर देशभरात अनेक विचारवंतांनी, लेखकांनी, कलावंतांनी त्यांना मिळालेले शासकीय पुरस्कार परत केले होते. कन्नड लेखक उदय प्रकाश यांनी सर्वात आधी ही कृती केली होती. महादेव देवानूर यांनी त्यांना समर्थन देत आपला साहित्य अकादमी पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार परत केले होते. 2022 साली त्यांनी आरएसएसच्या अनेक धोरणांचा, विचारधारेचा समाचार घेणारे पुस्तक लिहिले होते तेव्हा ते उजव्या विचारांच्या लोकांच्या रडारवर आले होते.
महादेव महानूर यांना दृढनिश्चयी आणि सच्चे आंबेडकरवादी म्हणून ओळखले जाते त्यामागची ही पार्श्वभूमी विलक्षण बोलकी आणि दाहक आहे! एक प्रकारचे तेजाबच त्यांच्या धमन्यामधून वाहत असावे!
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा