गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

दुर्गापूजा आणि वेश्या - एक अनोखा संबंध ..

आतल्या खोलीचा मुख्य भाग ज्यात दुर्गा प्रतिष्ठापना केली गेली होती..

दुर्गापूजेचा वेश्यावस्तीशी संबंध आहे हे आपल्याला  ठाऊक नसते ! हे लिहिण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. तुम्ही म्हणाल गणेशोत्सवाचा याच्याशी काय संबंध ?
आहे, संबंध आहे. खास करून पुण्या, मुंबईतील गणेशोत्सवाचा तर नक्कीच आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ज्या परिसरात आहे तिथून वेश्यावस्ती असलेली बुधवार पेठ खूप जवळ आहे ! केवळ एव्हढ्या एका गोष्टीसाठी मी सुतावरून स्वर्ग गाठत नाहीये.....


भूमीचं पूर्ण नाव भूमिका. ती वेश्या होती. तिच्याकडे कधीच न आलेल्या एका गिऱ्हाईकाने 
प्रवेशद्वारावरील कमानीचा हा भाग...
इथं यांच्या खरीदफरोखबद्दलचं शिल्प आहे...
कडेला बातम्यांची कात्रणे डिजिटल स्वरुपात लावली होती...
तिची हत्या केलेली. त्याच्यामागे हात असल्याचा संशय तिच्या दल्ल्यावरच असूनही काहीच सिद्ध होऊ शकलं नाही कारण यांचा आक्रोशच मुळी वांझोटा ! तिशीतच तिची हत्या झालेली. गुन्हेगाराचा अजूनही तपास लागलेला नाही. तिच्यासारख्या बायका सर्व राज्यात आणि सर्व मोठ्या शहरात आहेत आणि त्यांच्या आक्रोशांचे बोळे व्यवस्थेने आपल्या कानात असे काही कोंबले आहेत की त्यातून आपल्याला कुठल्याच किंकाळ्या ऐकू येत नाहीत.

भूमीसारख्याच डझनभर बायका एकट्या सोनागाचीत आहेत, ज्यांची मागच्या तीनेक वर्षात 
चित्रे रंगवताना सोनागाची परिसरातील वेश्या भगिनी..
हत्या झाली आहे. कोलकता - सोनागाची, मुंबई - कामाठीपुरा, दिल्ली - जी.बी.रोड, मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर येथील रेशमपुरा, उत्तरप्रदेशच्या मेरठमधील कबाडी बाजार हे देशातील पाच सर्वात मोठे रेड लाईट एरिया आहेत. याखेरीज पुण्यातील बुधवार पेठ, वाराणसीमधील दालमंडी, युपीच्या सहारनपूरमधील नक्कास बाजार, बिहारच्या मुजफ्फरपूरमधील रेड लाईट एरिया आणि नागपूरमधील गंगा जमुना हे भाग देखील याचसाठी कुख्यात आहेत. तर ताकाला जाऊन भांडं न लपवता मूळ मुद्द्याकडे येतो. आपल्याकडे ज्या जोशात आणि जल्लोषात गणेशोत्सव होतो तितक्याच जोशात, जल्लोषात बंगालमध्ये दुर्गापूजा उत्सव (आपल्याकडील नवरात्र) होतो. इथली मंडळे दुर्गेची भव्य व देखणी मूर्ती बसवतात, त्यासाठी विशाल आकारांचे पंडाल उभे केले जातात. विविध मंडळे विविध विषयांवर थीम ठेवतात आणि त्याला अनुसरून सजावट केली जाते.

गतवर्षी २०१८ साली अहिरीटोला युवक वृंद दुर्गापूजा मंडळाने एक क्रांतिकारी देखावा सादर 
पंडालच्या आत शिरल्यानंतर काही अंतर चालून
 गेल्यानंतर समोर दिसणारा वेश्यावस्तीचा भव्य (?) सेट !
केला. थीम होती सोनागाचीतल्या वेश्यावस्तीची. कुठून येतात या बायका ? त्यांच्या खोल्या आणि पक्षांचे पिंजरे यात काही फरक आहे का ? कोण कोण असतं त्यांच्या विश्वात ? त्या आपल्या पांढरपेशी दुनियेचा घटक नाहीत का ? या बायकांकडे जाणारी माणसं कोण असतात ? या बायकांना वाटत नसेल का की या समाजाने कधी तरी किमान एकदा तरी त्यांना प्रेमाच्या स्नेहाच्या नजरेने पाहावं ? किमान एकदा तरी आपण त्यांच्या दुनियेत डोकावू नये का ? किमान एकदा तरी त्यांची दुःखे जाणून घेऊ नयेत का ? त्यांना एकदा मान दिला तर प्रलय होणार आहे का ? यांच्या जगण्याचा नेमका अर्थ काय ? यांच्या जगण्याचा आपल्याशी संबंध आहे का ? एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या मंडळाने केला. काहींनी नाके मुरडली पण बहुसंख्य बंगबंधूंनी कौतुकाचा वर्षाव केला. काहींनी जहरी टीका केली की मंडळाच्या लोकांनी देवीला वेश्यावस्तीत नेऊन बसवलं, पण यावरचं उत्तर भारीच होतं.

कोलकत्यात दुर्गापूजा उत्सवास सुरु होण्याच्या तिथी आहेत. त्या त्या दिवशी ते ते विधी 
गतवर्षात ज्यांनी आवाज उठवला पण
त्यांचा आवाज दाबला गेला अशा काही भगिनींची ही छायाचित्रे...
पार पाडले जातात, कुंभारवाड्यात (बंगाली भाषेत कुंमारतुली) दुर्गामूर्ती बनवण्यास प्रारंभ करण्याचा दिवस दरसाली जाहीर होतो, त्याच दिवशी मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होतो. मूर्तीसाठी दहा ठिकाणाहुन माती आणली जाते, तिचे पुण्यमाटी आणि निषिद्ध माटी असे दोन भाग पडतात. पुण्यमाटी मध्ये शेण असलेली माती, गोमूत्र असलेली माती, गंगेच्या काठची माती, कुंभाराच्या अंगणातली माती, देवालयातली माती, पर्वतातली माती इत्यादींचा समावेश होतो तर निषिद्ध मातीमध्ये वेश्यांच्या अंगणातल्या मातीचा समावेश होतो. या मातीला निषिद्ध म्हटलं गेलं असलं तरीही जोवर ही माती आणली जात नाही तोवर मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होत नाही. शस्त्रसज्ज दहा भुजा असलेली दुर्गेची मूर्ती वेश्येच्या अंगणातल्या मातीशिवाय बनत नाही हे सत्य आहे आणि तो तिथला रिवाज झाला आहे. या मागची धारणा काय असावी याचं विश्लेषण करताना जाणकारांत मतभेद आहेत. पैकीचे दोनच महत्वाचे मुद्दे मी येथे मांडतोय.

वेश्यांकडे पुरुष जातात तेंव्हा त्यांच्या मनात नेमकं काय वादळ उठत असावं यावर आधारित 
पंडालबाहेरील मुख्य मार्ग  
पहिला विचार आहे. यानुसार जेंव्हा एखादा पुरुष वेश्येकडे जातो तेंव्हा त्याच्या मनातले सर्व विचार, वलय त्याने बाहेर टाकलेले असतात, वासना आणि देहविचार यांच्या बळावर तो तिच्या घरात शिरतो. म्हणजेच तो जेंव्हा तिच्या घरात शिरतो तेंव्हा त्याच्या मनात शून्य विचार असतात. त्यामुळेच त्याची पावलं पडलेली माती घेतली जाते ज्यात पुरुषाच्या मनात अन्य भावना नसतात. हे मत मला मान्य नाही, पण या मताला दुजोरा देणारे अनेक बंगाली पंडीत आहेत.

दुसरं एक मत आहे त्यानुसार दुर्गा आणि महिषासुर

यांचं जेंव्हा युद्ध झालं होतं तेंव्हा त्यानं तिचं चारित्र्यभंग करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात तो यशस्वी ठरला नाही आणि शिवाय तो तिच्याकडून हरला देखील. दुर्गेच्या सर्व रूपांची पूजा होते पण तिच्या मलिन होऊ घातलेल्या रूपाची पूजा होत नाही, भलेही हे स्वरूप निषिद्ध असले तरी त्यातही एक देवांश आहेच हे कसे नाकारता येईल ? मग आज ज्या स्त्रियांच्या वाट्यास हे भोग आलेले आहेत त्यांच्या अंगणातली माती आणल्याशिवाय संपूर्णत्व कसे येईल ?

या शिवाय एक मतप्रवाह ऐतिहासिक दाखले देणारा
मुख्य सेटची मांडणी सुरू असताना 
आहे जो आपल्याकडील कट्टरतावादी आणि सनातनी लोकांना कधीही मान्य होऊ शकणार नाही कारण त्याचा थेट संबंध बंगालचा अखेरचा नवाब सिराज उद्दौला याच्याशी आहे. 

तर अहिरीटोला युवक वृंद दुर्गापूजा मंडळाने एक पाऊल पुढे टाकत थेट वेश्यालयाचा पंडाल उभा केला, भवताली वेश्यावस्तीत असतात तशी दुकाने थाटली, त्यात पुतळे बसवले, वेश्यांची घरे निर्मिली आणि सर्वावर मात करत एका फळकुटवजा खोलीत दुर्गामातेची स्थापना केली ! सोबत गणेश आणि अन्य देवतांनाही स्थान दिलं गेलं. या स्त्रियांच्या जगण्यातही संघर्ष आहे, सच्चेपणा आहे आणि मुख्य म्हणजे इमान आहे. जर यांच्या इथली माती चालत असेल तर या का नकोत असा सवाल करत त्यांनी हा पंडाल उभा केला होता. 


अख्ख्या बंगालमधून हा देखावा पाहण्यासाठी माणसं 
दुर्गामातेची मूर्ती घडवताना
आली. कसला गोंगाट नाही की कोलाहल नाही, एक प्रश्नचिन्ह मात्र जरूर होतं. विशेष बाब म्हणजे या देखाव्याबाहेर मुख्य रस्त्यावर जी चित्रे काढण्यात आली होती त्यात वेश्यांचा सहभाग होता. देखाव्यातील एका दृश्यात विविध वेश्यांनी आपल्या हाताचे ठसे उमटवले होते. खून झालेल्या, अपहरण झालेल्या आणि गायब झालेल्या वेश्यांची छायाचित्रे एका दर्शनी भागात ठेवण्यात आली होती त्यातला एक मुखडा माझी बहीण भूमी दास हिचा आहे !

आपल्या कुठल्या मंडळात ही हिंमत आहे का असा माझा सवाल आहे ! कामाठीपुरा (मुंबई), बुधवार पेठ (पुणे), गंगा जमुना (नागपूर), उत्तम नगर (मिरज) या भागात असं काम कुणी करेल का ? नाही केलंत तरी हरकत नाही कारण त्या दुर्गा आहेतच, सत्य त्यांच्या पोटी जन्मले की नाही हे आपल्या मान्यतेवर अवलंबून आहे. कणाकणात देव आहे तर मग यांच्यातही देव आहे !

- समीर गायकवाड

दुर्गा माता 

1 टिप्पणी: