'मदिरालय जाने को घर से चलता है पीनेवाला,
‘किस पथ से जाऊँ?’ असमंजस में है वह भोलाभाला,
अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ -
‘राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला ।
हरिवंशराय बच्चन यांनी अनुवादित केलेली उमर खय्यामची ही एक प्रसिद्ध रुबाई आहे. उमर खय्याम फावल्या वेळात रुबाया (रुबाइयाँ) लिहीत असे. ह्या रुबायांमुळेच त्याची कीर्ती अजरामर झाली. त्याच्या रुबायांमुळे अनेक देशांत उमर खय्याम क्लब स्थापन झाले. तेथे त्याच्या रुबायांचे मोठ्या आवडीने अध्ययन अध्यापन केले जाते. जगातील अनेक भाषांत त्यांचे अनुवाद झाले. अर्थात त्यांतील उमर खय्यामच्या रुबाया किती व प्रक्षिप्त रुबाया किती हे सांगणे खरोखरीच कठीण आहे.
त्याच्या रुबायांतील प्रमुख विचार देखणे होते - नियती अत्यंत प्रबळ असून जे आपल्या नशिबी असते ते घडल्यावाचून राहत नाही, माणसाने आहे त्या स्थितीतच सुख व समाधान मानावे, परोपकार करावा, सुखदुःखे जशी येतात ती तशीच निघूनही जातात, ईश्वराच्या दयाळूपणावर श्रद्धा ठेवावी, मद्य जरूर प्यावयास हवे कारण त्यामुळे दुःखाचा विसर पडतो, अर्थात हे मद्य सूफी तत्वज्ञानानुसार आध्यात्मिक संकेत म्हणूनही समजता येईल. रुबाई हा मूळ अरबी भाषेतील स्फुट कवितेचा काव्यप्रकार असून, कवी माधव जूलियन यांना सर्वप्रथम मराठीत आणला. त्यांच्यानंतर गो.गो. अधिकारी, ज.के. उपाध्ये यांनीही उमर खय्यामच्या रुबाया मराठीत आणल्या आहेत. कवी कांत, शांता शेळके, प्रफुल्लदत्त, श्रीकृष्ण पोवळे, वा.न. सरदेसाई, रॉय किणीकर यांनीही रुबाया हा काव्यप्रकार हाताळला आहे.
उमर खय्याम हा एक ख्यातनाम फार्सी कवी व विद्वान. त्याचे संपूर्ण नाव गियासुद्दीन अबुल फतह उमर बिन इब्राहिम अल्-खय्यामी. ‘खय्याम’ या नावानेच तो ओळखला जाई. ‘खेमा’ म्हणजे तंबू. खय्याम म्हणजे तंबू शिवणारा. यावरून त्याचे पूर्वज तंबू तयार करण्याचा व्यवसाय करीत असावेत, असे वाटते. त्याच्या मित्रांनी व शिष्यांनी केलेल्या निर्देशांवरून त्याचा जीवनकाल स्थूल मानाने अनुमानिता करता येतो. त्याचा जन्म इराणच्या खोरासान प्रांतातील नीशापूर या संपन्न व विद्येचे केंद्र असलेल्या नगरात झाला. उच्च प्रतिमा आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती त्यास लाभलेली होती. त्यामुळे तो ज्योतिष, गणित, वैद्यक, विज्ञान, तत्त्वज्ञान ह्या सर्वच विषयांत पारंगत झाला. प्रख्यात विद्वान इमाम मुवफ्फिक हा त्याचा गुरू होता.
सुलतान मलिकशाह याने पंचांगात सुधारणा करण्यासाठी ज्या आठ प्रसिद्ध ज्योतिर्विदांची समिती नेमली होती, तीत खय्यामही होता. यावेळीच खय्यामने ‘जीजे मलिकशाही’ नावाचा ग्रंथ लिहिला. प्रस्तुत ग्रंथात त्याने ज्योतिषविषयक कोष्टके दिली. जुन्या पर्शियन कालगणनापद्धतीत त्याने सुधारणा सुचविली व ती १०७९ मध्ये कार्यवाहीत आली. या सुधारणेमुळे ५,००० वर्षात फक्त एका दिवसाची चूक होईल, असे गणित त्याने केले होते. त्याने अरबी भाषेत लिहिलेला बीजगणितावरील ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. या ग्रंथात त्याने तृतीय घातापर्यंतच्या समीकरणांचे सामान्य व संयुक्त असे वर्गीकरण केलेले आहे. द्विघाती समीकरणाचा निर्वाह काढण्याची रीतही त्याने दिली आहे. तृतीय घाती समीकरणांची घन बीजे असलेल्या तेरा प्रकारांचा त्याने निर्देश केलेला आहे. या समीकरणांची बीजे त्याने दोन शांकवांच्या छेदनाच्या स्वरूपात मिळविली. भूमितीय व अंकगणितीय निर्वाहांमध्ये भेद असल्याचे त्याने दाखविले. उमर खय्यामच्या बीजगणितीय कार्यासंबंधी डी. एस्. कासीर यांनी १९३१ मध्ये लिहिलेला द आलजिब्रा ऑफ उमर खय्याम हा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. याशिवाय यूक्लिड संबंधीही उमर खय्यामने काही लेखन केले आहे.
उमर खय्यामची कारकीर्द सु. १०४८ ते सु. ११२३ अशी राहिली. त्याचा नौ राज नामा हा त्याचा फार्सी ग्रंथ यूनानी वैद्यका संबंधी आहे. त्यात ‘जव’ (फार्सी – खवेद, संस्कृत यव व इंग्रजी – बार्ली) या गुणकारी औषधीचा उल्लेख असून जवाचे पाणी प्याल्याने पोटाचे अनेक विकार बरे होतात, असे म्हटले आहे. प्रस्तुत ग्रंथ अभ्यसनीय असून तो मुज्तबा मिनोवी याने तेहरान येथून १९३३ मध्ये प्रकाशित केला. उमर खय्यामचे लेखन विविधांगी असले तरी तो रसिकप्रिय झाला त्याच्या रुबायांमुळेच ! रुबाई त्याची 'पहचान' बनून गेली इतके ते दोघे एकरूप झाले.
यामुळेच जर रुबाई चा बादशहा कोण असं विचारलं तर नि:संशय उत्तर असेल : उमर खय्याम! मराठी साहित्याला देखील त्याच्या या काव्यप्रकाराची ओढ लागली. त्याच्या एका प्रसिद्ध रुबाईचा हा माधव ज्युलीअनांनी केलेला भावानुवाद !
ह्या इथे तरुतळी, एक वही कवितेची
भाकरी एक अन सुरई एक सुरेची
आणखी एक तू गात जवळ घ्या बिजली
ते रान न मग ते नंदनवन ते हेची !
उमर खय्यामच्या वरील मूळ फारसी रुबाईचा फिट्ज़जिराल्ड कृत इंग्रजी अनुवाद असा आहे....
Here with a Loaf of Bread beneath the Bough,
A Flask of Wine, a Book of Verse--and Thou
Beside me singing in the Wilderness--
And Wilderness is Paradise enow.
माधव जूलियन यांचे रुबायांचे काव्यसंग्रह मराठीत प्रसिद्ध आहेत. उमर खय्यामकृत रुबाया (१९२९). मूळ फार्सी भाषेतील रुबायांचा हा मराठी अनुवाद आहे. तर द्राक्षकन्या हा १९३१ मधील असून त्यात फिट्सझेरल्डने उमर खय्यामच्या रुबायांच्या इंग्रजी भाषांतरावरून केलेला मराठी अनुवाद सामील आहे. १९४१ च्या मधुलहरीमध्ये उमर खय्यामच्या ’फिट्सझेरल्ड’ने निवडलेल्या रुबायांचा, पण मूळ फारसीवरून माधव जूलियन यांनी मराठीत केलेला अनुवाद आहे.
हरिवंशराय बच्चन यांच्या 'मधुशाला'वर देखील उमर खय्यामच्या रुबायांचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. हरिवंशराय बच्चन यांचा "खैयाम की मधुशाला" हा भावानुवाद १९३३ साली प्रकाशित झाला. त्यांचा स्वत:चा "मधुशाला" का काव्यसंग्रह १९३४ साली प्रकाशित झाला. त्यात १३५ रुबाया आहेत. (त्यापैकी काही रचना तन्त्रशुद्ध रुबाया मानल्या जात नाहीत.) "मधुशाला"चे प्रथम जाहीर कार्यक्रमात वाचन त्यांनी वाराणसीमध्ये १९३४ साली केलं. १९८४ मध्ये "मधुशाला"ची ५० वर्षे पुरी झाली तेंव्हा त्यांनी स्वर्णजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक रुबाई आपल्या रचनेबद्दलच लिहिली होती...
घिस-घिस जाता कालचक्र में हर मिट्टी के तनवाला
पर अपवाद बनी बैठी है मेरी यह साक़ी बाला
जितनी मेरी उम्र वृद्ध मैं, उससे ज़्यादा लगता हूँ
अर्धशती की होकर के भी षोडष वर्षी मधुशाला l
श्री हरिवंशराय बच्चन यांचेच समकालीन कवि श्री रघुवंशलाल गुप्त यांनी सुद्धा १९३८ मध्ये ओमर खय्यामच्या रचनांचे हिन्दी रुबायांमध्ये रूपांतरण केले. त्यातील काही संस्मरणे खालील प्रमाणे आहेत -
' Dreaming when Dawn's Left Hand was in the Sky
I heard a Voice within the Tavern cry,
"Awake, my Little ones, and fill the Cup
Before Life's Liquor in its Cup be dry."
पौ फटते ही मधुशाला में , गूँजा शब्द निराला एक,
मधुबाला से हँस हँस कर यों कहता था मतवाला एक-
“स्वाँग बहुत है रात रही पर थोड़ी; ढालो,ढालो शीघ्र..
फिटझेराल्डने केलेल्या खय्यामच्या रुबायांचा अनुवाद रुबाइयत
जीवन ढल जाने के पहिले ढालो मधु का प्याला एक.”
Come, fill the Cup, and in the Fire of Spring
The Winter Garment of Repentance fling:
The Bird of Time has but a little way
To fly--and Lo! the Bird is on the Wing.
ला, ला, साकी! और,और ला;फिर प्याले पर प्याला ढाल;
धर रख ,गूढ़-ज्ञान गाथा को ,व्रत विवेक चूल्हे में डाल.
सिखला रहा ‘त्याग’ की पट्टी,कैसा ज्ञानी है तू मित्र!-
नहीं सूझता क्या तुझको यह यौवन,यह मधु,यह मधुकाल
And look--a thousand Blossoms with the Day
Woke--and a thousand scatter'd into Clay:
And this first Summer Month that brings the Rose
Shall take Jamshyd and Kaikobad away.
नित्य रहेगा नहीं यहाँ, प्रिय, जीवन का यह डेरा कुछ;
प्राण-बटोही उठ जायेंगे करके रैन बसेरा कुछ.
यहाँ पड़े सोते हो जब तक करते हो “तेरा”-”मेरा”,
जीवन-स्वप्न टूट जाने पर, मेरा रहे ना तेरा कुछ. (९)
Here with a Loaf of Bread beneath the Bough,
A Flask of Wine, a Book of Verse--and Thou
Beside me singing in the Wilderness--
And Wilderness is Paradise enow.
दो मधूकरी हों खाने को , मदिरा हो मनमानी जो,
पास धरी हो मर्म-काव्य की पुस्तक फटी पुरानी जो,
बैठ समीप तान छेड़े, प्रिय, तेरी वीणा-वाणी जो,
तो इस विजन-विपिन पर वारूँ,मिले स्वर्ग सुखदानी जो.
"How sweet is mortal Sovranty!"--think some:
Others--"How blest the Paradise to come!"
Ah, take the Cash in hand and waive the Rest;
Oh, the brave Music of a distant Drum!
कोई स्वर्ग-लोक के सुख को कहता है अतोल, अनमोल;
कोई राजपाट के ऊपर करता है मन डाँवाडोल ;
गाँठ बाद ले मूर्ख नक़द के नौ, तेरह उधार के छोड़-
यों तो लगते हैं सुहावने सबको सदा दूर के ढोल. (१२)
And those who husbanded the Golden Grain,
And those who flung it to the Winds like Rain,
Alike to no such aureate Earth are turn'd
As, buried once, Men want dug up again.
वह कंगाल जिसे जीवन में जुटे न दाने भी दो सेर-
राजा जो न खर्च कर पाया ,भरे खजानों के भी ढेर,
दोनों ‘माटी’ मिले , किसी का बना न कोई सोना,जो कि
एक बार के गड़े हुए को कोई खोद निकाले फेर. (१५)
Then to this earthen Bowl did I adjourn
My Lip the secret Well of Life to learn:
And Lip to Lip it murmur'd--"While you live,
Drink!--for once dead you never shall return.
कब तक, कब तक,मित्र ! फिरोगे जिस-तिस की चिंता में व्यस्त?
कब तक, कब तक और रहोगे, दीन और दुनिया में ग्रस्त?
आओ,लो,प्याला भर दो फिर, दो दिन खुल खेलो खैयाम,
सुख-दुख का शशि तो यों ही नित होता अस्त ,उदय ,फिर अस्त. (३४)
Ah, fill the Cup:--what boots it to repeat
How Time is slipping underneath our Feet:
Unborn TO-MORROW and dead YESTERDAY,
Why fret about them if TO-DAY be sweet!
लो प्याला भर भर दो फिर फिर ,फिर फिर कहने का क्या फल?
हाथों से निकला जाता है लाख लाख का इक इक पल.
बीत चुका जो ‘कल’ होना था ,क्या जाने होगा क्या ‘कल’
आज चैन से कटती है तो ‘कल’ के हित क्यों हो बेकल (३७)
राष्ट्रकवि मैथिलीशरण गुप्त यांनी सुद्धा uमर खय्यामच्या रुबायांचा हिन्दी रुबायांमध्ये अनुवाद केला आहे. वानगीदाखल काही रुबाया.....
Come, fill the Cup, and in the Fire of Spring
The Winter Garment of Repentance fling:
The Bird of Time has but a little way
To fly--and Lo! the Bird is on the Wing.
आओ, मधुर बसंत विभा में मधु ढालो,भर दो प्याला,
अनुतापों के शिशिर-वसन से बढ़े होलिका की ज्वाला.
समय विहंगम को थोड़ा ही मार्ग पार करना है अब,
फैला दिये पंख लो, उसने,है वह उड़ने ही वाला.[७]
The Worldly Hope men set their Hearts upon
Turns Ashes--or it prospers; and anon,
Like Snow upon the Desert's dusty Face
Lighting a little Hour or two--is gone.
सांसारिक लिप्साऎं, जिन पर आशा करते हैं हम लोग,
मिट्टी में मिल जाती हैं सब पाकर सौ विघ्नों के रोग.
कहीं फूलती फलती भी हैं तो बस घड़ी दो घड़ी ही,
ज्यों मरु के धूसर मुख पर हो हिमकण की आभा का योग. [१४]
Think, in this batter'd Caravanserai
Whose Doorways are alternate Night and Day,
How Sultan after Sultan with his Pomp
Abode his Hour or two, and went his way.
यह प्राचीन पथिकशाला है,अहो-रात्र जिसके दो द्वार,
खुलते और बन्द होते हैं बारी बारी बारंबार.
कितनी तड़क भड़क से इसमें आये हैं कितने सम्राट
एक द्वार से घुसे, घड़ी भर ठहरे,हुए अन्य से पार. [१६]
Up from Earth's Centre through the seventh Gate
I rose, and on the Throne of Saturn sate,
And many Knots unravel'd by the Road;
But not the Knot of Human Death and Fate.
भूमंडल के मध्य भाग से उठकर मैं ऊपर आया,
सातों द्वार पार कर ऊंचा ,शनि का सिंहासन पाया.
कितनी ही उलझने मार्ग में सुलझा डाली मैने , किंतु
मनुज मृत्यु की और नियति की खुली न ग्रंथिमयी माया. [३१]
How long, how long, in infinite Pursuit
Of This and That endeavour and dispute?
Better be merry with the fruitful Grape
Than sadden after none, or bitter, Fruit.
कब तक, किया करोगे कब तक इससे उससे वाद विवाद?
कब तक,बना रहेगा कब तक, यह चिर यत्नों का उन्माद ?
मरते हो किस फल के पीछे , वह कटु है या मिथ्या है,
अच्छा तो है यही ,छोड़ सब लो उस अंगूरी का स्वाद. [३९]
And that inverted Bowl we call The Sky,
Whereunder crawling coop't we live and die,
Lift not thy hands to IT for help--for It
Rolls impotently on as Thou or I.
यह उलटा प्याला है , जिसको आसमान कहते हैं हम,
जिसके नीचे मरते-जीते कसे गँसे रहते हैं हम.
है बेकार हाथ फैलाना ,किसी लिये इसके आगे,
पड़ा उसी चक्कर में यह भी ,विवश जिसे सहते हैं हम. [५२]
Ah, with the Grape my fading Life provide,
And wash my Body whence the life has died,
And in a Windingsheet of Vineleaf wrapt,
So bury me by some sweet Gardenside.
हाँ मेरे बुझते जीवन को द्राक्षा-रस से दीप्त करो,
और उसी से मृत शरीर को धोकर उस की धूलि हरो
द्राक्षा-दल का कफन बनाकर उसमें मुझे लपेटो फिर ,
और किसी उद्यान-पार्श्व में गर्त बनाकर गाड़ धरो. [६७]
-------- (कंसातील क्रमांक अनुक्रमांचे आहेत)
रुबाई या मूळच्या पर्शियन शब्दाचा अर्थच "चार ओळी" असा आहे.
गझलचा शेर ही दोन ओळींची कविता असते अन रुबाई ही तर चार ओळींची कविताच झाली !
चार ओळींची कविता म्हणजे आपली मराठीत प्रसिद्ध अशी "चारोळी" शैली...!!
मात्र रुबाईच्या बाबतीत फक्त तीन छोट्याश्या अटी आहेत...
१) पहिल्या तीन ओळींमध्ये एक रूपक वापरून चौथ्या ओळीत त्याआधारे आपलं नेमकं म्हणणं मांडायचं...!
२) पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या ओळींच्या शेवटी यमक जुळायला हवं...!
३) पर्शियन-उर्दू रुबाईच्या शैलीत "बहर" (वृत्त) सांभाळलेला दिसतो..... म्हणजे गेयता आलीच...!!
बस्स !!
अर्थात या शैलीमध्ये लिहिणाऱ्या प्रसिद्ध कवींनी आपल्या रुबाया केवळ प्रेमकविता बनू न देता शक्यतो त्यातून काहीतरी वैचारिक मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. अर्थातच रुबाई ही थोडी गंभीर विचारप्रधान काव्यशैली आहे, हे तर नक्कीच. उमर खय्याम हे नाव तर रुबायांमुळेच प्रसिद्ध आहे. वरकरणी प्रवासातल्या घटनेचं चित्रण किंवा मद्यालयातल्या प्रसंगांचं चित्रण वाटणाऱ्या त्याच्या रुबाया कधी नीतिशास्त्र सांगतात, कधी मानवी स्वभावावर प्रश्न उभे करतात तर कधी अध्यात्माकडे सुद्धा झुकताना दिसतात. प्रसिद्ध उर्दू शायर हमीद हुसेन कादरी याने तर आपल्या रुबायांमध्ये इस्लामचा आध्यात्मिक विचारच मांडला आहे.
इथे काव्यशैलीच्या दृष्टिने कविवर्य हरिवंशराय बच्चन यांच्या "मधुशाला"च्या ४-४ ओळींना रुबाया मानण्याची गल्लत केली जाऊ शकते. मधुशालामध्ये प्रत्येक कडवं चार ओळींची स्वतन्त्र कविताच आहे.... पण यमकाच्या वेगळेपणामुळे त्या रुबाया नाहीत. "मधुशाला"च्या काव्यशैलीला मूळ पर्शियन नाव "क़िता" असं आहे.... ज्यात एकाआड एक ओळींमध्ये यमक जुळलेलं असतं. मूळ पर्शियन "तराना" किंवा "दो-बाइती" ही शैली सुद्धा चार ओळींच्या कवितेचीच आहे. परन्तु त्यात चारी ओळींचं एकच यमक असतं. आणि बहर किंवा वृत्ताचं बंधन नसतं. नुसता यमक जुळवण्याच्या पद्धतिमध्ये बदल होताच "रुबाई" आणि "क़िता" किंवा "तराना" यांच्यात अदलाबदल होते.... हे तर रुबाई लिहिताना लक्षात ठेवायलाच हवं...!!
रुबाई बद्दल लिहितांना फिराक गोरखपूरी बद्दल न लिहिणं म्हणजे उर्दू शायरी बद्दल लिहितांना गालिब बद्दल न लिहिणं होय. त्यांचे तीन संग्रह प्रसिद्ध आहेत: रूह-ओ-कयामत, गुल-र-राना, नग्मा-नुमा. त्यांच्या दोन रुबाया: वानगी दाखल -
न जाने अश्क से आंखो मे क्यो है आयें हुए
गुजर गया जमाना तुझे भुलाए हुए
जो मंझिले है तो बस रह्ररवांए इश्क का है
वो सॉंस उखडी हुई पॉंव डगमगाए हुए !
===================
जब नजर आप की हो गई है
ज़िन्दगी जिंदगी हो गई है
बारहा-बर-खिलाफ ए हर उम्मीद
दोस्ती दुष्मनी हो गई है
(बारहा= प्रत्येक वेळी , बर-खिलाफ ए हर उम्मीद = Contrary to expectations)
गझल गायक पंकज उधास यांनी 'रुबाई'या अल्बममधील सर्व गझलगीते गायली आहेत. यात उमर खय्यामच्या रूबायात काही आधुनिक गझलकरांनी भर घालून त्यांना दीर्घ रूप दिले आहे. त्यातीलच ही एक रुबाई -
खोते न हों जो होश उन्हें घर बुला के पी
या फिर बुतों को सामने, अपने बिठा के पी
बेहद ना पी, ना बोल बहुत, जोश में न आ
रुक रुक के पी, सुकून से पी, सर झुका के पी
दौलत है फ़क़त चार दिनों की पी ले
इज़्ज़त है फ़क़त चार दिनों की पी ले
है वक़्त शब\-ओ\-रोज़ तबाही की तरफ़
मोहलत है फ़क़त चार दिनों की पी ले
चलो पी लें के यार आये न आये
ये मौसम बार बार, आये न आये
गुलाबों की तरह तुम ताज़ा रहना
ज़माने में बहार आये न आये
ये सोचा है कि उसको भूल जायें
अब इस दिल को क़रार आये न आये
"ज़मीर" इस ज़िन्दगी से क्यूं ख़फ़ा हो
इसे फिर तुमपे प्यार आये न आये l
उमर खय्यामच्या रुबाया सौंदर्यासक्तीचा संदेश देत असल्या तरी 'कोण मी कुठून आलो ….'असं म्हणणाऱ्या खय्यामची आंतरिक तळमळ नश्वरतेचा शोध घेते. बाह्य सौंदर्याच्या मागे लागणाऱ्या लोकांनी एकदा तरी उमर खय्यामच्या रुबायांचा हा 'मधुर' पाठ जीवनातला खरा अर्थ शोधण्यासाठी वाचायला हवा.
- समीर गायकवाड
(साभार नोंद - उमर खय्याम यांच्या विषयीची माहिती मराठी विश्वकोशातील अल्प परिचयातून घेतली आहे.)
sundar lekh
उत्तर द्याहटवामराठीत समग्र छंदांत रुबाई सर्वप्रथम वा न सरदेसाई ह्यांनीच लिहिली . . .डॉ. श्री राम पंडित
उत्तर द्याहटवाhttps://youtu.be/DDdSfYGvVPo