सादी शिराज यांची बुस्तान (फळबाग) ही कविता विश्वविख्यात आहे. त्यातील काही पंक्तींचा हा हिंदी अनुवाद. मराठीत अनुवाद करताना यातली मजा जातेय म्हणून हिंदी अनुवाद.
"आदम के बेटे एक जिस्म के अंग हैं,
जो एक ही मिट्टी से बने हैं।
अगर एक अंग को दर्द होता है,
तो बाकी अंग भी बेकरार रहते हैं।
जो इंसान दूसरों के दुख से बेपरवाह रहता है,
वह इंसान कहलाने के लायक नहीं।"....
सादी शिराज यांनी त्यांच्या तरुणपणी व्यापक प्रवास केले, ज्यात मध्य आशिया, भारत, अरबस्तान आणि इजिप्त यांचा समावेश होता. एकदा, ते एका जहाजातून समुद्रमार्गे प्रवास करत होते. जहाजात अनेक प्रवासी आणि व्यापारी होते. मध्यरात्री अचानक भयंकर वादळ आले आणि जहाज डगमगू लागले. प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळ पसरला. काहींनी प्रार्थना सुरू केली, तर काहींनी आपले मौल्यवान सामान वाचवण्याचा प्रयत्न केला. सादी मात्र शांतपणे एका कोपऱ्यात बसले होते, आणि त्यांना निरीक्षण करताना लक्षात आलं की एक श्रीमंत व्यापारी आपल्या सोन्याच्या नाण्यांचा पेटारा घट्ट धरून रडत होता.
वादळ थांबल्यानंतर जहाज वाचले, आणि सर्व प्रवासी सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले. सादी यांनी त्या व्यापाऱ्याला विचारले, "तू एवढे रडत का होतास? तुझ्या संपत्तीची चिंता होती की प्राणांची?" व्यापारी म्हणाला, "माझे सर्व आयुष्य त्या सोन्यासाठी खर्ची पडले आहे. ते गमावले असते, तर माझे सगळे जगणे व्यर्थ ठरले असते."
सादी हसले आणि म्हणाले, "संपत्ती तुझ्या हातात आहे, पण ती तुझ्या हृदयात नाही. खरे धन म्हणजे तुझा अनुभव, तुझे शहाणपण आणि तुझी माणुसकी. वादळात तुझी संपत्ती तुला वाचवू शकली नाही, पण तुझ्या प्रार्थनेने आणि इतरांच्या मदतीने तू वाचलास. यातून काय शिकायचे?"
सादी शिराज यांच्या अनेक लघुकथा पर्शियन साहित्यात बोधकथेसारख्या प्रचलित आहेत. इराणने ट्विट केलली कविताही सादी यांच्या प्रतिभेची साक्ष देते.
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा