रेड लाईट डायरीज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रेड लाईट डायरीज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २ मे, २०२५

मुजफ्फरपूर, चतुर्भुजस्थान आणि सीतामढी - पोक आलेल्या लोकांचा देश!

नर्तकीच्या घरातला फोटो 

लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्यात, फरक पडेल की नाही सांगता येत नाही. इथे आशावादी असणं पुरेसे नाही. या ठिकाणी एकदा गेलेला माणूस पुन्हा जाऊ इच्छितो हे नक्की! ही एका अशा शापित भूमीची दास्तान आहे जी अस्वस्थ करुन सोडते. या भूमीचे नाते देवी सीता सोबत आहे, जिला नगरवधू म्हटलं गेलं त्या आम्रपालीशीही आहे आणि नाचगाणं करून पोट भरणाऱ्या तवायफ, वेश्यांशीही आहे! आज घडीला संपूर्ण देशात चतुर्भुज स्थान हा एकच रेड लाइट एरिया असा आहे की जिथे गाणं बजावणं होतं, रीतसर मैफली बसतात. (अर्थात हे आपल्या हैसियत आणि औकातनुसार अनुभवाला येतं) आपल्याकडे लोकनाट्य कलाकेंद्रांचा जसा पसारा असतो तशा इथे गल्ल्या आहेत. त्यात सिंगल खोल्या आहेत, अपार्टमेंट्स आहेत, काही गलिच्छ घरे आहेत तर काही जुने वाडेही आहेत! काही घरांच्या बाहेर नावाचे बोर्ड आणि टायमिंग लिहिलेलं असतं तर काही फक्त आणि फक्त रात्रीच खुली असतात! तर अपार्टमेंट्समध्ये शक्यतो दिवस डोक्यावर आल्यापासून पहाटेपर्यंत मैफल लावता येते. आपण पैसे किती खर्च करणार यावर नर्तकींची, गायिकांची संख्या ठरते. हार्मोनियम मास्तर आणि ढोलकीपटू सोबत असतातच. तिथेच खान पान आणि पेयपान करायचे असेल तर त्याचीही सोय असते मात्र तिथले मद्य बहुत करून बनावटी असते. जेवणात मात्र अस्सल बिहारी व्यंजन दिले जातात, आपण कसे पेश होतो त्यावर बरेच काही अवलंबून असते. असो. प्रस्तावनाच फार मोठी झालीय. चतुर्भुज स्थान हे एक उपनगर असल्यासारखे आहे, बिहारच्या मुजफ्फरपूर शहरातला हा भाग आहे. मुजफ्फरपूर जिल्ह्याचे हेच मुख्य शहर आहे. गायघाट, औराई, बोचहां, सकरा, कुरहानी आणि मुजफ्फरपुर हे तालुके आताच्या मुजफ्फरपूर लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येतात.

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

वाराणसी गँगरेप आणि 546 मुलींचे शोषण - धक्कादायक आणि भयंकर!

वाराणसी गँग रेपची न्यूज क्लिप इमेज  

वाराणसीमध्ये एकोणीस वर्षे वयाच्या मुलीवर सात दिवसांत 23 जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. या घटनेस अनेक पैलू आहेत. मुलीचीही एक महत्वाची चुक आहे. यातला एक पैलू केवळ उत्तर प्रदेश सरकारचा नसून उत्तरेकडील समग्र राज्यांचा आहे. कथित साधू संन्यासी जोगे फकीर ही मंडळी इकडे सर्रास चिलीम फुकताना दिसून येतात. यांच्या व्यसनांना आळा घालायचा म्हणजे धार्मिक भावना, अस्मिता आदींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे सरकारची पंचाईत आहे.

वाराणसीमध्ये पिशाच्च मोचन नावाचा एक भाग आहे. इथे एक कुंड आहे जिथे काही विधी केले तर पिशाच्च बाधा दूर होते अशी धारणा आहे. इथे काही लोंक पिंपळाच्या झाडाला नाणी चिटकवतात आणि आपल्यात बाधा आहे की नाही हे जाणून घेतात. अर्थातच हा सगळा श्रद्धा अंधश्रद्धा यांचा बाजार. तर रात्री या भागात नशेडीच अधिक आढळतात. मुलीवर पहिला रेप याच भागात झालाय.

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

आओगे जब तुम साजना..


2007 साली 'जब वी मेट' हा सिनेमा आला होता. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या प्रेमाची केमिस्ट्री त्यात जबर जमली होती. सिनेमा हिट झाला होता आणि गाणीही गाजली होती, बाकी गाण्यांच्या तुलनेत 'आओगे जब..' हे गाणं जास्त गाजलं नव्हतं; ते माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक! असो.
 
हे गाणं फर्माईश म्हणून अनेक प्रेमभंग झालेल्या तरुण पोरांनी गायला सांगितलेलं अजूनही पक्कं स्मरणात आहे. त्याहीआधी 1991 मध्ये नाना पाटेकर, डिम्पल, माधुरी यांच्या 'प्रहार'मध्ये शुभा गुर्टू यांनी गायलेली 'याद पिया की आये..' ही ठुमरी खूप जीव लावून ऐकलेली! तिच्याशी जसे एकरूप होता येत होतं तसेच 'आओगे जब तुम साजना'बाबतीत व्हायचे!

बुधवार, २६ मार्च, २०२५

एक दिवस शोषित जिवांच्या आनंदाचा!

'क्रांती महिला संघ' स्नेहमेळावा 

आपल्याकडे वेश्यांकडे अजूनही अत्यंत तिरस्काराने पाहिले जाते. समाज त्यांना आपला घटक मानत नाही हे वास्तव आहे. वेश्या म्हणजे किटाळ, नीच आणि व्यभिचारी स्त्रिया असंच मानलं जातं. मात्र त्याच बरोबरीने त्यांच्याकडे जाणाऱ्या म्हणजेच वेश्यागमन करणाऱ्या पुरुषांना समाज फारशी नावे ठेवताना दिसत नाही. जुगार खेळणाऱ्यास जुगारबाज म्हटले जाते, दारू पिणाऱ्यास दारूबाज म्हटले जाते परंतू वेश्येकडे जाणाऱ्यास रंडीबाज म्हटले जाते ही बाब आपल्याला खटकत नाही कारण अन्य वेळी व्यसनावरून नावे ठेवणारा समाज इथे मात्र त्या पुरुषाला नावं ठेवण्याऐवजी त्या स्त्रीलाच रंडी म्हणतो आणि तिच्याकडे येणाऱ्यास नाव ठेवताना तिलाच शिवी देऊन रंडीबाज म्हणतो! रंडी ही एक शिवी आहे जी समाज व्यभिचारी स्त्रियांना देतो, वास्तवात या बायका कुणाच्या घरी येऊन जोरजबरदस्ती करत नाहीत तरीही यांनाच नावे ठेवली जातात कारण आपल्या समाजात या स्त्रियांना छदामाचीही किंमत नाही. अशा समाजात एखादी तरुणी अक्षरश: क्रांती करावी तसे काम करते नि त्यांच्यात एकी घडवून आणते, त्यांच्या समस्यांसाठी लढते, अल्पवयीन मुलींना यातून बाहेर पडण्यास मदत करते, ज्यांच्या मुली मोठया आहेत त्यांच्या शिक्षणासाठी धडपड करते नि या स्त्रियांच्या बेसिक गरजांसाठी संघटन उभं करते तेव्हा निश्चितच काही चांगल्या गोष्टी घडतात.

गुरुवार, १३ मार्च, २०२५

ज्युलिअस सीझर - वासनांच्या मुळाशी जाणे कठीण नाही!

 

रोमन सम्राट ज्युलियस सीझरच्या काळात बलात्कार आणि सेक्स संबंधी गुन्हे इतके वाढले होते की तो हताश होऊन गेला होता. त्यात जबरी समलिंगी संभोगींचींही बरीच संख्या होती. यावर त्याने एक अभ्यासगट नेमला पण त्याच्या अहवालाची वाट पाहण्याइतका वेळ त्याच्याकडे नव्हता.

त्याने त्याच्या काही शहाण्या लोकांना निरीक्षणे नोंदवायला सांगितली. त्यात एक निरीक्षण होतं सिन्येडसबद्दलचे (cinaedus याचा उच्चार किनायडूस असाही करतात). पिळदार देहयष्टी असलेले पण शारीरिक ढब फेमिनाईन असलेले हे तरुण डफ वादक होते.