शनिवार, ३१ मार्च, २०१८
अण्णांचे फसलेले आंदोलन..
शनिवार, १७ मार्च, २०१८
रेड लाईट डायरीज - बायकांचे एस्कॉर्ट असेही ....

आपल्याकडे बायका पोरींना ‘धंद्याला’ लावणे वा त्यांची खरेदी विक्री करणे किती सहज सोपे आहे याचे हे आदर्श उदाहरण ठरावे. आपले कायदे किती कुचकामी आहेत आणि जी काही कलमं आहेत ती किती तकलादू आहेत हे यातून प्रकर्षाने ध्यानात यावे.
२००३ सालच्या ह्युमन ट्रॅफिकिंगच्या (अवैध मानवी तस्करी) एका खटल्यात पतियाळा येथील एका न्यायालयाने मार्च २०१८ मध्ये पंजाबी गायक दलेर मेहंदीला दोषी ठरवले. पोलिसांच्या कर्तव्य तत्पर शिताफीने आणि न्यायालयातील वकिलांच्या न्यायिक दलालीने आय मीन दलीलांनी हा खटला १५ वर्षे रखडवला गेला आणि शिक्षा झाली फक्त दोन वर्षे !
पत्रकारिता आणि राजकारण
![]() |
काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाने राज्यसभेच्या उमेदवारीसाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे नाव घोषित केले आणि अनेकांनी भुवया उंचावल्या. कुमार केतकर हे मराठीतील प्रतिथयश पत्रकार, विचारवंत आणि लेखक म्हणून विख्यात आहेत. दैनिक 'लोकसत्ता'चे ते निवृत्त प्रमुख संपादक होत. तसेच 'महाराष्ट्र टाईम्स' आणि 'लोकमत' या वृत्तपत्रांचे माजी मुख्य संपादक होते. 'डेली ऑब्झर्व्हर'चे निवासी संपादक तसेच 'इकॉनॉमिक टाइम्स'चे विशेष प्रतिनिधी म्हणूनहूी कुमार केतकरांनी काम केलेले आहे. संपादकपदाच्या कारकिर्दीत ते अखेरीस 'दैनिक दिव्य मराठी' वृत्तपत्राचे मुख्य संपादक होते. राज्यसभेच्या उमेदवारीचा हा निर्णय अनपेक्षित नव्हता तसेच ही वाटचालही इतक्या सहजासहजीची नव्हती. काँग्रेसमधील अन्य इच्छुकांनी यावर दबक्या आवाजात चर्चा आरंभण्याचा प्रयत्न केला तर काहींनी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त केली. नेहमीप्रमाणे काँग्रेसने याची काडीमात्र दखल घेतली नाही. कुमार केतकर यांच्या नावाला राहुल गांधींनीच पुढे आणल्याने यावर व्यक्त होणे काहींनी शिताफीने टाळले. काही ज्येष्ठ निष्ठावंत काँग्रेसजनांनी मात्र या निर्णयाचे स्वागत करत केतकर यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा, भाषाप्रभुत्वाचा, पत्रकारितेतील वर्तुळातील अनुभवाचा आणि चौफेर व्यासंगाचा चांगला उपयोग होईल अशी प्रतिक्रिया दिलीय. अन्य राजकीय पक्षांनी यावर सावध प्रतिक्रिया दिल्या तर पत्रकार जगतातून अनेकांनी या निर्णयासाठी काँग्रेस आणि केतकर यांचे अभिनंदन केले. इथेही काहींनी नाराजीचा सूर आळवण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारसे यश लाभले नाही. या निर्णयाची सोशल मिडीयाच्या सर्व अंगांवर रंगतदार चर्चा पाहावयास मिळाली. काहींनी टवाळकी केली, काहींनी पाठराखण केली तर काही नेहमीप्रमाणे तटस्थ राहिले. तरीदेखील एक मोठा वर्ग असा आढळून आला की जो या घटनेच्या आडून पत्रकार आणि त्यांचे राजकारण व पत्रकारांच्या राजकीय भूमिका यावर टिप्पण्या करत होता. ही संधी साधत अनेकांनी सकल पत्रकारांना दुषणे दिली. काहींनी प्रिंट मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया याची गल्लत करत पत्रकारांवर हात धुवून घेतले. पत्रकारांनी राजकारणात जाऊ नये असा धोशा या लोकांनी लावून धरलेला होता. वास्तविक पाहता ही काही पहिली घटना नव्हती की लोकांनी इतकी आदळआपट करावी. अशा घटना या आधी राज्यात,देशात आणि जगभरात अनेक ठिकाणी घडल्या आहेत.
बुधवार, १४ मार्च, २०१८
रेड लाईट डायरीज - झुबेदा
रेडलाइटमधली अर्धीकच्ची झुबेदा
एक हात चौकटीला लावून दाराच्या फळकुटाला टेकून
उभी असते तेव्हा
तिचे टवके उडालेले नेलपेंट आणि
पोपडे उडालेल्या भिंतीचा
लाल-निळ्या रंगाचा शिसारी काँट्रास्ट होतो.
कपचे उडालेली चौकट,
मोडकळीला आलेली कवाडे अन्
त्यावरचे खिळे उचकटलेले भेसूर कडी कोयंडे
मान मोडल्यागत शेजारीच लोंबकळत असतात.
तिच्या थिजलेल्या डोळ्यात
अधाशी पुरुषी चेहऱ्यांची अनेक प्रतिबिंबे दिसतात,
सत्तरीपासून सतरा वर्षापर्यंतची सर्व गिधाडे
घिरट्या घालून जातात
काहीतर चोची मारून घायाळही करून जातात.
मंगळवार, ६ मार्च, २०१८
स्तनत्यागिनी...
![]() |
ज्येष्ठ प्रौढा, नाव - ज्युलिएट फिट्ज पॅट्रिक. वयाच्या चोपन्नाव्या वर्षी जानेवारी २०१६ मध्ये त्यांच्या स्तनांच्या कर्करोगाचे निदान झाले. शेवटच्या टप्प्यातला कॅन्सर असल्याने स्तन काढून टाकण्याचा मास्टेक्टॉमी करण्याचा सल्ला त्यांच्या डॉक्टरांनी दिला. ते ऐकताच स्तन काढून टाकल्यानंतर आपण कसे दिसू आणि त्यावर काय उपाय केला पाहिजे याच बाबी त्यांच्या डोळ्यापुढे तरळल्या. आपले स्तन आपण रिकंस्ट्रक्ट करायचे का हा प्रश्नही त्यांच्या मनात उभा ठाकला. त्यांना तसा सल्लाही दिला गेला. कदाचित नेहमी ऍडमिट होणाऱ्या रूग्णांची तशी डिमांडही तिथल्या स्टाफने अनुभवली असावी. त्यामुळेच ज्युलिएटना देखील तोच सल्ला दिला गेला. शस्त्रक्रियेनंतर आपले स्तन पूर्वीसारखे दिसावेत आणि आपला स्त्रीत्वाचा लुकही तसाच असावा ही भावना त्यामागे असू शकते असं ज्युलिएटना वाटले. कारण स्तन ही स्त्रीत्वाची एक मुख्य खूणही आहे, तसेच तिच्या सौंदर्य लक्षणाचे ते एक अंग आहे अशी धारणा सर्वत्र रुजलेली आहे. या सल्ल्यावर विचार करताना दिवस कसे निघून गेले ते ज्युलीएटना कळले नाही.
ज्युलिएटना फायनली सांगितले गेले की, तीव्रतेच्या प्रमाणामुळे डाव्या बाजूचा स्तन सत्वर काढून टाकावा लागेल. त्यावेळी त्यांना काही फोटोग्राफ्स दाखवले गेले. स्तन काढल्याआधीचे आणि स्तन काढल्यानंतरचे असे ते फोटोज होते. ते पाहून बधीर आणि स्तनाग्र विरहीत सपाट छातीत (नॉन निपल्ड फ्लॅट चेस्टेड) आपण कसे दिसू याचा त्यांना विचार करवेना.
शुक्रवार, २ मार्च, २०१८
अवयव प्रत्यारोपण शास्त्रातील नवे पर्व ..
मानवी शरीराची आणि शरीराच्या गरजांची, रचनेची जसजशी उकल होत चाललीय त्यातून
नवनवी माहिती समोर येते आहे. तिला आधारभूत मानत त्या गरजांची पूर्तता करताना
आधुनिक शरीरविज्ञानशास्त्राने नवनवी शिखरे पादाक्रांत केली आहेत. यातले सर्वात
अलीकडच्या काळातील संशोधन मानवी जीवनाला नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. या
संशोधनाद्वारे मानवी अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेतील असंख्य प्रश्न चुटकीसरशी
सुटणार आहेत. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ऑस्टिन येथे झालेल्या अमेरिकन असोसिएशन फॉर द
ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या वार्षिक परिषदेत अवयव विकसक संशोधनावर काम करणाऱ्या
शास्त्रज्ञांच्या पॅनलने जे रिसर्च डॉक्युमेंट सादर केले आहेत त्यातील माहिती थक्क
करणारी आणि अनेक रुग्णांच्या जीवनदानाच्या आशा पल्लवित करणारी आहे. या पेपर्सनुसार
मानवी अवयव आता मानवी शरीराबाहेर नैसर्गिक पद्धतीने निर्मिले जाऊ शकतील.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)