जगभरात चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरलेल्या हेमिंग्वेला नोबेल व पुलित्झर हे साहित्य क्षेत्रातील दोन्ही प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात अमेरिकन लेखकांच्या ज्या पिढीला "दि लॉस्ट जनरेशन' संबोधण्यात आले, त्या पिढीचे नेतृत्व अर्नेस्ट हेमिंग्वेनं केलं. उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी लेखकाने आपले आयुष्यच पणाला लावले पाहिजे, असं त्याचं मत होतं. म्हणूनच की काय त्याचं जीवन भन्नाट साहसांनी भरलंय !
हेमिंग्वेचे बालपण ओक पार्क येथे व्यतीत झालं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर कॉलेजला न जाता त्याने "कान्सास सिटी स्टार' या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून कारकीर्द सुरू केली. त्याच वेळेस जगात एक मोठी घटना घडत होती, पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं ! युद्धात आपणही सहभागी व्हावे, असे त्याला तीव्रतेने वाटू लागलं. परंतु डाव्या डोळ्याची दृष्टी अधू असल्याने सैन्यात प्रवेश मिळाला नाही. मग रेडक्रॉस सोसायटीच्या ऍम्ब्युलन्सचा ड्रायव्हर होऊन युद्धभूमीवर जाण्याचं त्यानं ठरविलं. त्यासाठी शिकागोला जाऊन आवश्यीक ती शारीरिक परीक्षा दिली व युरोपला जाण्यासाठी जहाजात बसला. बार्डोक्सं येथून पॅरीसची गाडी पकडून फ्रान्सची सरहद्द ओलांडून इटलीमधील युद्धभूमीवर पोचला. प्रथम इटलीतील मिलान या गावी जखमी सैनिकांना रणभूमीवरून हॉस्पिटलमध्ये हलवण्याचे काम पार पाडलं. त्यानंतर आल्प्स पर्वताजवळील शिओ गावी पेआवे नदीच्या काठावर खंदकातील सैनिकांना आवश्यकक वस्तू देत असताना शत्रूनं फेकलेल्या बॉम्बमुळे हेमिंग्वे जबर जखमी झाला. त्याच्या जवळचा एक सैनिक ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. आसपास मृत्यूचे थैमान सुरू असताना हेमिंग्वेने स्वतःची गंभीर दुखापत विसरून जखमी सहकाऱ्याला वाचविलं. हेमिंग्वेला मिलान येथील रेडक्रॉस हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. त्याच्या पायातून धातूचा तुकडा व मशिनगनच्या दोन गोळ्या डॉक्टिरांनी ऑपरेशन करून बाहेर काढल्या. तेथे त्याला अनेक आठवडे उपचार घ्यावा लागला, त्याच्या असाधारण शौर्याकरिता इटली व अमेरिका या दोन देशांकडून शौर्यपदके मिळणार होती. वर्तमानपत्रांनी त्याचे कौतुक तर केलेच; पण शिकागोमध्येही तो "हिरो' झाला होता.
मिलानच्या हॉस्पिटलमध्ये अनेक परिचारिका होत्या. त्या हेमिंग्वेची काळजी घेत होत्या. त्यातलीच एक असलेल्या ऍग्नेस व्हॉन कुरीव्हस्की या अमेरिकन नर्सच्या तो प्रेमात पडला तेंव्हा त्याचं वय होतं १९ वर्षे ! तिचेही हेमिंग्वेवर अतोनात प्रेम होतं. त्यानं लग्नाची मागणी घातल्यावर तिनं लगोलग होकार दिला नाही. त्यानं युद्धाची भयानकता पाहिली होती. मृत्यूसुद्धा जवळून पाहिला होता. त्याला हवी असलेली "ऍक्श न' शिओच्या रणांगणावर अनुभवली होती. ऍग्नेस भेटल्यानंतर जगात आता आपल्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाही, असं त्याला वाटू लागलं. काही दिवसांनंतर ऍग्नेसची नियुक्ती फ्लॉरेन्स येथे झाली. त्यांच्या प्रेमाची देवाणघेवाण पत्रांतून सुरू राहिली. कालांतरानं कुबड्या वापरणं बंद करून तो काठीच्या आधारे चालू लागला. पाय बरा झाल्यानंतर ते दोघं घोड्यांच्या शर्यतीला गेले. दोघांनी काही काळ एकत्र व्यतीत केला. सभोवतालच्या रणधुमाळीतही त्यांचं प्रेम फुलत गेलं. तिला जिथे जिथे पाठविले जाई, तिथे हेमिंग्वे तिला भेटायला जायचा. अखेर युद्ध संपले आणि हेमिंग्वे अमेरिकेत ओक पार्कला स्वगृही परतला. पण त्याचं चित्त मात्र इटलीकडे लागलं होतं. घरात बसून ऍग्नेसची पत्रं वाचणं त्याला नको वाटायचं. अंथरुणावर पडूनच इटली, आल्प्स पर्वत आणि ऍग्नेसच्या आठवणीत रमून जायचा. पायातून काढलेल्या बॉम्बच्या पत्र्याचा तुकडा त्यानं अंगठीमध्ये हिऱ्यासारखा जडवला होता, ती ऍग्नेसची आठवण होती !
१९१९ च्या मार्च महिन्यात ऍग्नेसचे एक पत्र आलं आणि हेमिंग्वेला जबर धक्का बसला ! तो आजारी पडला. त्यानं स्वतःला कोंडून घेतलं. बहिणीशी- मार्सेलिनशी त्याचं विशेष पटायचं. तिनेसुद्धा त्याला बोलते करायचा प्रयत्न केला. वारंवार विचारल्यानंतर हेमिंग्वेने ऍग्नेसच्या पत्राविषयी सांगितले. ती एका इटालियन आर्मी ऑफिसरच्या प्रेमात पडली होती, तिनं त्याच्याशी विवाह केला होता. हेमिंग्वे संतापला होता. नंतरच्या वर्षभरात हेमिंग्वेने युद्धाच्या कथा लिहिल्या. दरम्यान आईसोबत त्याचं पटत नव्हतं. तिनं त्याला घर सोडायला सांगितलं. वाढदिवसादिवशीच त्यानं घर सोडलं आणि मित्राकडे राहायला गेला. तिथेच त्याची ओळख हॅडली रिचर्डसनशी झाली. ती त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती; पण दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि विवाहबद्ध झाले. हेमिंग्वेचं लिखाण, त्याचं मासे पकडणं, भटकणं, हसणं, बोलणं सर्वच हॅडलीला आवडले. हेमिंग्वेला पुन्हा "टोरान्टो स्टार' या वृत्तपत्रात युरोपियन प्रतिनिधी म्हणून नोकरी मिळाली. त्यानं पॅरीसमध्ये राहायचे असे ठरवलं. ते त्याचे अत्यंत आवडते ठिकाण होतं.
लेखक होण्याची हेमिंग्वेची महत्त्वाकांक्षा होती; पण त्याला सुरुवातीच्या काळात फार संघर्ष करावा लागला. त्याची कादंबरी "द सन ऑल्सो रायझेस' आणि अन्य कथा संपादकांकडून नाकारल्या जात होत्या. हेमिंग्वे त्या वेळेस गर्ट्रूड स्टेन, एझरा पौंड, जेम्स जॉईस या दिग्गज लेखकांच्या सहवासात पॅरीसमध्ये राहत होता. एके दिवशी पॅरीसच्या लेफ्ट बॅंक येथील एका रेस्टॉरंटमध्ये हेमिंग्वे मित्रासमवेत स्वतःच्या लेखनाच्या अपयशाची चर्चा करीत होता. त्याचा मित्र सहजपणे त्याला म्हणाला की, 'तू आयुष्यात फार काही दुःख पाहिले नाहीस, सहन केले नाहीस !' क्षणातच हेमिंग्वेचा पारा चढला आणि त्यानं आपली महायुद्धाच्या काळात घडलेली प्रेमकहाणी त्याला ऐकवली. मित्रानं त्याला सल्ला दिला, की हीच प्रेमकथा आता तू लिहून संपादकांकडे व प्रकाशकांकडे पाठव. हेमिंग्वेनं त्याचं ऐकलं. ऍग्नेसबरोबरच्या प्रेमकथेवर आधारित "ए फेअरवेल टू आर्म्स' या कादंबरीनं इतिहास घडविला आणि एका महान कादंबरीकाराचा उदय झाला !
या कादंबरीत हेमिंग्वेने स्वतःच्या ठिकाणी फ्रेडरिक हेन्री या पात्राची निर्मिती केली. जो पहिल्या महायुद्धात इटलीतील युद्धात रेडक्रॉस ऍम्ब्युलन्स ड्रायव्हर असतो. बॉम्बस्फोटात जखमी झाल्यावर मिलानच्या हॉस्पिटलमध्ये कॅथरिन बर्कले या ब्रिटिश नर्सच्या प्रेमात पडतो. युद्ध, प्रेम या दोन्हीही गोष्टी कादंबरीत समांतर घडतात. युद्धापासून दोघेही दूर जाण्याचा प्रयत्न करतात. हेन्री आपला लष्करी गणवेश फेकून तिच्या समवेत मोठ्या प्रयासाने स्वित्झर्लंडला जातो. कॅथरीन गरोदर असते. तेथे ते दोघेही काही दिवस आनंदात राहतात; पण बाळंतपणात तिचा मृत्यू होतो. हेन्रीथ पुन्हा एकाकी पडतो. या निष्पाप प्रेमकथेत युद्ध हाच प्रेमाचा शत्रू आहे. पहिल्या महायुद्धाची भीषणता दाखवणारी ही कादंबरी फार लोकप्रिय झाली. हेमिंग्वेने कॅपोरेटो येथील सैन्यमाघारीचं हुबेहूब वर्णन केलं. अनेक दुःखदायक प्रसंगांचं वर्णन केलं. या कादंबरीवरून १९३२ आणि १९५८ मध्ये असे दोन चित्रपट तयार झाले. "द सन ऑल्सो रायझेस' या कादंबरीतही हेमिंग्वेने युद्धातील अपघाताने झालेले परिणाम दाखविले.
या दोन कादंबऱ्यांपाठोपाठ हेमिंग्वेच्या इतर कादंबऱ्या प्रकाशित झाल्या, खूप गाजल्या. जर्मन, फ्रेंच व इतर भाषांमध्ये त्या अनुवादित झाल्या. श्रीमंत झालेला अर्नेस्ट आता अमेरिकेत "पापा' या नावाने ओळखला जाऊ लागला. त्याच्या रुबाबदार व देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे स्त्रिया आकर्षित व्हायच्या. एका पार्टीत त्याला पॉलीन पीफर भेटली. ती त्याच्या प्रेमात पडली होती. तिने आधी हॅडलीशी मैत्री केली मग हेमिंग्वेशी. दोघे खूप जवळ आले होते. हेमिंग्वेने तिच्याशी विवाह केला. स्पेनमधील यादवी युद्धाच्या काळात मार्था गेलहॉर्न या तरुणीशी त्याची गाठ पडली. ती वार्ताहर आणि लेखिका होती. क्यूबामध्ये राहायला गेल्यानंतर त्यानं तिच्याशी लग्न केलं, पण दोघांचं फार काळ पटलं नाही. मेरी वेल्श ही हेमिंग्वेची चौथी आणि शेवटची पत्नी. ती अमेरिकेची परराष्ट्र प्रतिनिधी होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडला त्याची तिच्याशी भेट झाली. ते दोघं एकत्र आले, नंतर विवाह केला. त्याचं छोटेखानी विमान जेव्हा आफ्रिकेच्या जंगलात कोसळलं तेव्हा मेरी त्याच्याबरोबर होती. दोघे जखमी झाले; परंतु वाचले!
हेमिंग्वेचं युद्धाचं आकर्षण कधीही कमी झालं नाही. त्यासाठी त्यानं अनेकदा जीव धोक्यात घातलेला. युद्धकाळात प्रेमात पडण्याचा योग त्याच्या बाबतीत वारंवार आला ! ऍग्नेस, मार्था, मेरी वेल्श त्याला युद्धादरम्यानच भेटल्या. शिकार, मासेमारी, स्पेनमधील बैलांच्या झुंजी पाहणे हे त्याचे छंद त्याच्या साहसी स्वभावाशी मिळतेजुळते होते. त्याच्या लाडक्या "पिलार' या बोटीतनं त्यानं सागरी प्रवास केला, शिकारीच्या छंदापायी अनेकदा तो आफ्रिकेला गेला, मनमुराद शिकार आणि भटकंती केली. बैलांच्या झुंजीचा थरार अनुभवण्यासाठी स्पेनला गेला. तेथे जेव्हा युद्ध सुरू झाले, तेव्हा प्रथम वार्ताहर म्हणून, नंतर सैनिक म्हणून युद्धात सामील झाला. "टोरांटो स्टार'ची नोकरी करीत असताना त्याने टर्की आणि ग्रीस या देशांतील युद्धाचे वार्तांकन केलं. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झालं, तेव्हा तो क्यूबामध्ये होता. त्यानं आपल्या खासगी बोटीला मशिनगन लावून युद्धनौकेप्रमाणे सजवून ऍटलांटिक किनाऱ्यावर गस्त घालण्यास सुरवात केली. पुन्हा वार्ताहर बनून रणभूमीवर पोचला. त्यानंतर जर्मन रॉकेटविरोधी पथकात वायुसेनेत तज्ज्ञ म्हणून काम केले.
१९४४ मध्ये नॉर्मंडी बीचवर झालेल्या बॉम्बवर्षावात हेमिंग्वेचा सहभाग होता. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर तो पुन्हा क्यूबामध्ये राहायला गेला. लेखन, मासेमारीत स्वतःला गुंतवून घेतले. माशाच्या शिकारीच्या अनुभवावर आधारित "द ओल्ड मॅन अँड द सी' ही कादंबरी लिहिली. त्यासाठी १९५२ सालचा नोबेल पुरस्कार मिळाला. अखेरीस हेमिंग्वेकडे संपत्ती, कीर्ती व प्रतिष्ठा इ. सारं काही होतं ; परंतु साहसी जीवनाची सवय असलेल्या हेमिंग्वेला विकलांग होऊन मिळमिळीत आयुष्य जगायचे नव्हते. १९६१ मध्ये एकदा तो स्वतःच्या घरातच पाय घसरून पडला. तत्काळ त्यानं स्वतःची आवडती बंदूक डोक्यातला लावली आणि गोळी झाडली ! हेमिंग्वेनं आपला रोमांचक, वादळी जीवनप्रवास स्वखुशीनं थांबवला. अगदी अशाच प्रकारे त्यांच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती. आयुष्यात चार वेळा प्रेमविवाह करणारा अन सहा शब्दांची अभूतपूर्व गोष्ट लिहिणारा हेमिंग्वे जिवंत असतानाच दंतकथा बनला होता !
- समीर गायकवाड.
(लेखातील माहिती जालावरून संकलित केलेली आहे)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा