अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान डोनल्ड ट्रम्प यांनी 'आपण अध्यक्ष झालो तर इस्त्राईलमधील अमेरिकन दूतावास तेल अवीवमधून जेरुसलेम येथे हलवू' असे आश्वासन दिले होते. जगभरातील प्रसारमाध्यमांना तेंव्हा ट्रम्प निवडून येतीलच याची हमी नव्हती त्यामुळे त्यांच्या सर्व आश्वासनांकडे कानाडोळा केला गेला. निवडून येताच इस्लामी राष्ट्रातील नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवेशावर निर्बंध लादले होते. मुस्लिमांना कट्टरतावादी वा फंडामेंटालिस्ट म्हणून सातत्याने टोमणे मारणारे आणि त्यांना डिवचण्याची एकही संधी न सोडणारे ट्रम्प हे खरे तर केवळ उजव्या विचारसरणीचेच नसून पक्के मुस्लीमद्वेष्टेही आहेत हे आता यथावकाश स्पष्ट होतेय. अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर 'अमेरिका फर्स्ट' अशी साखरपेरणी करताना त्यांनी नाझीझमच नव्या रुपात अंगीकारला होता. याची अगदी ताजी उदाहरणे ब्रिटीश पीएम थेरेसा मे यांच्याशी झडलेले ट्विटरवॉर आणि दुसरे म्हणजे जेरुसलेममधे दूतावासाच्या स्थलांतराची घोषणा.
थेरेसा मे यांच्या कॉन्झर्व्हेटीव्ह पक्षाचा विरोधक असणाऱ्या 'ब्रिटन फर्स्ट' या कडवा उजव्या विचारसरणीच्या ग्रुपच्या वतीने मुस्लीमविरोधक पोस्ट्स आणि व्हिडीओ सातत्याने शेअर केले जातात. २९ नोव्हेंबरला ट्रम्प यांनी यातील काही व्हिडीओ रिट्विट केले. ट्रम्प यांच्या या कळलाव्या कृतीवर ब्रिटनकडून पंतप्रधानांच्या प्रवक्त्याद्वारे संयमी प्रतिक्रिया आली. तरीही ट्रम्प यांचे पित्त खवळले, त्यांनी थेट थेरेसा मे यांच्या ट्विटर अकाऊंटला टार्गेट करत लिहिलं की "तुम्ही तुमच्या देशातील विध्वसंक कडव्या मुस्लीम दहशतवादाकडं लक्ष द्या, आमचं सगळं आलबेल आहे." दहशतवादाचा उल्लेख करताना ट्रम्प मुस्लीम समुदायाचा उद्धार करायला कधी विसरत नाहीत हे इथे पुन्हा अधोरेखित झाले. मे यांच्यावर हा शाब्दिक हल्ला चढवला तेंव्हा त्या मध्यपूर्वेतील देशांच्या दौऱ्यासाठी जॉर्डनमध्ये आल्या होत्या. याच दौऱ्यात त्यांनी इराक आणि सौदी अरेबियालाही भेट दिली होती हे उल्लेखनीय. मागील दशकात एकाही ब्रिटीश पीएमनी जे केले नव्हते ते मे यांनी करून दाखवलं. आणि नेमक्या त्याच काळात ट्रम्प यांनी मुस्लिमांना टार्गेट करताना थेरेसा मे यांच्यावरही निशाणा साधला.
याच्या नंतरची घटना म्हणजे अमेरिकन दूतावास तेल अवीवमधून जेरुसलेममध्ये स्थलांतरीत करण्याची ट्रम्प यांची घोषणा. या घोषणेचा सर्वात प्रखर निषेध सौदीसह अरब जगतातून झाला हे विशेष. यावरून काही पश्चिमी देशांनीही ट्रम्प यांना कानपिचक्या दिल्या आहेत पण कट्टरतावादाचेच दुसरे टोक असणारे ट्रम्प या निषेधाला भीक घालतील असे वाटत नाही. मुस्लीम जगतातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालीय. पोप फ्रान्सिस यांनी काही दिवसापूर्वी म्यानमारला गेल्यावर रोहिंग्या मुस्लिमांबद्दल धारण केलेल्या मौनावरून मुस्लीम जगतात खळबळ असतानाच ट्रम्प यांनी ही भूमिका जाहीररित्या मांडलीय. या घडामोडीवरून ट्रम्प यांच्या मनात ठासून भरलेला मुस्लीमद्वेषाचा विखार स्पष्ट दिसून येतो. जेरुसलेमचा उल्लेख करून ट्रम्प यांनी आग्यामोहोळास डिवचले आहे याचे कारण जेरुसलेमचा इतिहास आणि त्याचे महत्व.
जगभरातील लोकांना जेरुसलेमबद्दल कुतूहल आहे. हे शहर अब्राहमिक धर्मामधल्या संघर्षाचे मूळ आहे. निरीश्वरवाद आणि देवभोळेपण यांत हद्द आखणारं आणि जगाला सर्वधर्मसमभावाचा उगम दाखवून देणाऱ्या या शहरावर अहोरात्र जगभरातला मिडिया डोळा ठेवून असतो. ‘जेरुसलेमची कहाणी सा-या विश्वाची कहाणी आहे’ हे अनेक अर्थांनी सत्य आहे. डिजिटल युगात धर्माचं महत्त्व कमी होत जाईल, असा अनेक बुद्धिवंतांचा समज मागच्या काही दशकांनी पूर्णपणे चुकीचा ठरवलेला आहे. नव्वद नंतरच्या दशकांत जगभर धर्माचं व धर्माआधारे उभ्या राहणा-या राजकारणाचं पुनरुज्जीवन झालंय. चालू दशकात तर धर्म हाच राजकारणाचा परवलीचा शब्द झालाय. ख्रिस्तपूर्व पाच हजार वर्षापासून लोकवस्ती असणारं हे शहर ऐतिहासिक काळापासून संपत्ती, धर्मवाद, धार्मिकता, श्रद्धा, सत्ता, विवेक, पाप पुण्य यांचं केंद्र राहिलंय. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्माचं उगमस्थान व श्रद्धास्थान असलेलं जेरुसलेम म्हणजे गेल्या तीन हजार वर्षाचा जिवंत इतिहासच आहे. ज्यूंनी कॅननमध्यें प्रवेश करण्यापूर्वींची या शहराची नोंद असून त्याला उरूसलीम (सलीमचें, शांततेचें शहर) हें नांव होतें. हेड्रियन बादशहानें हें शहर पुन्हां वसवून त्याला एलिया कॅपिटोलिना हें नांव दिले. ख्रिश्चन, ज्यू, मुसलमान मूलतत्त्ववाद्यांचं हे तीर्थस्थान आहे आणि त्याच वेळी परस्परांवर वर्चस्व गाजवू इच्छिणा-या संस्कृतींसाठी छळकपटाचा अवलंब करून लढण्याची रणभूमीही आहे. ज्यूंसाठी जेरुसलेम शहर पृथ्वीवरील सर्वात पवित्र तर इस्लाम धर्मामध्ये तिसरे सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. जेरुसलेममध्ये अनेक ऐतिहासिक ख्रिस्ती स्थळे, वास्तू आहेत. जेरुसलेमचा ताबा व अखत्यारी हे इस्रायल-पॅलेस्टाइन दरम्यान सुरु असलेल्या भांडणाचे प्रमुख कारण आहे. पूर्व जेरुसलेम कायदेशीर रित्या जरी वेस्ट बँकचा भूभाग असला तरी तेथील अनेक जागांवर इस्रायलने लष्करी कब्जा करून अतिक्रमण केले आहे. 'दुस-या धर्माने आपल्या भूमीवर दावा केल्याने त्या स्थळाचं महात्म्य ज्या पटीत वाढते तितके अन्य कशानेही वाढत नाही' हे सत्य इथे अधिक लागू होते. त्यामुळेच यावर अधिकार सांगणारया वारसदारांचा अन त्या वारशासाठी केल्या गेलेल्या लढायांचा एक चक्रव्यूह इथे आढळतो.
जेरुसलेमचा प्राचीन इतिहास सुसंगत असा उपलब्ध नाही. या शहरावर जोशुआची स्वारी होण्याआधी ते ईजिप्शियन लोकांच्या ताब्यांत होते. पुढे सालोमनच्या कारकीर्दींत जेरुसलेमची भरभराट झाली. ईजिप्तचा राजा तिशक यानें जेरूसलेमच्या राजाचा पराभव करून येथील अपार संपत्ती लुटून नेली. या नंतरचा जेरुसलेमचा तीन शतकांचा इतिहास म्हणजे हे शहर आपल्या ताब्यांत आणण्यासाठी निरनिराळ्या लोकांच्या प्रयत्नांचा इतिहास होय. अरबांकडून बायझेनटाइन राजवटीचा जेरुसलेममधून पाडाव झाल्यावर जेरुसलेमवर इस्लामी खलीफांचं राज्य आलं ! आधी मदिनाचे राशीदून, मग दमास्कस (सीरिया) चे उमय्यद अणि नंतर बगदादचे अब्बसीद ! या इस्लामी खालिफानी ज्यूंना नवे सिनागोग (ज्यूइश मंदिर) बांधायला मनाई घातली. ६३७ साली खलीफा उमर याने हे शहर जिंकले पण त्याने या शहराचा विध्वंस केला नाही व सर्वधर्मीयांनी त्याने शांततेने राहू दिले. जवळपास पाचशे वर्षानी ज्यूंना जेरुसलेममधे रहायला अणि धर्माचरण करायला मोकळीक मिळाली होती. पुढे १०९९ सालापर्यंत हें शहर मुसलमानांच्या ताब्यांत होतें. नंतर खलिफा अब्द-इल मालिकनं ज्यूंच्या फोडलेल्या मंदिरातील पवित्र दगडावर “डोम ऑफ़ द रॉक” बांधला. कारण इस्लामनुसार पैगंबर तिथून स्वर्गात जाऊन आले. यामुळे जेरुसलेम मनस्वी ‘इस्लामिक श्रद्धास्थान’ बनलं. दरम्यान मध्य-पूर्व आशियामधे जसजशी इस्लामची ताकद वाढत गेली, तसं तसं यूरोपात ख्रिश्चन मजबूत होत गेले. ग्रीसचा झालेला पाडाव अणि जेरुसलेममधून गेलेली सत्ता पाहून पोप अर्बन (दुसरे) यांनी “क्रूसेड”ची आरोळी देत धर्मयुद्ध पुकारले. युरोपातून लाखो क्रुसेडर्सच्या टोळ्या जेरुसलेमवर धावून आल्या. ज्यू अणि मूसलमानानी कसोशीनं प्रयत्न केले पण जेरुसलेम पडले. असंख्य ज्यूंची कत्तल झाली. जेरुसलेम परत एकदा ख्रिश्चन शहर बनलं अणि पॅलेस्टाइनमधून पुन्हा एकदा ज्यूंची गच्छंती झाली. १५१७ सालपर्यंत हे ईजिप्तच्या सुलतानांच्या ताब्यांत होतें, पण तुर्क ओटोमन राजा सुलेमाननं हे शहर जिंकले. यापुढची चार शतकं ज्यूंसाठी थोडी बरी राहिली. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात संपूर्ण जगाचं राजकीय समीकरण बदललं होतं. युरोपियनांचे जगावर राज्य होते. याच काळात जगभरातल्या ज्यूंनी 'झिओनिजम'ची चळवळ सुरु केली. झिओनिजम म्हणजे जगभरातल्या ज्यू लोकाना एकत्र आणून इस्त्राईल म्हणजे ओटोमन पलेस्टाइनमधे न्यायचं ! हे झिओनिस्ट खूप कट्टर म्हणून ओळखले जायचे. पहिल्या महायुद्धात ओटोमन साम्राज्याचा पराभव झाला आणि १९१७ मध्ये ब्रिटनने हे शहर काबीज केले. दूसऱ्या महायुद्धात नाझी फौज़ानी ज्यूंचे जेनोसाईड केले. झिओनिस्ट ज्यू लोकानी राष्ट्रउभारणीसाठी लढा उभारला यासाठी जेरुसलेमलगतच्या अरबांशी त्यांनी उघड वैर पत्करलं. यात अनेक चकमकी झडल्या. अरबांना पॅलेस्टाइन नावाचा इस्लामी देश हवा होता तर ज्यूंना इस्त्राईल हवं होतं. नियोजनपूर्वक त्या भागातील जमीन खरेदी करणाऱ्या ज्यूंची संख्या अरबांपेक्षा जास्त झाली अणि १४ मे १९४८ ला अमेरिकेचा टेकू घेत इस्त्राईल जन्माला आलं. याच भूमीचा उर्वरित भाग अरबांकडे राहीला, तोच पॅलेस्टाइन. आज इस्रायल आणि पॅलेस्टिनी हे दोघंही जेरुसलेमवर आपली राजधानी म्हणून दावा सांगतात. त्यासाठी गेली अनेक वर्षे त्यांचा संघर्ष सुरू आहे. एका आकडेवारीनुसार जेरुसलेम दोनदा पूर्णपणे उद्ध्वस्त केलं गेलं. २३ वेळा त्याला वेढा घातला गेला. ५२ वेळा या शहरावर हल्ले झाले आणि ४४ वेळा ते सत्ताधाऱ्यांकडून हिसकावून घेतलं गेलं. अर्थात ही ज्ञात इतिहासाची आकडेवारी आहे, पण त्यावरून जेरुसलेमसाठी सातत्याने कशा लढाया झाल्या याची कल्पना यावी. यावरून जेरुसलेमचे सत्ताकारणातील महत्व ध्यानी येते.
आज इस्त्राईल जरी जेरुसलेमला आपली राजधानी मानत असला तरी जगातील एकाही देशाने या दाव्याला मान्यता दिली नाही. पण ट्रम्प यांच्या आततायी घोषणेनुसार जर जेरुसलेममध्ये युएस दूतावास सुरु झाल्यास असं कृत्य करणारा तो पहिला देश ठरेल. त्याचबरोबर जगाला पुन्हा धर्मयुद्धाच्या खाईत लोटण्याचे पापही अमेरिकेच्याच माथी लागेल. कारण ट्रम्प यांनी ही घोषणा करताच पॅलेस्टिनी अरबांनी जेरुसलेममध्ये अमेरिकनांना प्रवेशबंदी केलीय. मुस्लिम राष्ट्रांच्या तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्यात. याआधी जेरुसलेमच्या निमित्ताने ज्यू-ख्रिश्चन एकत्र झाले तर कधी ज्यू-मुसलमान तर कधी मुसलमान-ख्रिश्चन एक झाले अन उरलेल्या धर्माला त्यांनी जेरीस आणले हा इतिहास आहे. आता मुस्लीमद्वेष्टे ट्रम्प आणि इस्त्राईली राजवट एकत्र आले तर काय होईल हे सांगायाला कोणा राजकीय पंडिताची गरज नाही. जगभरात इस्लामी मुलतत्ववाद फोफावला असताना ट्रम्प यांनी लावू घातलेल्या या आगीस भडकू द्यायचे की तिच्यावर उतारा शोधायचा हे थेरेसा मे किंवा इमॅन्युएल मॅक्रोनसारख्या परिपक्व लोकांच्या हाती आहे. नाही म्हणायला आपल्याकडे सुब्रमनियन स्वामी यांनी ट्रम्प यांच्या आगीत तेल ओतायचे काम केले आहे.
- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा