कालच्या तारखेस १६ फेब्रुवारीस स्थापन झालेली हेजबोल्लाह (अरबी: حزب الله) ही पश्चिम आशियाच्या लेबेनॉन देशामधील एक ज्यूविरोधी शिया अतिरेकी संघटना व राजकीय पक्ष आहे. अत्यंत कडवी लढाई करणाऱ्या आणि हार न मानणाऱ्या माथेफिरू देशप्रेमी तरुणांची संघटना असे या संघटनेचे वर्णन केले जाते
१९८२ साली इस्रायलच्या लेबेनॉनवरील हल्ल्यानंतर काही मुस्लिम धर्मगुरूंनी इराणच्या पाठिंब्यावर हेजबोल्लाहची स्थापना केली. हेजबोल्लाहचे पुढारी इराणचे अयातोल्ला रुहोल्ला खोमेनी ह्यांचे अनुयायी होते. इराणी सैन्याने हेजबोल्लाहला लष्करी प्रशिक्षण दिले. १९८२ च्या हल्ल्यानंतर इस्रायलने दक्षिण लेबेनॉनमधील काही भूभाग बळकावला होता. १९८५ ते २००० दरम्यान हेजबोल्लाहने इस्रायली सेनेविरूद्ध गनिमी कावा वापरून लढाई चालू ठेवली आणि इस्त्राईलच्या नाकात नऊ आणले. केल्यानंतर अखेर मे २००० मध्ये इस्रायलने दक्षिण लेबेनॉनमधून माघार घेतली.
आजच्या घडीला हेजबोल्लाह लेबेनॉनमधील एक प्रमुख राजकीय पक्ष असून तेथील शिया मुस्लिम जनतेचा हेजबोल्लाहला मोठा पाठिंबा आहे. अमेरिका, फ्रान्स, युनायटेड किंग्डम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, सौदी अरेबिया, इस्रायल ह्या देशांनी हेजबोल्लाहला अतिरेकी संघटना ठरवले असून त्यावर पूर्ण अथवा अंशत: बंदी घातली आहे.
२०११ सालापासून सुरू असलेल्या सीरियन गृहयुद्धामध्ये हेजबोल्लाहने सीरियन सरकार व बशर अल-अस्सादची बाजू घेतली असून सीरियन विरोधकांसोबत लढा चालवला आहे. हिझबुल्लाने आपली मोठी फौज यासाठी सिरीयन सैन्याच्या बेगमीस दिली आहे. आयसीस स्वतःला इस्लामी जगताचा कैवारी म्हणवते मात्र इस्त्राईलच्या विरुद्ध लढून आपली भूमी मुक्त करून घेणाऱ्या हेजबोल्लाहचा विश्वास आयसीस मिळवू शकले नाही ही वस्तूस्थिती आहे. येणारया काळात ते हेजबोल्लाहचा विश्वास जिंकू शकले नाहीत तर इस्लामी जगत त्यांच्य कह्यात असेल हा त्यांचा होरा एक दिवास्वप्न ठरेल हे मात्र निश्चित...
यावर काही संशोधक असे मत मांडतात की हेजबोल्लाह ही शियाबहुल असल्याने आयसीस त्यांच्यापुढे हांजी हांजी करत नाही कारण आयसीसच्या अजेंड्यात शियाविरोध देखील आहे. आपल्याकडच्याही ज्या मुस्लीम तरुणांना आयसीसची भुरळ पडते त्यांनीही हेजबोल्लाहच्या आयसीस विरोधाचे भान नक्की ठेवावे. अमेरिकेने सर्व मानवी हक्कांची मुल्ये पायदळी तुडवून सद्दाम हुसेन यांना धडा शिकवण्यासाठी इराक मध्ये रासायनिक अण्वस्त्रे असल्याची खोटी आवई उठवली जी पुढे युनोच्या पथकाने उघडकीस आणली. अमेरिकेने जे इराकचे केले तेच ढोंग अफगाणीस्तानसोबत करण्याचा प्रयत्न केला अन ते तिथे तोंडघशी पडले. सगळ्या अफगाणीस्तानात अराजक माजलेले असतानाही त्यांना तिथून पाय काढता घ्यावा लागला. पुढचा डाव आता सिरियात चालू आहे. बशर अल असाद यांची राजवट उलथून टाकून तिथे आयसीसला कब्जा करायचा आहे तर असाद यांची राजवट मानवी हक्कांची पायमल्ली करणारी आहे असे कारण पुढे करून असाद यांच्या विरोधातील फुटीर गटांना अमेरीकेची खुली साथ आहे. तर रशिया आणि इराण असाद यांच्या बाजूने आहेत, हेजबोल्लाह तर सुरुवातीपासून आयसीसच्या विरोधात आहेत. हे सर्व खेळ चालू असताना अरब अमिरातीसारखे बलाढ्य देश मात्र आतून आयसीसला फूस देण्याचा उद्योग चालू ठेवताहेत वरून मात्र युएईत आयसीस समर्थकास शिरच्छेदाची सजा केली जाईल असा फतवा तिथल्या राजांनी जारी केला आहे. अमेरिकेचा (इस्त्राईली) कांगावा आणि अरब देशांचे तेलाधिष्ठित छुपे राजकारण समजले की आयसीसचे खरे दात ओळखणे सोपे जाते..टर्की, सौदी अरेबिया आणि कतारने आपले खरे पत्ते टाकलेले नाहीत.
हे झाले हेजबोल्लाहचे. तर हमासचे हेजबोल्लाहच्या उलटे काम झाले आहे. लाल समुद्र आणि भूमध्यसागर यांच्या मध्ये इजिप्तची वाळवंटीय द्वीपभूमी असलेल्या सिनाई भागात इस्लामिक स्टेट ऑफ सिनाईचे स्वतंत्र युनिट स्थापन झाल्यापासून हमासमध्ये अस्वस्थता आहे. हमासने सिरीया आणि इराक मधील आयसीसला पाठिंबा दिला होता आणि आहे. मात्र पेलेस्टाईनच्या मुक्तीलढ्यात हमासच्या बरोबरीने हिझबुल्लाचे अंतर्गत दल काम करत होते. पेलेस्टाईन स्वतंत्र झाल्यापासून तिथले हेजबोल्लाहचे अस्तित्व आणि वर्चस्व कमी झाले. तर इस्त्राईलला विरोध आणि कडवा धर्मवाद याच्या बळावर पेलेस्टीनी लोकांच्या मनात आणि पर्यायाने अरब जगात हमासने आपली आयाडेंटीटी तेवती ठेवली. आयसीसला सुरुवातीपासून पाठिंबा देणारया हमासवर आता आयसीसला ताबा पाहिजे. आयसीसने सालाफिस जिहादी जे हमासचे सर्वात रानटी समर्थक समजले जातात त्यांना हमासपासुन फोडले आहे. आयसीस हमासविरुद्धही बोलते- हमासने पेलेस्टाईन मध्ये शरिया लागू केलेला नाही, हमास स्वतःला इस्लामीक ग्रुप म्हणवून घेत नाही, ते केवळ इस्त्राईलचे विरोधक आहेत असा खुला प्रचार आयसीसचे समर्थक गाजामध्ये आढळल्यापासून हमास आता सावध झालीय मात्र आयसीसने आता तिथे चांगले पाय रोवले आहेत.
गोलान टेकड्यांच्या भागात असणारया जाह्बत अल नुसरा असो वा अल- कासम ब्रिगेड असो वा अल कैदाचे ग्रुप असोत या सर्वांच्या मनात आयसीस बद्दल प्रचंड आकर्षण आहे. हमासचे असे ग्रुप आपल्या कह्यात करून हमास संपवायची असा चंग जणू आयसीसने बांधला आहे. इस्त्राईल आणि हमासचे सारे लक्ष आता जॉर्डनवर आहे.
अर्थव्यवस्थेचा विचका उडालेल्या जॉर्डनने आधीच जाहीर केलेय की ते आयसीसच्या विरोधात आहेत. मात्र आयसीसने जानेवारी २०१६ पर्यंत जॉर्डनच्या विरुद्ध उघड भूमिका घेतली नव्हती. सिरीयामध्ये रशियाने आयसीसवर हवाई हल्ले तीव्र केल्यावर मात्र आयसीसने आपले मनसुबे उघड केले होते. मुस्लीम राष्ट्रांच्या गळ्यातील ताईत असलेल्या जॉर्डनच्या गळ्याला आयसीस जेंव्हा नख लावेल तेंव्हा आयसीसचे मुस्लीम जगतातील आकर्षण कमी होईल का याचा सध्या आयसीसचा एक गट अभ्यास करत आहे. त्यानंतर मार्च ते एप्रिल दरम्यान त्यांची पुढची पावले स्पष्ट होतील. तोवर अमेरिका आपले दाखवायचे दात आणि खायचे दात यांचा मनमुराद वापर करून घेईल. नंतर मात्र ह्या सर्वांचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहील काय?
अमेरिकेला आयसीसचा नायनाट करायची खरी इच्छा असेल तर त्यांनी आधी असादच्या सैन्याला बळ दिले पाहिजे मात्र एकाच वेळी ते असाद आणि आयसीस यांच्या विरोधात लुटूपुटुची लढाई लढत आहेत. येणारया काळात ब्लादिमीर पुतीन किती आक्रमक होतात यावर आयसीसचे आणि गुपचूपपणे आयसीसच्या मागे उभ्या असलेल्या शक्तींचे चित्र स्पष्ट होईल.
हा लेख हेजबोल्लाहच्या समर्थनार्थ नसून आयसीस या इस्लामी जगताच्या स्वयंघोषित तारणहार संघटनेस आयसीसहून जुन्या आणि लढवय्या इस्लामी संघटनेचा विरोध किती बोलका आहे तो अधोरेखित करणे हे प्रयोजन यामागे आहे... जेणेकरून आयसीसचे खरे रूप लक्षात येणे सोपे होईल.
- समीर गायकवाड.

संदर्भ -
ISIS and Hamas – a complex relationship:
Analysis, news and resources on Israel and the Middle East,
As Iran Gains Sway over Sunni Areas, “Mini World War” Developing in Syria - Washington Post.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा