संवेदनशील व्यक्तीने काळजाला हात घालणारी एखादी कलाकृती बनवली आणि त्यातून त्याच्या मनात अपराधीत्व दाटून आले तर त्याच्या मनातील भावनांचा कडेलोट होतो. अशाच एका सहृदयी व्यक्तीबद्दल, केविन कार्टरबद्दल जेंव्हा कधी विचार करतो तेंव्हा डोळ्यात नकळत पाणी येतेच....
छायाचित्रकाराच्या मनात भावनांचे कल्लोळ दाटतील अशा काही क्षणांचे त्याला साक्षीदार व्हावे लागते अन त्यातून जन्माला येते एक अप्रतिम छायाचित्र. त्यात कधी दुःख असते तर कधीवेदना, राग, आक्रोश, शृंगार, प्रेम, आनंद, द्वेष, मोह अशा अगणित भावनांचे हुंकार त्यात व्यक्त होतात. छायाचित्रकारासाठी त्याच्या आयुष्यातले सर्वोच्च ध्येय पुलीत्झर पुरस्कार ठरावा. या पुरस्काराच्या वेडाने झपाटलेले छायाचित्रकार जगाच्या पाठीवर कुठेही अन कसल्याही परिस्थितीमध्ये जातात.ताजी उदाहरणे म्हणजे सिरीयाचे गृहयुद्ध असो वा इबोलाचा आउटब्रेक असो आपल्याला खरी आणि नेमकी परिस्थिती तंतोतंत माहिती छायाचित्रकारच पोहोचवतात.त्यासाठी प्रसंगी ते जीवसुद्धा धोक्यात घालतात.....
आपल्याकडे जसा दुष्काळ पडतो त्याहीपेक्षा अधिक तीव्र असा महाभयंकर दुष्काळ आफ्रिका खंडातील सुदान या राष्ट्रात पडला होता.ज्या सुदानमधून पुढे वाहत जाणारया नाईलने सुदानचे पूर्व आणि पश्चिम सुदान असे भौगोलिक विभाजन केले आहे त्याची अवस्था राजाने झोडपले अन पावसाने मारले अशी झाली होती.प्रखर दुष्काळाची ती वर्षे होती १९९१ -९२-९३. माणसे अन्नावाचून तडफडून मरत होती. भूकबळीनी मृत्यूची परिसीमा गाठली होती. तरीदेखील तिथे धार्मिक,वांशिक आणि आर्थिक वर्चस्वाच्या कुरघोडीने क्रूरतेचा कळस गाठला होता, त्यानेदेखील माणसे मरत होती. साहजिकच तिथले प्रशासन आणि सरकारसाठी गृहयुद्ध हा मुद्दा जास्त महत्वाचा होता आणि त्यामुळे भुकेने तडफडून मरणारया निष्पाप लोकांकडे जगाचेही लक्ष गेले नाही. भुक जशी माणसाला तशीच प्राण्यालाही आहे, दुष्काळाच्या कराल जबड्यातून कोण वाचणार ? पण कोंबडा झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचा राहील काय ? कालांतराने जगापुढे दबक्या पावलाने सत्य बाहेर येऊ लागले अन तेथे जागतिक मिडियाचा ओघ सुरु झाला. त्यापैकीच एक होता केविन कार्टर....
केविन कार्टर हा देखील मुळचा आफ्रिकन. जोहान्सबर्गमध्ये १३ सप्टेबर १९६०चा त्याचा जन्म. कार्टर हा एक फ्री लान्स (मुक्त) छायाचित्रकार होता. त्याला देखील वेड होते अशा झपाटलेल्या फोटोंचेच ! आपण असे एखादे छायाचित्र काढावे की जगाने दंग राहावे असे त्याच्या मनात राहून राहून यायचे.आपण काढलेल्या छायाचित्राने आपले नाव जगभरात व्हावे हा एकच विचार त्याच्या मनात असे सुदानमधील दुष्काळात तो जेव्हा दाखल झाला तेंव्हा त्याच्या मनात हाच एक विचार फेर धरून नाचत होता. आणि तो दिवस आला...
दार्फुर जवळील अयुडा येथील सर्व्हायवर-फीडिंग कॅम्पकडे खुरडत चाललेली भुकेने कासावीस झालेली आपल्या देहाचे ओझे झालेली एक चिमुरडी त्याच्या नजरेस पडली. खुरडत खुरडत पुढे सरकणारी ती मुलगी थोडे पुढे सरकली की थांबायची. नंतर पुन्हा पुढे सरकायची, पूर्णतः गलितगात्र झालेली ती चिमुरडी थोड्या थोड्या अंतरावर जीवाच्या आकांताने धापा टाकत होती आणि पुढेही सरकत होती आणि तिच्या मागेच काहीसे दूरवर तिच्या मरणाची वाट पाहत बसलेले गिधाड देखील हळूच पुढे सरकत होते . अंगावर काटा आणणारे हे दृश्य त्याच्या काळजास भिडले. जेंव्हा त्याला गिधाड दिसले तेव्हा चांगला शॉट मिळावा म्हणून तो अगदी काळजीपूर्वक गिधाडाचे लक्ष विचलित होणार नाही याची दक्षता घेऊ लागला. गिधाडाने त्याचे पंख पसरावे याकरिता तब्बल वीस मिनिटे वाट पाहून हा फोटो घेतला. त्याच वेळेस बरोबरच्या पत्रकारांनी आणि आरोग्य सल्लागारांनी त्याला सूचित केले गेले होते की, पत्रकारानी तिथल्या मरणासन्न लोकांना स्पर्श(कॉन्टॅक्ट) करू नये कारण त्यामुळे कदाचित कुठल्यातरी रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला होऊ शकतो. फोटो काढून झाल्यावर त्याने त्या गिधाडाला पळवून लावले आणि त्या मुलीचे खुरडत खुरडत कॅम्पच्या दिशेने जाणे तो पाहत राहिला.त्यावेळेस त्याच्यातला छायाचित्रकार त्याच्यातल्या 'माणसा'वर स्वार झालेला होता असेच म्हणावे लागेल.केविन त्याला देण्यात आलेल्या सुचनेचा आधार यासाठी देतो.फोटो काढलेल्या जागेपासून कॅम्प जवळपास एक किलोमीटर लांब होता......
आपल्या केमेरयात कैद केलेले ते छायाचित्र त्याने न्युयॉर्क टाईम्सला दिले.२६ मार्च १९९३ला ते न्युयॉर्क टाईम्सने आपल्या अंकात छापले आणि पत्रकारितेत एकच गलका झाला. वाचकांच्या आणि मिडियाकर्मींच्या फोन कॉल्स आणि मेल्स द्वारे इतक्या अमाप प्रतिक्रिया या छायाचित्राबद्दल आल्या की विशेष संपादकीय सदर त्याबद्दल लिहावे लागले. अनेक लोकांनी केविन कार्टरलाची 'एक छायाचित्रकाराच्या रुपातले तो एक गिधाडच आहे' अशा शब्दात निर्भत्सना केली. लाखो लोकांनी वेब साईटवर प्रश्न विचारून फोटोतल्या मुलीचे पुढे काय झाले अशी विचारणा केली.ती मुलगी पुढे कोठे गेली ? ती जगली का ? तिला मदत मिळाली का ? आम्ही तिच्यासाठी क्लाय करू शकतो ? एक ना अनेक प्रश्न लोक विचारत होते पण न्युयॉर्क टाईम्सकडे आणि केविनकडेही त्यांना देण्यासारखे उत्तर नव्हते अन जी माहिती पुढे आली ती छापण्यायोग्य नव्हती त्यामुळे या प्रथितयश दैनिकाने तोंडात मिठाची गुळणी धरून ठेवणे पसंद केले. पण या एका छायाचित्रामुळे सुदानकडे मदतीचा ओघ सुरु झाला, जगभरात तिथले भुकबळी चर्चिले जाऊ लागले. युनायटेड नेशन्सनेही याची दखल घेतली.....
जोहान्सबर्ग. २ एप्रिल १९९४ ची ती अस्वस्थ दुपार होती. केविनाचा मोबाईल खणाणला. न्युयॉर्क टाईम्सच्या पिक्चर एडिटर नेन्सी ब्रूस्की यांचा तो फोन होता, त्यांनी सांगितले की,"केविन तु करून दाखवलस, तु जिंकलास. तुला ब्रेकिंग न्यूज विभागातलं पुलित्झर मिळालंय !". केविनला काही याचा फारसा आनंद झाला नाही. खरे तर आनंदाने वेडा होण्याचा तो क्षण होता. तो त्याच्या ध्येयपूर्तीचा रोमांचकारी क्षण होता पण त्याला तितका आनंद झाला नाही. २३ मे १९९४ च्या दिवशी केविनला कोलंबिया विद्यापीठाच्या लॉ मेमोरियल लायब्ररीमध्ये पुलित्झर पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्याने पुरस्कार घेतला खरा पण त्याच्या काळजातून भुकेने कासावीस होऊन आपले कलेवर घासत खुरडत खुरडत जाणारी मुलगी काही केल्या जात नव्हती, ती मुलगी त्याच्या मेंदूचा एक घटक झाली होती....
त्याला मृत्यूचे वेदनांचे आणि त्यात होरपळणारया माणसांचे भास होऊ लागले. त्याचे मन त्याला खाऊ लागले, तो स्वतःला दोषी मानू लागला, एकटा राहू लागला अन तो नैराश्याच्या गर्तेत गेला, त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला आपण त्या मुलीच्या मदतीला जायला पाहिजे होते हा विचार त्याचा सतत पिच्छा पुरवत होता. आपल्या जीवाला धोका झाला असता तरी आपण तिची मदत करायला पाहिजे होती ही अपराधाची भावना त्याला मनाच्या एकांताच्या पोकळीत अधिकाधिक खोल नेत गेली आणि त्याची परिणती फार दुर्दैवी झाली. केविन कार्टरने पुरस्कार मिळाल्यापासून अवघ्या दोन महिन्यानी वयाच्या ३४ व्या वर्षी आत्महत्त्या केली. आणि सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. ज्या लोकांनी केविनवर टीकेचा भडीमार केला त्यांनी तरी अशा भूकबळींसाठी काही काम केले आहे का असा प्रश्न न्युयॉर्क टाईम्सने आपल्या बातमीत उपस्थित केला होता. केविन त्याच्या शेवटच्या दिवसात फारच हळवा झाला होता, त्याने आपल्या मनातली खंत आपल्या मित्रांकडे बोलून दाखवली होती.....
त्याने आत्महत्त्या करण्यापुर्वी लिहिलेल्या स्युसाईड नोट वरून त्याच्या मनात चालू असलेले द्वंद्व उघड होते. तो लिहितो - "I m really, really sorry. The pain of life overrides the joy to the point that joy does not exist... depressed ... without phone ... money for rent ... money for child support ... money for debts ... money!!! ... I am haunted by the vivid memories of killings and corpses and anger and pain ... of starving or wounded children, of trigger-happy madmen, often police, of killer executioners ... I have gone to join Ken if I am that lucky."
केविनने पाहिलेले मृत्यू,जखमा,गुन्हे, वेदना आणि विव्हळणारी लहान मुले यांनी तो अस्वस्थ होता, त्याला त्यांच्या मदतीसाठी पैसे हवे होते...त्याच्या गरजा आणि त्यांना आधार देण्यासाठी तो कंगाल झाला होता...त्यासाठी त्याला आणखी पैसे हवे होते...मानसिक दौर्बल्य आणि निराशा एकीकडे होती तर मृत्यू आणि वेदनांनी त्याला झपाटले होते...स्वतःला कमनशिबी समजत त्याने अखेर मृत्युला कवटाळले होते...
स्वतःच्या जीवाची बाजी लावून तिथे तो गेला खरा, तिथे त्याला काळजाला भिडणारे दृश्य दिसले त्याची त्याने छबी उतरवली त्याच्यातला छायाचित्रकार जिंकला.मदत करायची असूनही त्याला घातलेल्या जीवाच्या भीतीचा स्वार्थ त्याच्या माणूसकीच्या आड आला, तिथे त्याच्यातला 'माणूस' हरला आणि या हार-जीतच्या मनस्वी लढाईत एक स्वच्छंदी जीवन जगणारा तरुण छायाचित्रकर पराकोटीचा हळवा झाला की त्याने स्वतःला दोष देत अखेर अकाली मृत्युला कवटाळले.....
दुसरया बाजूने पाहिले तर केविनच्या या फोटोने सुदानला जगभरातून जी मदत मिळाली ती कोणत्याही 'अपिल' मधून शक्य झाली नसती. तो त्या मुलीचा जीव वाचवू शकला नाही पण त्याच्यामुळे अशा अनेक मुलीना जीवनदान मिळाले हे देखील खरे आहे. पण नाण्याची ही दुसरी बाजू खूप काळाने पुढे आली. ध्येयाने झपाटलेल्या एका तरुण छायाचित्रकाराचा हा अकाली मृत्यू अनेक प्रश्नांचे काहूर मनात माजवून जातो आणि आपल्या तात्कालिक समदुखी होण्याच्या भावनेची किळस येते. दुःख आणि वेदना याप्रती आपल्यात दिवसागणिक वाढत जाणारी निगरगट्टता बैचैन करून जाते.सुखी जीवन जगण्यासाठीच्या अनेक विचारांपैकीच एक म्हणजे, 'माणसाच्या संवेदना बोथट झाल्या की तो त्याला अपेक्षित असे सुखी जीवन जगू तो शकतो' हा सिग्मंड फ्रॉईडचा सिद्धांत उगाच माझ्या मनाला वाकुल्या दाखवत राहतो.....
आपला जीव धोक्यात घालून जगाच्या नजरेआड असणारं काटेरी वास्तव मांडणारया सर्व छायाचित्रकारांना सलाम...
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा