बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०
बैरुत स्फोटाच्या निमित्ताने...
शुक्रवार, २४ जुलै, २०२०
रेड लाईट डायरीज - भवताल
एका आर्टिकलमध्ये वाचण्यात आलेलं की मुलं किती छान संस्कारी पद्धतीने वागत आहेत, घरातल्या सर्व व्यक्तींची त्यांना चिंता आहे वगैरे. वाचून अनेकांनी मुलांचं कौतुक केलेलं, काहींनी पालकांचेही अभिनंदन केलेलं. भवतालच्या वातावरणाचा आणि पालकांच्या वर्तनाचा प्रभाव मुलांवर पडतो. लहान मुलं खूप अनुकरणशील असतात. यावरून मला ताहिरा आठवली. तिची चिमुरडी पोर आयेशा आठवली. ताहिरा धंदा करायची. कामाठीपुऱ्यातल्या तेराव्या लेनमध्ये यमुनाबाईच्या कुंटणखान्यात तीन बाय सहाच्या फळकुटात राहायची. 2007 ची घटना असेल. यमुनाचा कुंटणखाना दुसऱ्या मजल्यावर होता. तळमजल्यावर अरुण परदेशीचा दारू धंदा चाले. दिलीप पांडे नावाच्या इसमाची ती इमारत होती. त्यानं सुनील मथाईला ती किरायाने दिलेली. मथाईने तिथे धंदा उघडलेला. विकास मिश्रा याने तिथे युपीमधून मुली आणलेल्या. ( हा विकास मिश्रा पुणे पोलिसांनी 2012 मध्ये गजाआड केला, पुढे जामीनवर सुटल्यानंतर त्यानं नागपूरचं गंगाजमुना गाठलं) मथाईच्या अख्ख्या इमारतीची पूर्ण कळा गेलेली होती. संपूर्ण इमारतीत जवळपास चारशे बायकापोरी होत्या. सगळ्या युपीबिहारच्या. यांच्यातलीच एक होती ताहिरा. 1992 मध्ये ताहिराला बाईपणाचे भोग कळले. देहातली एक भेग काळजाच्या चिरफळ्या कशा उडवते ते तिने अनुभवलेलं.
सोमवार, ६ जुलै, २०२०
लॉकडाऊन स्टोरीज - रामपुकार पंडीतची अनसुनी पुकार
'शोले'मध्ये एक सीन आहे ज्यात कोवळ्या अहमदला (सचिन) गब्बरने हालहाल करून ठार मारून त्याचं प्रेत घोडयावर लादून रामगढला पाठवून दिलेलं असतं. अहमदचं कलेवर पाहून गाव थिजून जातं. संतापाची लाट येते आणि सर्वांचा राग जय वीरूवर उफाळून येतो. ठाकूर बलदेवसिंग मध्ये पडतो तरी गावकरी ऐकत नाहीत. ते म्हणतात की आम्ही इतकं दुःख सहन करू शकत नाही, या दुःखाचं कारण असणाऱ्या जय वीरूला गब्बरच्या हवाली केलंच पाहिजे. इतका वेळ आपल्या मुलाच्या मृतदेहावरून हात फिरवणारा म्हातारा रहीमचाचा कळवळून उठतो आणि दुःखाचा आवेग आवरत म्हणतो, "जानते हो दुनिया का सबसे बडा दुख क्या होता है ?"
रविवार, ५ जुलै, २०२०
बेंजामिन मोलॉईस - गीत विद्रोहाचे
करोनाबाधेतील एक दुजे के लिये...
कर्टीस आणि बेट्टी टारप्ले |
अमेरिकेत कोरोनाने प्रचंड हाहाकार माजवलेला असल्याच्या बातम्या आपण सर्वचजण पाहतो आहोत. संपूर्ण अमेरिका या विषाणूच्या साथीने स्तब्ध झालीय. त्याची एक गहिरी दास्तान या इस्पितळात लिहिली गेलीय. त्याची ही अद्भुत चैतन्यमय हकिकत. १८ जून २०२० ची ही घटना आहे. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतामधील फोर्टवर्थ भागातलं टॆक्सास हेल्थ हॅरिस मेथॉडिस्ट इस्पितळ. पहाटेपासूनच कर्टीस टारप्ले यांचा श्वास मंदावत चालला होता. त्यांची पल्स हरवत होती. डोळे अर्धमिटले झाले होते. गात्रे शिथिल होत होती. ओठ थरथरत होते, त्यांना काही तरी सांगायचं होतं. त्यांच्या सेवेत असलेल्या परिचारिका ब्लेक थ्रोन यांनी ते ओळखलं होतं. कर्टीससोबत त्यांची गाढ दोस्ती जी झाली होती.
फिर तेरी कहानी याद आई ...
तो एक प्रतिभाशाली कर्तृत्ववान विवाहित पुरुष, एका बेसावध क्षणी एका कमालीच्या देखण्या अप्सरेचं त्याच्यावर मन जडतं. तो तिला टाळू पाहतो पण तिच्यापासून दूर जाऊ शकत नाही आणि तिला जवळही करू शकत नाही. त्याचा संसार उध्वस्त व्हायची वेळ येते. त्याची पत्नी उन्मळून जाते, त्यांचं आयुष्य विस्कटतं. पण तो पत्नीशी सर्व गोष्टी शेअर करतो. ती ही त्याच्यावर विश्वास ठेवते. तुझे मन माझेच असेल, देह कोणाचाही असू शकतो असं त्याला सांगते. मात्र तरीही त्यांच्यात गैरसमज होत जातात. अखेर त्यांचा घटस्फोट होतो. तोवर बराच उशीर झालेला असतो. ती शापित अप्सरा तोवर खचून गेलेली असते. ती अंधाऱ्या विजनवासाच्या एकांती गुहेत जाते. इकडे तो दुसरे लग्न करतो तेही एका मनस्वी समजूतदार स्त्रीशी !
रविवार, २८ जून, २०२०
पोशिंद्याचा धनी...
घरोघरच्या अंगणातली सकाळची कळा अजून पुरती सरली नव्हती तोवरच गुबुगुबूचा आवाज करत नंदीबैलवाला दाखल झाला. भाऊसाहेब गोंडे त्याचं नाव. गल्लीच्या तोंडावरच असणाऱ्या रुख्माआत्याच्या दारापुढं येताच थरथरल्या आवाजात बोलला,
"दुसऱ्याचं घर भरवणाऱ्या बाप्पा तुझं घर उसवू नको, आत्महत्या करू नकोस !"भाऊसाहेब असं का म्हणतोस रे बाबा म्हणून खोदून खोदून विचारल्यावर तो बोलला की, “गावात शिरताच पोलीस पाटलाचं घर गाठलं, आमी आल्याची अन शंभूचा खेळ करणार आसल्याची वर्दी त्यास्नी दिली. नावपत्ता, निशाणी लिहून झाल्यावं परवांगी गाव्हली. तिथून पारापाशी येण्याधी पैल्या गल्लीला लक्षिमण रावताचं घर लागतं. तिथं ढोलकी घुमवली, शंभूच्या पायातली घुंगरं थिरकली. वाड्याचं दार कराकरा वाजवत उघडलं आणि आतून बोडख्या कपाळाची सारजाकाकू सूप हातात घेऊन आल्या. त्यास्नी तसं बगुन काळीज करपलं. बाई ईधवा झाली म्हंजीच लई वंगाळ झालं असं न्हवं. पर ज्या हातानं सोनं पिकवलं, जगाला घास भरवला त्याच हातानं फास लावून घ्यायचा. घरच्या लक्ष्मीला लंकेची पार्बती करायचं म्हंजे वाईच इस्कोट... बंद्या रुपयागत कुक्कु कपाळाला लावणारी घरची लक्षुमी अशी कपाळावर बुक्का लावून बघितली की पोटात कालिवतं. तिच्या कपाळावरलं काळं ठिक्कर पडलेलं गोंदण बगवत न्हाई. तिच्या हातनं पसाभर जुंधळा सुपातून घ्यायचा म्हंजे झोळीदिकून म्होरं करूशी वाटत न्हाई. सारजाकाकूच्या मोत्याच्या दाण्यांना न्हाई म्हणता आलं नाई. तवा जाऊन रुख्माआत्याच्या दाराम्होरं आल्यावर त्यास्नी भायेर यायच्या आदी आमीच बोल लावलं. आमचं चुकलं का बापू ? तुमीच काय ते सांगा ! आमी पडलो अनपड अडाणी. .. “
भाऊसाहेबाने माझ्या डोळ्यात पाणी आणलेलं. मी कसला बोलणार ! माझ्यापेक्षा अधिक संवेदनशील तर तोच होता.
शनिवार, ६ जून, २०२०
लॉकडाऊन स्टोरीज – जिंदगी का सफर...
लॉकडाऊनच्या काळातील काहींच्या वेदना इतक्या टोकदार आहेत की कुणाही सुहृदाच्या आतडयाला पीळ पडावा. अशीच एक कहाणी महंगी प्रसाद यांची आहे. आजही लॉकडाउनमुळे देशभरातील मजूर कामगार मिळेल त्या मार्गाने प्रवास करत आपल्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अनेकजण तर कित्येक वर्षांनी आपल्या घरी जात आहेत. अशाच अभागी लोकापैकी एक होते महंगी प्रसाद ज्यांनी तब्बल तीस वर्षांपूर्वी रागाच्या भरात आपलं घर सोडलं होतं. उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यामधील कैथवलिया हे त्यांचं गाव. खेड्यातलं सामान्य जीवन जे देशभरात अनुभवायला येतं तसंच शांत रम्य ग्रामजीवन त्यांच्या गावी देखील होतं. घरातल्या छोट्याशा कुरबुरीवरून नाराज होत त्यांनी गाव सोडलं होतं ते साल होतं 1990चं ! तेंव्हा ते संतापाच्या इतक्या आहारी गेले होते की आपल्या जबाबदार्यांचा विसर त्यांना पडला होता, आपण कोणता अनर्थ करत आहोत याचं त्यांना जरादेखील भान नव्हतं. वास्तवात हे भान हरपल्यामुळेच आणि जोडीला विवेक गमावल्यामुळेच त्यांनी आपल्या गावाची वाट कायमची सोडून दिली होती. घर सोडून परागंदा झाले तेंव्हा ते काही पोरजिन्नस होते वा अगदी पंचविशीतले तरुण होते अशातलीही बाब नव्हती. ते खरे तर परिपक्वतेच्या उंबरठ्यावर होते, कारण तेंव्हा त्यांचं वय तब्बल चाळीस वर्षांचं होतं.
रविवार, ३१ मे, २०२०
लॉकडाऊन स्टोरीज – अमरप्रेम ...
'तो' कुलाब्याच्या कॉजवे मार्केटहून यायचा. हॅण्डसम देखणा. अगदी मदनबाण वगैरे म्हणतात तसा अतिशय आकर्षक नसला तरी तरुण पुरुषाच्या अंगी असणाऱ्या खाणाखुणा त्याच्या ठायी होत्या. उंचापुरी भक्कम पिळदार अंगयष्टी. गौर वर्ण, कुरळे केस, उभट चेहरा, काहीशा दाट जाड भुवया आणि त्याखालचे मत्स्याकृती पाणीदार डोळे, विस्तीर्ण कपाळ, त्यावर रेंगाळणारी मस्तीखोर झुल्फं, सरळ नाक, वर आलेले गालाचे चीक मसल्स, उभट निमुळती हनुवटी यामुळे त्याचं इम्प्रेशन मॉडेलिस्टीक असायचं. कुणीही त्याला पाहिलं की किमान काही दिवस तरी त्याला विसरणं शक्य नसे, त्याची वेशभूषा ही अत्यंत आटोपशीर आणि रॉकींग होती. बहुतांश करून फिकट रंगशैलीचा चौकडा शर्ट आणि काळी जीन्स, व्हाईट स्पोर्ट्स शूज असा त्याचा वेष असे. शर्टचं वरचं बटन खुलं असे ज्यातून त्याची भक्कम छाती डोकावत असे.त्याची नजरही कमालीची तीक्ष्ण होती. तो काही एकटक पाहायचा नाही मात्र त्यानं एकदा जरी पाहिलं तरी समोरच्या व्यक्तीला वाटे की तो एकसारखा आपल्याकडेच पाहतो आहे. प्रत्यक्षात त्यानं आपल्याकडे पाहत राहावं असं समोरच्याची अपेक्षा असे. तो कॉजवे मार्केट परिसरात एका मरीन कंपनीत सेल्स एक्झिक्युटीव्ह होता. कमाई खूप काही नव्हती पण जितकी होती त्यात तो खुश होता. एके दिवशी त्याच्या आयुष्यात 'ती' आली.
गुरुवार, २८ मे, २०२०
रेड लाईट डायरीज - लॉकडाऊनच्या वेदना : पुणे ते मेलबर्न
आपल्याकडे काय घडलं होतं याची माहिती घेतल्यास ही घटना अधिक धक्कादायक वाटेल.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)