इसवीसनपूर्व पाचव्या शतकात क्लिऑन हा अथेन्समधील एक लोकप्रिय नेता (demagogue) होता, जो आपल्या आक्रमक वक्तृत्वासाठी आणि सामान्य जनतेच्या भावनांना हात घालण्यासाठी ओळखला जायचा.
क्लिऑनने पेलोपोनेसियन युद्धादरम्यान स्पार्टाविरुद्ध आक्रमक धोरणांचा पुरस्कार केला आणि सत्ताधारी वर्गाला (aristocrats) बदनाम करण्यासाठी जनतेच्या मनामध्ये आक्रोश निर्माण केला, त्याने जनतेच्या संतापाचा वापर केला.
प्रतिस्पर्ध्यांवर खोटे आरोप ठेवून किंवा त्यांच्या नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जनतेचे लक्ष विचलित केले. उदाहरणार्थ, स्फॅक्टेरियाच्या युद्धात (Battle of Sphacteria, इ.स.पू. 425) त्याने सैन्याचे यश स्वतःच्या नावावर घेतले आणि युद्धविरोधी नेत्यांना कमजोर केले. त्याच्या या रणनीतीमुळे तो अथेन्सच्या राजकारणात प्रभावशाली नेता बनला.
इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५
शनिवार, ३१ मे, २०२५
एकमेवाद्वितीय - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर!
![]() |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर |
महाराणी महान रयतप्रेमी होत्या. रयतेचे हालहवाल जाणून घेण्यासाठी त्यांचे गुप्तहेर रयतेत फिरत असत. एकदा एका हेराने खबर आणिली की, लक्ष्मीबाई नामे एका विधवा वृद्धेची सकल संपत्ती ऐवज रुपये पंधरा हजार तिच्या मुलाने जबरदस्तीने काढून घेऊन पत्नीच्या स्वाधीन केली असे. ही माहिती ऐकताच राणीबाईंना संताप अनावर झाला. त्यांनी तत्काळ त्या वृद्धेच्या सुनेला एक खलिता धाडला आणि विधवा सासूचे पैसे परत करण्याकरिता बजावले. त्यांनी नुसता आदेश दिला नाही तर सज्जड दम दिला. सुनेने रक्कम परत केली राणीबाईंनी ती रक्कम त्या अभागी सासूला परत केली. या प्रसंगी धाडलेल्या खलित्याचा तजुर्मा -
'चिरंजीव साळूबाई वाघ यासी अहिल्याबाई होळकर यांचा आशीर्वाद. गंगाजळ निर्मळ लक्ष्मीबाई वाघ यांजकडून चिरंजीव अमृतवराव वाघ याने अमर्याद करून ऐवज पंधरा हजार घेऊन तुम्हापासी ठेविले. ते हुजुरी आणले पाहिजेत. यास्तव सरकारातून पागेचे स्वारासमागमे हे पत्र तुम्हास लिहिले आहे. तरी एक घडीचा विलंब न करता रुपये पंधरा हजार स्वारासमागमे पाठवावे. ढील केल्यास परिच्छन्न उपयोगी पडणार नाही. जाणिजे.'
गुरुवार, १३ मार्च, २०२५
ज्युलिअस सीझर - वासनांच्या मुळाशी जाणे कठीण नाही!
रोमन सम्राट
ज्युलियस सीझरच्या काळात बलात्कार आणि सेक्स संबंधी गुन्हे इतके वाढले होते की तो
हताश होऊन गेला होता. त्यात जबरी समलिंगी संभोगींचींही बरीच संख्या होती. यावर
त्याने एक अभ्यासगट नेमला पण त्याच्या अहवालाची वाट पाहण्याइतका वेळ त्याच्याकडे
नव्हता.
त्याने त्याच्या काही शहाण्या लोकांना निरीक्षणे नोंदवायला
सांगितली. त्यात एक निरीक्षण होतं सिन्येडसबद्दलचे (cinaedus याचा उच्चार किनायडूस असाही करतात). पिळदार देहयष्टी असलेले पण शारीरिक ढब
फेमिनाईन असलेले हे तरुण डफ वादक होते.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)