Friday, September 22, 2017

नियत...

हसतमुखाने फाळ म्हणाला मातीला, जप आता हिरव्या कोवळ्या अंकुरांला !
माती म्हणाली पावसाला, निघ सख्या आता जीव नको टांगू मेघातल्या सूरांला
पाऊस म्हणाला वाऱ्याला, नको बोलवूस आता अवकाळी फिरून तुला भेटायला
वारं म्हणालं पावसाला, मी निमित्त असतो नीट मापात राहायला सांग माणसांला !
गदगदलेला फाळ म्हणाला, चूक माणसांची तर यांची सजा का मुक्या जित्राबांला ?
गोठ्यातल्या गायी वदल्या, माणूस नियतीने राहिला तरच बरकत येईल साऱ्यांला !

- समीर गायकवाड.