Saturday, May 20, 2017

गल्बला...

गाव फुलांचा सोडून काय ती गेली, सुगंध की इथला निमाला.
वाराच तो सैरभैर, ज्याने पत्ता नवा तिचा अकस्मात कळवला.
वाऱ्यास गंधवेड्या विचारले, "शोध तिचा कसा काय लागला ?"
"आसमंत देहगंधाने तिच्या दरवळला त्यानेच की माग लागला"
तलम अस्तुरीगंध, बेधुंद कसा राहीन लपून, करी तो गल्बला !


- समीर