Monday, January 16, 2017

अंगाई ...


झुले चिंचेखाली झोळी, निजे आनंदे सानुली
रुणुझुणू गाई वारा, फुले नाजूक डोलती शिवारा
दंगता कृष्णमेघ सावळे, बिलोरी नभ भोवळे
सावल्यांचे उंच हिंदोळे, भुरळूनि जाती डोळे
डुले पानांची अल्वार नक्षी, झिंगूनि जाय पक्षी
पान गिरकी घेऊनि आल्हाद, झेप झोळीमधे घेई
छाती बुंध्याची येई फुलून, झाड जाई हरखून !
फांद्यातून कौतुके बघे पांडुरंग चित्त होऊनी दं
वैरी दिस येता डोईवरी, छकुली भुके होई बावरी     
माय अर्धपोटी गाई अंगाई, बाळासवे जग झोपी जाई ...- समीर गायकवाड.