Tuesday, October 25, 2016

चकवा ....
आड वळणांच्या वाटेने, घुंगरमाळांचं गाणं
उसाच्या फडात नाचे, हिरवंरुपेरी चांदणं !
चिलारीच्या काट्यावर, सरडा घेई पेंग
उफाणल्या मातीला, छळे भुईमुगाची शेंग !
वारा जाई गांगरून, त्याची होई वावटळ
वाटेआडच्या डोंगरा, छाती येई कळ
झाडात लकाकती ऐने बिल्लोरी चित्तचोर
किती लपशी आता, जीवा लागला की गं घोर !
मन अधीर सांगे वारंवार, वाटंच्या रं वाटसरा
हिथं साराच रे चकवा, जीव लागे रे दिलबरा !!!


- समीर गायकवाड.