Thursday, August 4, 2016

पाऊस पडता गर्जून ....


पाऊस पडता गर्जून,
अंग जाई भिजून,
रस्ते निघत धुवून,
गवत येई खुलून,
वेली जात फुलून l

पाऊस पडता गर्जून,
पक्षी उडत तरारून,
आभाळ जाई भरून,
शाळा वाहे भरून,
दप्तर जाई भिजून l

पाऊस पडता गर्जून,
भांग निघे विस्कटून,
गणवेश बसे चिकटून,
पावलं जात कर्दमून,
अन जीव जाई दमून  l

पाऊस पडता गर्जून
झाडं जात रमून
माती जाय ओलावून
बाप्पा नाचे आनंदून
डोळा जाई आसवुन l