Sunday, May 22, 2016

आम्रपाली…. एक सौंदर्यवती वेश्या ते भिख्खूणी !

Related image
ही कथा आहे भारतीय इतिहासातील सर्वात सुंदर महिलेच्या बिरुदाने विख्यात असलेल्या 'आम्रपाली'चीजिला आपल्या सौंदर्याची किंमत वेश्या बनून चुकवावी लागली. ती कोणाचीही पत्नी होऊ शकली नाही परंतु संपूर्ण नगराची नगरवधू मात्र बनली. आम्रपालीने स्वतःसाठी अशा आयुष्याची निवड केली नव्हतीउलट वैशालीमध्ये शांती आणि गणराज्याची अखंडता कायम ठेवण्यासाठी तिला सर्वांची पत्नी बनवून संपूर्ण नगराकडे सोपवण्यात आले होते.

आम्रपालीचे जन्मदाते इतिहासाला ज्ञात नाहीत. तिला जन्म दिलेल्या आई-वडिलांचीकोणालाच माहिती नाहीपरंतु वैशाली नगरातील ज्या लोकांनी तिचे पालनपोषण केले त्यांना ती एका आंब्याच्या झाडाखाली मिळाली होती. यामुळे तिचे नाव आम्रपाली ठेवण्यात आले होते. ती दिसायला खूप सुंदर होतीतिचा चेहरा तेजस्वी होताकाया अत्यंत आर्कषक होती आणि तिचा देह कमनीय होता. जो कोणी तिला पहायचा त्याची दृष्टी तिच्यावर खिळून राहत होती. परंतु हेच सौंदर्यआकर्षण तिच्यासाठी शाप ठरले. एका सामान्य मुलीप्रमाणे तिला तिचे आयुष्य जगता आले नाही. ती तिचे दुःख कोणासमोरही मांडू शकली नाही आणि शेवटी नियतीच्या मनात जे होते तेच घडले.


या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी एके दिवशी वैशालीत सभा भरवण्यात आली. या सभेमध्ये उपस्थित सर्व पुरुष आम्रपालीशी लग्न करण्याच इच्छुक होते. यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होऊन बसले. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वेगवेगळे विचार मांडण्यात आले परंतु कोणताही योग्य मार्ग निघू शकला नाही.


परंतु शेवटी जो निर्णय घेण्यात आलात्यामुळे आम्रपालीचे आयुष्य नरकात लोटले गेले. सर्वांच्या संमतीने आम्रपालीला नगरवधू म्हणजे वेश्या घोषित करण्यात आले. असे करण्यामागचे कारण असे होते कीसर्वांना वैशालीचे गणतंत्र सुरक्षित ठेवण्याची इच्छा होती. आम्रपालीला एका व्यक्तीला सोपवले असते तर यामुळे एकता खंडित झाली असती. नगरवधू झाल्यानंतर प्रत्येकजण तिला मिळवण्यासाठी स्वतंत्र होता. अशाप्रकारे राज्याच्या निर्णयाने तिला वेश्या बनवले. आम्रपालीने नगरवधू बनून अनेक वर्ष वैशालीतील लोकांचे मनोरंजन केले...


अनेक राजपुरुषसरदारधनवान तिच्या महाली पाहुणचार घेत. आपल्या रसरशीत लावण्याने व अदाकारीने आम्रपाली सर्व लब्धप्रतिष्ठितांची हृदये काबीज करत असे. तिच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून वैशालीशी शत्रुत्व असलेल्या मगधाच्या बिंबिसार राजालाही आपले कुतुहल आवरता आले नाही. त्याने थेट वैशालीवर हल्ला केला आणि काही दिवस आम्रपालीच्या महालात पांथस्थाच्या छद्मवेषात आश्रय घेतला. बिंबिसार राजा हा एक उत्तम कलावंतकलासक्त व संगीतज्ञ होता. बघता बघता बिंबिसार व आम्रपाली एकमेकांच्या प्रेमात पडले. पण जेव्हा आम्रपालीला त्याचे खरे रूप कळले तेव्हा तिने त्याला तिथून जाण्याची व चालू युध्द समाप्त करण्याची विनंती केली. प्रेमात बुडालेल्या बिंबिसाराने खरोखरीच आम्रपालीच्या इच्छेचा मान राखून युध्द संपवले. त्याच्या ह्या कृतीने वैशाली नगरीच्या नागरिकांनी त्याची भ्याड राजा म्हणून हेटाळणी केली. ह्या सर्व प्रकारात आम्रपालीने आपल्या नगरीशी इमान राखले. पुढे आम्रपालीने बिंबिसाराच्या पुत्रासविमल कौंडिण्यास जन्म दिला. बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू याने नंतरच्या काळात वैशालीवर कब्जा मिळवून पूर्वीच्या अपमानाचा सूड घेतला.

या दरम्यानच्या काळात भगवान बुद्ध मार्गक्रमण करत-करत वैशालीत आले. त्यांच्यासोबत शेकडो शिष्य होते. सर्व शिष्य दररोज वैशालीमध्ये जाऊन भिक्षा मागत होते. वैशालीमध्येच आम्रपालीचा महाल होता. एकदा आम्रपालीने रस्त्यातून तेजस्वीदेखण्या बौध्द भिख्खुला इतर भिख्खुंच्या समवेत जाताना पाहिले. असे रूपअसे तेजअसा डौल तिने अद्याप पाहिला नव्हता. बर्‍याच काळाने आम्रपालीच्या हृदयात त्या भिख्खुच्या केवळ दर्शनाने चलबिचल झालीमनात त्याच्याविषयी अभिलाषा उत्पन्न झाली. तिने त्या भिख्खूला आपल्या महाली भोजनाचे आमंत्रण धाडले. दुसऱ्याच दिवशी तिच्या दरवाजावर त्या जथ्थ्यातील एक भिख्खु भिक्षा मागण्यासाठी आला. त्याला पाहताच आम्रपाली त्याच्या प्रेमात पडली. ती दररोज राजकुमारधनवान लोकांना पाहत होतीपरंतु भिक्षापात्र हातामध्ये घेतलेल्या भिख्खुमध्ये तिला अपर प्रेम आणि सौंदर्य दिसून आले. तिने भिख्खुला विनंती केली - 'कृपयाघरात येऊन माझे दान ग्रहण करा.'

त्या भिख्खुमागे इतरही अनेक भिख्खुक होते. त्या सर्वांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो तरुण भिख्खु आम्रपालीच्या महालात भिक्षा घेण्यासाठी गेल्यानंतर त्याचे सर्व सहकारीगण ईर्ष्या आणि क्रोधाने लाल झाले होते. भिक्षा दिल्यानंतर आम्रपाली त्या भिख्खुला म्हणाली की - 'तीन दिवसानंतर पावसाळा सुरु होत आहे. हे चार महिने तुम्ही माझ्याकडे वास्तव्य करावे अशी माझी इच्छा आहे.'
युवक भिख्खु म्हणाला - 'मला यासाठी माझ्या गुरूंकडून परवानगी घ्यावी लागेल. जर त्यांनी मला येथे राहण्याची परवानगी दिली तरच मी राहण्यासाठी येईन.'


तो आम्रपालीच्या महालातून बाहेर पडताच इतर शिष्यांनी त्याला महालात काय घडले हे विचारले. त्याने आम्रपालीने व्यक्त केलेली इच्छा सर्वांना सांगितली. हे ऐकून सर्व भिख्खुंना खूप राग आला.आम्रपालीला एक दिवसच पाहून ते तिच्यावर घायाळ झाले होते आणि याने थेट चार महिन्यांची तयारी केली होती. युवक भिख्खु बुद्धांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच इतर भिख्खु त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सर्व घटना तिखट मीठ लावून सांगितली. ती एक वेश्या असून चार महिने तिच्याकडे एक भिख्खु कसा काय राहू शकतो असा प्रश्न त्यांनी भगवान बुद्धांसमोर उपस्थित केला ?


भगवान बुद्ध म्हणाले - शांत व्हाआधी त्याला माझ्याकडे येऊ द्या. त्याने तेथे थांबण्याचा निर्णय अजूनही घेतलेला नाहीमी परवानगी दिल्यानंतरच तो तेथे जाणार आहे.'
युवक भिक्षु तेथे आला आणि त्याने बुद्धांचे चरण स्पर्श करून सर्व घटना सांगितली. 'आम्रपाली वैशालीची नगरवधू असून चार महिने मी तिच्या महालात राहण्याची विनंती तिने केली आहे. सर्व भिख्खु कोणाच्या न कोणाच्या घरी राहणार आहेत. तुमची परवानगी मिळाली तरच तेथे येईन असे मी तिला सांगितले आहे.
भगवान बुद्धांनी त्याच्या डोळ्यात पहिले आणि म्हणाले - ''तू चार महिने तिथे राहण्यासाठी जाऊ शकतोस.


बुद्धांचे शब्द ऐकून सर्व भिख्खुंना आश्चर्याचा धक्का बसला. तीन दिवसानंतर तो भिख्खु आम्रपालीच्या महालात राहण्यासाठी गेला. त्या नंतर काही दिवसांनी  नगरात चालू असलेल्या चर्चा इतर भिख्खुगणांनी भगवान बुद्धांच्या कानी घालण्यास सुरुवात केली. भगवान बुद्ध त्यांना म्हणाले - 'तुम्ही तुमच्या दिनचर्येचे पालन करत राहा. मला माझ्या शिष्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याच्या मनामध्ये कोणतीची इच्छा नसल्याचे मला त्याच्या डोळ्यामध्ये दिसले आहे. मी त्याला परवानगी दिली नसती तरी त्याला वाईट वाटले नसते. मी त्याला परवानगी दिली आणि त्यानंतर तो गेला आहे. मला त्याच्या ध्यान आणि संयामावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही एवढे चिंताग्रस्त का झाला आहाततो त्याच्या संयमावर अटळ असेल तर आम्रपालीसुद्धा त्याच्यावर प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही. ही त्याच्या परीक्षेची वेळ आहे. फक्त चार महिने वाट पाहामला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो माझ्या परीक्षेत उत्तीर्ण होईल.

चार महिन्यानंतर तो युवक भिख्खु आश्रमात परत आला आणि त्याच्या मागमागे आम्रपाली देखील भगवान बुद्धांकडे आली. आम्रपालीने बुद्धांकडे भिख्खुणी होण्याची इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली - 'तुमच्या भिख्खुला माझ्याकडे आकर्षित करण्यासाठी मी सर्व प्रयत्न केले परंतु मला यश आले नाही. त्याचा आचरणाने माझे मन बदलले असून तुमच्या चरणातच सत्य आणि मुक्तीचा मार्ग असल्याचा मला साक्षात्कार झाला आहे. त्याच्या आत्मभानानेमनोनिग्रहाने व तेजोबळाने त्याने आपली जागृतावस्था कधीच त्यागली नाही. परिणामवश आपल्या सौंदर्याविषयाचे गर्वहरण झाले आहे. आता वेगळ्या प्रकारे आयुष्य व्यतीत करण्याची ओढ लागली आहे"

अशा प्रकारे संन्यस्त जीवनाकडे आकृष्ट झालेल्या आम्रपालीने बुध्दाला आपल्या प्रासादात भोजनास बोलावले. बुध्दांनीही ते आमंत्रण स्वीकारले.
इतिहासात असे दाखले आहेत कीयावेळी वैशालीचा राजा असणाऱ्या अजातशत्रूने बुद्धांनी आम्रपालीचे आमंत्रण स्वीकारू नये असा हुकुम दिला होता पण राजाज्ञेच्या विरुद्ध जाऊन महात्मा बुद्ध तिच्या घरी गेले. अजातशत्रूने जेंव्हा वैशालीवर हल्ला चढवला होता तेंव्हा त्याने संपूर्ण नगर बेचिराख करून निर्मनुष्य करण्याचा जणू चंगच बांधला होता पण त्याच्या सैनिकांना आम्रपालीस कारागृहाकडे नेताना तिचे असीम सौंदर्य पाहून त्याचे विचार गोठले. नेमका याचाच फायदा घेऊन आम्रपालीने वैशालीला पुन्हा एकदा जीवदान दिले होते. गौतमांनी हे ताडले होते की अजातशत्रू हा वैशालीसाठी विनाशक राजा आहे मात्र आम्रपाली ही जीवनदायिनी आहेत्यामुळे अजातशत्रूच्या आदेशाला डावलून त्यांनी आम्रपालीचे आमंत्रण स्वीकारून एक प्रकारे तिला अजातशत्रूहून श्रेष्ठ ठरवले. बुद्ध आम्रपालीच्या महाली आल्यानंतर तिने राजगणिकेच्या आपल्या पदाचा त्याग केला व बौध्द धर्म स्वीकारला. बौध्द धर्माच्या प्रसाराचे काम करता करता तिला आत्मसाक्षात्कार झाला. तिने तिची सर्व संपत्ती बौद्ध भिख्खुंना दान केली आणि त्यांनी ती जनतेत वाटून टाकली.
बौध्द धर्मात आम्रपालीच्या योगदानाचेकार्याचे महत्त्व कायम आहे. पुढें वयात आल्यावर विमल कौंडिण्यही बौध्द भिख्खू झाला. आम्रपालीच्या अंबपाली आम्रवनात वैशाली मुक्कामी बुध्द राहायचे आणि तिने पुढे हेच आम्रवन बुध्दांना अर्पण केले. ह्याच ठिकाणी बुध्दांनी प्रसिध्द अंबपालिका सूक्त सांगितले.

आम्रपालीचा महाल चातुर्मासमध्ये सर्व भिक्षूंचे निवासस्थान बनले आणि पुढील कालखंडात बुद्धांच्या संघात सर्वात प्रतिष्ठित भिख्खुणी म्हणून आम्रपालीचे नाव अजरामर झाले.

एक अनोखे आयुष्य जगणारीसर्व भोगविलास भोगून झाल्यावर जेव्हा आत्मभान येऊ लागले तेव्हा तो प्रवासही धैर्यपूर्वक करणारीसर्व ऐहिक सुखांचालौकिकाचाप्रतिष्ठेचा परित्याग करून खडतर वाट पत्करणारीज्ञान व भक्तीच्या मार्गात लीन होऊन साक्षात्कारापर्यंत पोहोचलेलीअरहंतपद प्राप्त केलेली महानिश्चयी स्त्री! तिचा हा जीवनप्रवास नक्कीच वेगळा व स्फूर्तीदायी आहे. आम्रपालीने सौदर्याची असामान्य शिक्षा भोगली मात्र त्यातून प्राप्त झालेल्या सहवासाच्या जोरावरच तिने भिख्खुणीपर्यंतची पायरी गाठली हा तिच्या आयुष्यातील परमबिंदू म्हणावा लागेल. 

आजही काही लोक तिच्या पूर्वाश्रमातील वेश्या असण्याचं भांडवल करून तिच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न करतात पण त्यांना याचा विसर पडतो की तिच्यामुळेच दोन वेळा वैशाली बेचिराख होता होता वाचलं. तिच्या देहाचे लचके तोडण्यास आतुर झालेल्या एकाही पुरुषाला जे जमले नाही ते तिने करून दाखवले. त्यामुळे आम्रपाली आणखी उदात्त आणि उत्तुंग वाटत राहते. फक्त एका गोष्टीची खंत वाटते कीअशी संधी आणि असे परिवर्तन कुठल्याच वेश्येच्या वाट्यास आले नाही. अशी संधी पुन्हा कुठल्याही वेश्येच्या नशिबी न येणं ही स्त्री जन्माची एक शोकांतिकाच आहे असे मी मानतो. खरं तर तिला वेश्या असं संबोधन करणं हेच मुळात सकल पुरूषांसाठी पुरुषी वर्चस्ववृत्ती व अधाशी भोगकारतेचं अघोरी लक्षण आहे. त्यामुळे तिचा उल्लेख जेंव्हा जेंव्हा वेश्या असा होईल तेंव्हा तेंव्हा पुरुषी भोगविलासी शोषक वृत्तीस ती मोठी थप्पड असणार आहे....      

समीर गायकवाड.

(लेखासाठीचे संदर्भ - 'द लिजेंड ऑफ आम्रपाली' - लेखक अनुराग आनंद
'द ग्रेट झेन मास्टर ता हुयी' - लेखक ओशो रजनीश)