Sunday, April 10, 2016

एक होतं पाणी ....


एक होतं पाणी तवा येई आभाळातुनी
काळ्या ढगांत लख्ख वीजा
झाडाझाडाला मारती मिठया
घरावरचा पत्रा वाजे तडातडा
मातीतला भरे पाण्याचा घडा  

आता येई पाणी ओल्या डोळ्यातुनी
खोल डोळ्यात मुक्या वीजा
झाडाझाडाच्या होती काटक्या
घरावरचा पत्रा तापे कडाकडा
मातीतला आटे पाण्याचा घडा

एक होतं पाणी तवा येई आभाळातुनी
गायवासरांच्या डोळी भेगा
वाड्यावस्त्यांच्या चिंधडया
भुईवरचा यम नाचे थयथया
तहानेचा घोट जीवाला धडा

एक होतं पाणी तवा येई आभाळातुनी
आता येतं चराचराच्या रक्तांतूनी !

- समीर गायकवाड.