Thursday, February 25, 2016

आभाळमाया ...


निळ्या छतावर होई आभाळाची नक्षी, दूर रानात चाले गायवासरांची कुक्षी
कधी उन्हाचं येती बेभानं आरमार, तर कधी दाटून येई मेघांचं घरदार
पिले घरटयामंदी बसत उघडून चोची, दूर गेली की उडून माय त्या पिलांची
भेगाळल्या भुईला वाटे तणाचाही भार, निभावून सदा नेई विठूचा आधार

हिरवाई उलीशी अजूनही आहे जिती, मुक्या जीवांची असे तिच खरी साथी
अलगद पडती मोडक्या संसाराची पालं, आज इथं उद्या तिथं हेच चालं
किती आक्रीत जरी माणूस करी, अंती भुईच त्याला उराशी गच्च धरी !
आठवता मायबाप पाणी डोळा येई, सात जन्मही कमी त्यांची होण्या उतराई !!

- © समीर गायकवाड.


( छायाचित्र सौजन्य - देवेंद्र साधले )