Thursday, February 4, 2016

पहिले उडाण …पंखी तयांच्या बळ लाभू दे, आकाश कवेत येऊ दे l
गगन भरारी उंच त्यांची, विश्वाला कौतुके पाहू दे l
वारयाच्या झुळूकेवर तयांना, गाणी वेगाची गाऊ दे l
गिरक्या घेताना आकाशी, उर्मी चेतनेची लाभू दे l
गीत नव्या पंखांचे गाताना, चोचीत गोडवा येऊ दे l
घास प्रेमाचा भरताना, तृणात अमृत झिरपू दे l
ऊन,वारा, पाऊस,सावली यांचे भान तयांना येऊ दे l
मार्ग न चुको तयांचा, पथदर्शी या दिशांना होऊ दे l
घरट्याकडे परतताना कृपा त्यांच्यावर राहू दे l
पहिले उडाण त्यांचे, तुझ्या नावाचे असू दे !!

- समीर गायकवाड.