Monday, January 25, 2016

भाकरीचा शोध ...

भाकरीचा अष्टगंध शोधताना
पाय कधी छिलून गेले काही कळलेच नाही,
बाहेर लखलखता प्रकाश झिरपताना 
काळजात अंधारले कधी कळलेच नाही.
जन्म देणारे टाकून गेले आकाशाच्या बाप्पाकडे,
गाऱ्हाणे आता गायचे कुणाकडे ?
एकेक क्षण चिणून गेलेत मेंदूच्या कपारींमध्ये, 
आठवणीचे ओझे ठेवायचे कुणाकडे ?

- समीर गायकवाड .