Monday, January 4, 2016

अनोख्या बापलेकीची सत्यकहाणी ....

ईश्वरालाही हरवणारी तरुण मुलगी अन विशाल काळजाचे वडील ......

आपल्या मरणोन्मुख तरुण मुलीचे काळीज दान करायला बापाचे काळीजही तितक्याच विशाल मनाचे अन प्रगल्भ सामाजिक जाणिवेचे लागते ! अपस्मार(इपिलेप्सी) या आजाराने ग्रस्त असलेल्या २० वर्षीय सोनिया चौहान हिला इंदूरमध्ये शनिवारी ब्रेन डेड घोषित करण्याोत आले होते.गणेश चौहान यांच्या मनाची श्रीमंती अंबानींपेक्षा मोठी म्हणावी लागेल ! आपल्या पोटच्या गोळ्याचे यकृत.हृदय,डोळे,त्वचा काढून पाचजणांचे   जीव वाचवणाऱ्या या बापाचे कोणत्या शब्दात कौतुक करावे ? सोनियाच्या वडिलांनी गणेश चौहान यांनी तिचे अवयव दान करण्यायचा निर्णय घेतला सोनियाची त्वचा, डोळे,  हृदय आणि यकृत दान करण्यात आले आहे ! इतकं मोठं दान द्यायला फार मोठे काळीज लागते !!


इंदूरच्या मालवीय नगर इथे राहणारया सोनियाचे शनिवारी ब्रेन डेड झाले होते. त्यानंतर हृदय मुंबई आणि यकृत दिल्लीमध्ये  पाठविण्यात आले. आज (रविवारी) देशात त्यासाठी प्रथमच इंदूर, मुंबई आणि दिल्लीं या तीन शहरांमध्ये् ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. सोनियाचे हृदय मुंबई आणि यकृत दिल्लीीमध्येा पाठविण्यात आले.तिचे डोळे एमके आय या नेत्रपेढीस देण्यात आले!

जगात पहिल्यांदा एवढ्या दूर अंतरावर प्रत्याणरोपणासाठी थेट हे अवयव पाठवण्याित आले आहेत. सकाळी ६ वाजता तिचे विविध अवयव काढून घेण्याची शस्त्रक्रिया सुरु झाली. सात वाजण्याआधी हृदय काढण्यात आले तिच्या हृदयाला एका बॉक्समध्ये बंद करून सकाळी ७.११ वाजता इस्पितळातून रवाना करण्यात आले. ८ मिनिटात ते विमानतळावर पोहोचले. प्रत्यांरोपणासाठी तब्बल ६०० किलोमीटर दूर पाठवण्याेत आले. याआधी जगात जेवढेही हृदय प्रत्यारोपण झाले त्यामध्ये अवयवाला जास्तीत जास्त ८० किलोमीटर अंतरावर पाठवण्यात आले. आज इंदूरहून सकाळी ७.४० वाजता डॉक्टर अन्वय मुळे यांची टीम हृदय घेऊन एयर एम्बुलन्सद्वारा मुंबईला निघाली. ८.५० वाजता सोनियाचे हृदय मुंबईमध्येे पोहोचले. प्रत्यारोपणासाठी सोनियाचे हृदय मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये एका १७ वर्षीय नवयुवकासाठी पाठवण्यात आले. त्यासाठी मुंबई विमानतळापासून फोर्टिस हॉस्पिाटलपर्यंत ग्रीन कॉरिडॉर बनवण्याित आला.

सोनियाचे यकृत दिल्लीेला पाठविले गेले. त्यासाठी दिल्ली विमानतळापासून लिवर इंस्टीट्यूट पर्यंत ग्रीन कॉरिडॉर बनवण्याबत आला. इंदूरमधून चोइथराम इस्पितळाचे डॉक्टर अन मुस्कान ग्रुपची डॉक्टर टीम सकाळी ८.२० वाजता लिव्हर इन्स्टिट्युट ऑफ लिव्हर एंड बिलियरी सायन्सकडे टीम रवाना झाली. टीम ९.३०  वाजता पोहोचली. इंदूरमधील चोइथराम इस्पितळापासून विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडॉर बनवण्यात आला. यावेळी विशेष तैनात वाहतूक पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी वाहतूक रोखून ठेवली होती त्यामुळे या अवयवांचा प्रवास जलद अन सुकर झाला.

इंदूरच्या चोइथराम इस्पितळात सोनियाचे अवयव काढून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिचे शव तिच्या घरी नेण्यात आले. सकाळी ९.३० वाजता तिची अंत्ययात्रा घरून निघाली तेंव्हा जमलेल्या लोकांना हुंदके आवरत नव्हते अन सर्वत्र तिचेच नाव होते !
सोनियाचे अवयव मिळालेल्या रुग्णांची नावे अजून सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत पण या पाच जीवांना 'सोनियाचे' जीवनदान देऊन सोनियाच्या वडिलांनी जो महान आदर्श समाजापुढे उभा केला आहे त्याला तोड नाही !

कोट्यावधी भारतीयांपुढे एक नवा आदर्श घालून सोनिया आकाशीच्या बाप्पाकडे तिची कैफियत मांडायला गेल्यावर त्या परमेश्वराने तिच्या थकलेल्या गालांवरून हात फिरवला असेल, तिच्या श्रमलेल्या मस्तकावरून हात फिरवताना त्यालाही गहिवरून आले असेल !! तिच्या डोळ्यांना तो डोळे मिळवू शकला असेल की नाही हे मला ठाऊक नाही कारण, तिची इहलोकीची यात्रा संपवताना ती पाच जीवांना अभय देऊन विश्वनिहंत्याला मात देऊनच वसुंधरेला अलविदा करून गेली. म्हणूनच ती हरली नाही तर तो हरला !!

- समीर गायकवाड .

(छायाचित्रात श्री.गणेश चौहान आणि हृदय मुंबईला घेऊन जाणारी डॉक्टरांची टीम )