Sunday, January 29, 2017

आठवणी - शरद पवार, गदिमा आणि पुलंच्या....

राजकारण साभाळत सांस्कृतिक नाती जपणे हे शरद पवारांनी अगदी नेमकेपणाने सिद्ध केले. शरद पवारपुलंगदिमा आणि पी सावळाराम यांची ही आठवण वाचकांनाही समृद्ध करून जाईल यात शंका नाही. 
२००३ साली शरद पवारांनी बारामतीत गदिमांच्या नावाने मोठे सभागृह बांधलेत्यावेळी दस्तुरखुद्द शरद पवारांनी सांगितलेला हा किस्सा आहे. ग.दि.माडगूळकर आणि पी.सावळाराम या प्रतिभावंत साहित्यिकांशी हा किस्सा संबंधित असल्याने याला वेगळी किनार आहे..... 

जेष्ठ गीतकार 'पी.सावळारामउर्फ 'निवृत्तीनाथ रावजी पाटीलहे मराठी चित्रपटातील एक नामवंत व्यक्तिमत्व,'कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेलां','जेथे सागरा धरणी मिळते','गंगा जमुना डोळ्यांत उभ्या कासारख्या अजरामर गीतातून ते आपल्याला माहित आहेत.गदिमांचा आणि त्यांचा चांगला स्नेह होता. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील 'येडेमच्छींद्रहे 'पी.सावळारामयांचे गाव,'क्रांतीसिंह नाना पाटीलही त्याच गावचे होते.

१९६८ साली पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत निवडून आले होतेआत्ताच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यावेळेस विधानसभा सदस्य व कॉंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होतेगदिमा त्यावेळीचे  साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते.

मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी शरद पवारांना बोलावून घेतले,त्यावेळी गदिमा तेथे उपस्थित होतेनाईकांनी पवारांना सांगितले,  "सावळाराम नगरपालिकेत निवडून आले आहेत,त्यांना नगराध्यक्ष करायचे आहे पण आपले येथे बहुमत नाहीये,दोन मते कमी पडत आहेत,काहीही कर पण त्यांना निवडून आण". वसंतराव नाईकांचा शब्द तेंव्हा कॉंग्रेसमध्ये प्रमाण होता व त्याला तितके वजन होते...

गदिमांनी राजकारणासारख्या कोरडया क्षेत्रातही मुक्त वावर केला होता,ते साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून जवळजवळ १२ वर्षे (१९६२-१९७४) विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते.ते जेव्हा विधान परिषदेत भाषण करणार असायचे तेव्हा ते ऐकण्यासाठी विधान सभेतील अनेक आमदार खास त्याचे भाषण ऐकण्यासाठी विधान परिषदेत येऊन बसत असत.गदिमांनी स्वातंत्र चळवळीत भाग घेतला होता त्यामुळे त्यांची नाळ त्या वेळच्या कॉंग्रेस पक्षाशी जोडलेली होती तरीपण त्यांच्या मित्र-परिवाराच्या गोतावळ्यात सर्व जणांचा समावेश होता अगदी स्व.यशवंतरावजी चव्हाण असोत,शरदरचंद्र पवार असोत किंव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत सर्वांनाच ते आपले वाटायचे. स.गो.बर्वेसुशीलकुमार शिंदेराम नाईकमनोहर जोशीं सर्वच त्यांच्या मित्र परिवाराचेच सदस्य होते.

बहुदा गदिमांनी आपल्या मित्राला हे पद मिळावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना घातली असणार किंव्हा पी.सावळाराम यांनी गदिमांचा राजकारणी नेत्यांमधला दरारा पाहून तसे सुचवले असेल!. यामागची नेमकी नक्की पार्श्वभूमी सांगता येत नाही.

शरद पवार तेथे दोन दिवस जाऊन राहीले ( या जुळवाजुळवी वर खुद्द शरद पवार म्हणतात की .... "मते कमी पडली की याला हाताशी धरा अशी ही माझी ख्याती त्यावेळेपासूनच होती !") शेवटी पवारसाहेबांनी त्यांच्यापरीने जे राजकारणी डावपेच खेळावे लागतात ते सर्व खेळून त्यांनी शेवटी 'पी.सावळारामयांना ठाण्याच्या नगराध्यक्षपदी निवडू आणले !.
शरद पवारांनी 'पी.सावळारामयांना गाडीत सोबत घेतले व मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर घेऊन गेलेतेथे मुख्यमंत्र्यांबरोबर गदिमाही उपस्थित होते,

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की पी.सावळाराम निवडून आले,नगराध्यक्ष झाले.गदिमा ते ऐकत होते,ते जागचे उठले व शरद पवारांजवळ गेले,त्यांच्या पाठीवर एक जोरात थाप मारली व म्हणाले...
"बहाद्दरा काय काम केलस!,येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....."

त्यावेळी ठाणे हे मेंटल हॉस्पटल साठी प्रसिद्ध होते (सध्या ते पुण्यात आहे! )कोणी वेड्यासारखे वागत असेल तर लोक त्यावेळी गंमत करताना "याला ठाण्याला पाठवा रे" असे नित्यनियमाने म्हणत असतत्याचा रेफरंन्स व 'येडेमच्छींद्रहे पी.सावळाराम यांचे गाव व सावळाराम पाटील हे नाव याचे गदिमांनी 'येडयाचा पाटीलकेले!

"बहाद्दरा काय काम केलस!,येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास !....." ,
तेथे उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची हसून पुरेवाट लागली होती....
महाराष्ट्रात राजकारणी आणि साहित्यिक प्रतिभावंतांमध्ये नेहमीच खेळीमेळीचे आणि स्नेहाचे सृजनानुबंध होते याचे हे एक बोलके उदाहरण आहे....
.....................................................................................................

अशीच आणखी एक आठवण आहे,  जी पवारांच्या स्वभावांचे वेगळेच कंगोरे उलगडून दाखवते.

बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर शरद पवार नेहमीच त्यांच्या मतदारसंघातल्या सर्व घटकांमधल्या लोकांच्या भेटी वेगवेगळ्या कामांच्या निमित्तानं घेत असत. पुण्यापासून जवळच असलेल्या बारामतीत होणाऱ्या साहित्यकलासंगीतनाटक आदी उपक्रमांमध्येही ते बारकाईनं लक्ष घालत असत व अशा संस्थांमधून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमागं उभा राहत असत. त्या काळी सर्व छोट्या-मोठ्या शहरांमध्ये सानेगुरुजी कथामाला’ हा कार्यक्रम उत्साहात साजरा होई. बारामतीच्या सानेगुरुजी कथामालेच्या एका मोठ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पवारांसह तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीख्यातनाम कवी-गीतकार ग. दि. माडगूळकर आणि सिद्धहस्त साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना एकत्रितपणे आमंत्रित केलं होतं. ठरल्याप्रमाणे कथामालेचा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीनं पार पडला.

या मोठ्या पाहुण्यांसाठी पवारांच्या घरीच दुपारच्या भोजनाची व्यवस्था केलेली होती. त्याप्रमाणे कार्यक्रम संपवून ते पवारांच्या घरी गेले. भोजनाची सर्व तयारी झालेली होती. पानंसुद्धा घेतलेली होती. तर्कतीर्थांच्या पानाभोवती सुरेख रांगोळी घातलेली होती आणि पानात सर्व शाकाहारी पदार्थ वाढलेले होते. बाकी इतर सगळ्यांच्या ताटांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांची रेलचेल होती. जेवण सुरू करण्यापूर्वी तर्कतीर्थांनी पवारांना जवळ बोलावलं आणि विचारलं- ‘‘हा पंक्तिप्रपंच’ कशासाठीतसं बघितलं तरतुमच्या पानात जे वाढलेलं आहेतेही चालतं आम्हाला आणि जमलंच तर आम्ही घेतोसुद्धा!’’ हे ऐकून तर्कतीर्थांचं ताट बदलण्यात आलं. तर्कतीर्थ स्वत-च्या वाहनानं बारामतीला आलेले होते. त्यामुळं त्यांची परतीची सोय झालेली होतीपरंतु गदिमा ऊर्फ अण्णा आणि पुलं यांना पुण्याला पोचवायचं होतं.

त्या वेळी पवारांकडं स्वत-ची जीपगाडी होतीपरंतु एवढ्या थोरा-मोठ्यांना जीपनं प्रवास घडवावायाबद्दल त्यांना थोडा संकोच वाटत होता. गावातले त्यांचे एक सहकारी भगवानराव काकडे बऱ्यापैकी सधन होते आणि त्यांच्याजवळ एक चांगली मोटारगाडीही होती. मग पवारांनीच त्यांना विनंती केली - ‘‘आपण तुमच्या गाडीनं पाहुण्यांना पुण्यापर्यंत सोडू या.’’ पवारांचे पाहुणे म्हटल्यानंतर साहजिकच काकडे यांची कल्पना अशी झालीकी, 'कुणीतरी फार मोठी माणसं असली पाहिजेत'. काकडे लगेच तयार झाले आणि पवार गदिमा व पुलं यांना घेऊन पुण्याकडं निघाले. काकडे स्वत-च गाडी चालवत होते आणि पवार पुढच्या सीटवर त्यांच्या शेजारी बसलो होतो. प्रवास सुरू झाला तशी काकडे यांनी पाहुण्यांची विचारपूस करायला सुरवात केली. त्यांनी पहिलाच प्रश्न टाकला - ‘‘कोणच्या गावाकडचं म्हणायचं?’’
‘‘आम्ही पुण्यालाच असतो,’’ असं उत्तर दोघांनीही दिलं. त्यांचा पुढचा प्रश्‍न - ‘‘काय काम करता?’’ आता या प्रश्नाचं उत्तर काय येईलयाबाबत पवार थोडेसे धास्तावलेच होतेत्यावर अण्णांनी म्हणजे गदिमांनी उत्तर दिलं - ‘‘आम्ही लिव्हतो.’’

त्यांचा परत प्रश्न आलाच - ‘‘कुठं पोस्टाबाहेर बसता की मामलेदार कचरीसमोर?’’ आता संभाषणाची सूत्रं पुलंनी स्वत-कडं घेतली आणि सांगितलं - ‘‘मी पोस्टात बसतो आणि हे (गदिमा) मामलेदारांच्या कचेरीबाहेर बसतात.’’ काकडे यांचं समाधान अर्थातचं झालेलं नव्हतं.
त्यांनी पुन्हा विचारलं - ‘‘कायघरदार चालंल इतकं पैसं मिळतात का ?’’
पुलंनी लगेच उत्तर दिलं - ‘‘लोक आम्हाला लिहिल्याचे बऱ्यापैकी पैसे देतात.’’ काकडे यांच्या शंका अद्यापही संपलेल्या नव्हत्या. त्यांनी पुढं विचारलं - ‘‘तुम्ही या एवढुशा कामाचे लोकांकडून फार पैसं घेत असला पाहिजे. आवंजरा विचार करा...काय एक-दोन-चार तर कागद लिव्हायचे आन्‌ किती पैसं घ्यायचेबरंतुम्ही पडला शिकली-सवरलेली माणसं आणि तुमच्याकडं कागद लिव्हायला येणारा अडाणीगरीब. हे काय बरोबर नाही. तुमचं सगळं शिक्षण तर सरकारच्या पैशातच व्हतं नामग थोडं माणुसकीनं वागा की राव. कशाला गरिबांचे तळतळाट घ्यायचे?’’ हे सगळं ऐकून महाराष्ट्राचे ते दोन मोठे साहित्यिकअर्थातच गदिमा आणि पुलंएकमेकांकडं बघून हसत होते. या संभाषणात स्मित हास्य उमटवत माफक सहभाग नोंदवून पवार शांतपणे बसले होते.
............................................................................

समीर गायकवाड.

सुचना - सदर पोस्टवर राजकिय कॉमेंटस वा शेरेबाजी करू नये...

लेखन माहिती, संदर्भ दैनिक सकाळ आणि गदिमांच्या वेब पोर्टलवरून साभार